आपल्या सौंदर्याबद्दल नेहमीच प्रत्येक महिला conscious असते. त्यामुळे आपण नेहमी सुंदर दिसावं यासाठी रोज काहीतरी नवनवीन बऱ्याच जणी करत असतात. आपली त्वचा नेहमी तजेलदार दिसावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण त्यासाठी सतत महाग उत्पादनांवर खर्च करण्याची गरज नाही. त्यासाठी तुम्ही घरच्या घरी आणि अगदी अनादी काळापासून चालत आलेल्या काही गोष्टींचा नक्कीच उपयोग करू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल म्हणजे नक्की कोणत्या गोष्टी? त्या आता या काळात मिळत असतील की नाही. तर जास्त विचार करू नका. तुमच्या त्वचेला तुकतुकीत ठेवण्याचं काम या पुरातन गोष्टीही चांगलं करतात. इतर रासायनिक उत्पादनं वापरण्यापेक्षा या वस्तूंचा उपयोग करून तुम्ही तुमचं सौंदर्य टिकवून ठेऊ शकता. आम्ही तुम्हाला याविषयी अधिक माहिती देणार आहोत.
1. मुलतानी मातीची जादू
Shutterstock
Pimples, Dull skin यापासून त्रस्त आहात का??? या सगळ्यावर एकमेव उपचार आहे. तो म्हणजे मुलतानी माती. तुमची त्वचा कोणत्या प्रकारची आहे याने काही फरक पडत नाही. मुलतानी मातीची जादू त्वचेवर कायम चालते. मुलतानी माती Fuller’s Earth या नावानेही ओळखली जाते. तुम्ही तुमच्या त्वचेला मुलतानी मातीचा एक पॅक लावल्यानंतर तुम्हाला एक fresh look तर मिळतोच याशिवाय तुमची त्वचा नैसर्गिकरित्या क्लिन होते. तसंच मुलातानी माती त्वचेवर exfoliator आणि brightener चं देखील काम करते. यामध्ये अंतर्भूत असणारे active elements तुमच्या त्वचेमधील धूळ, तेल आणि घाम यासारख्या गोष्टी शोषून घेतं. तसंच तुमची त्वचा अधिक तजेलदार, स्वच्छ, मुलायम आणि मऊ दिसण्यासाठीही याची मदत होते. हे वापरण्यासाठी तुम्ही टॉमेटो प्युरी, गुलाबपाणी, चंदन, दही अथवा पाणी यापैकी कशाचाही वापर करू शकता. हे मिक्स करून तुम्ही चेहऱ्यावर लावा. सुकल्यावर गार पाण्याने चेहरा धुवा. आम्ही तुम्हाला खात्री देतो की, हा पर्याय कधीही चुकीचा ठरणार नाही. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यातील फरक जाणवेल.
2. हळदीत आहे काहीतरी खास
Shutterstock
लग्नाच्या रितीरिवाजांमध्ये उगीचच हळदीचा उपयोग केला जात नाही. आपल्या रितीभातींनाही काही कारणं आहेत. तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या दिवशी अधिक उजळून दिसावं यासाठी हळदीचा उपयोग लग्नाच्या आधी केला जातो. हळद नेहमी तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालते. हळद आपल्याला काही इजा तर पोहचवणार नाही ना अशी शंकाही मनाात येऊ देऊ नका. याचा वापर करण्यासाठी तुम्ही हवं तर बेसन अथवा दूध अथवा टॉमेटो प्युरीचा वापर करा. हळदीमुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स, dullness आणि सुरकुत्या हळूहळू कमी होतात. त्यामुळे हळदीचा वापर अनेक क्रिम्समध्येही करण्यात येतो.
3. गुलाबपाण्याचा परिणाम
Shutterstock
तुमची त्वचा जर संवेदनशील असेल तर त्रासाचं काहीच कारण नाही. गुलाबपाणी तुमच्या त्वचेची खूपच चांगली काळजी घेतं. तसंच तुमच्या त्वचेला एजिंगसारख्या समस्येपासून दूर ठेवण्यासाठीही याचा उपयोग होतो. तुम्ही गुलाबपाण्याचा वापर तुमच्या त्वचेसाठी टोनर अथवा क्लिंन्झर म्हणूनही करू शकता.
4. कोल्ड क्रिम अत्यंत कामाची गोष्ट
Shutterstock
तुम्ही कोल्ड क्रिम घरी तर तयार नाही करू शकत. पण एक साधं आणि परवडण्यायोग्य cold cream तुमच्या त्वचेवर नक्कीच उपयुक्त ठरतं. तुमच्या त्वचेला पोषण देण्यासाठी हा एक सोपा उपाय आहे. तुम्हाला केवळ हे क्रिम थंडीच्या दिवसातच लावायला हवं असं नाही. तर त्वचेला नेहमी hydrated ठेवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. तसंच रात्री गुलाबपाण्यासह मिक्स करून त्वचेसाठी तुम्ही याचा वापर करू शकता. यामुळे त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते.
भारतीयांची त्वचा आहे वेगळी म्हणून त्यांनी अशी घ्यावी काळजी
5. अप्रतिम दही
Shutterstock
दही खाण्यात जितकी मजा आहे तितकाच दह्याचा उपयोग त्वचेसाठीही होतो. रोजच्या जेवणात जर तुम्ही एक वाटी दही खात असाल तर तुमचं complexion लाईट करण्यासाठी याची मदत होते. तसंच दही तुमच्या त्वचेवरील अॅक्ने कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरतं. त्याचबरोबर दह्यामुळे dead cells आणि fine lines नष्ट होतात.
6. सर्वात अप्रतिम उपाय मध
Shutterstock
आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी उपयुक्त असणारी गोष्ट म्हणजे मध. हा एक अप्रतिम पर्याय आहे. मध ही एक super moisturizing property आहे जी तुमच्या त्वचेला मऊ आणि मुलायम बनवते. तसंच तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ देत नाही. यामुळे तुमच्या त्वचेमधील धूळ बाहेर निघून तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होते. मध तुमच्या त्वचेला कायम तरूण राखण्यास मदत करते.
7. बेसन
Shutterstock
तुम्हाला माहीत आहे का की, स्वयंपाकघरात असणारं बेसन हे तुमच्या त्वचेवर खूपच चांगला परिणाम देतं. याचा वापर तुम्ही दह्याबरोबर मिक्स करून पेस्ट करून स्क्रब म्हणून करू शकता. बेसन तुमच्या चेहऱ्यावर खूपच चांगली चमक आणतं. तसंच तुमच्या चेहऱ्यावरील unwanted hair काढून टाकण्यासाठीही याची मदत होते. तुम्हाला हवं तर तुम्ही याचा वापर हात आणि पायावरही करू शकता.
8. तुळस आणि कडूलिंब
Shutterstock
या दोन्ही वनस्पतींचा उपयोग हा तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स आणि काळे डाग काढून टाकण्यासाठी करता येतो. तुम्हाला जर अॅक्नेची समस्या असेल तर तुम्ही तुळस आणि कडूलिंबाचा वापर केलाच पाहिजे. तुम्ही दूध आणि गुलाबपाण्यासह याचा वापर करू शकता.
तुमच्या Beauty Sleep साठी गरजेच्या आहेत ‘या’ 7 गोष्टी