ADVERTISEMENT
home / मनोरंजन
आमिर खान

घटस्फोटानंतरही आमिर- किरणचे खास नाते, केला उलगडा

आमिर खान आणि किरण राव वेगळे होऊन आता बराच काळ लोटला आहे. पण आजही त्यांच्या नात्याची चर्चा सोशल मीडियावर होत असते. कारण त्यांनी घटस्फोट घेतला असला तरी आजही ते अनेक ठिकाणी एकत्र दिसतात. इतकेच नाही तर अनेक प्रॉजेक्ट एकत्रह करत आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांचे नाते घटस्फोटानंतरही चांगले असणे हे स्वाभाविक आहे. त्यांच्यातील या नात्याचा उलगडा आमिरने कॉफी विथ करणमध्ये केला आहे. त्याने त्याच्या किरणच्या नात्यासंदर्भात इतकेच नाही तर त्याची पहिली पत्नी हिच्य सोबत असलेल्या नात्याची उलगडा केला आहे. आमिरला असे बोलतना ऐकून अनेकांना खूप दिलाला मिळाला आहे. त्याच्यासोबत हा शो करिना कपूरने शेअर केला आहे. या दोघांनी यामध्ये खूपच धमाल केली आहे. 

अजूनही आम्ही एकत्र

आमिर खान आणि करिना कपूर कॉफी विथ करणमध्ये

कॉफी विथ करण ( Koffee With Karan) #kwk च्या सातव्या सीझनमध्ये करिना- आमिर एकत्र येणार आहेत. त्यांनी या सीझनच्या त्यांच्या एपिसोडमध्ये चांगलीच धमाल केली आहे. यावेळी त्यांनी एकमेकांबद्दल सांगताना आपल्या खासगी आयुष्यातील काही गोष्टीही सांगितल्या आहेत. आमिर खान आणि किरण राव यांचे नाते अगदी सुरळीत सुरु असताना अचानक त्यांच्या नात्यात असे काही झाले की, त्यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आली. त्यांचा घटस्फोट का झाला असावा हे खूप जणांना कळत नव्हते. पण आता त्यांच्या या नात्याविषयी त्याने सांगितले की, तुम्हाला विश्वास बसणार नाही की, आमचा घटस्फोट झाला आहे. पण तरीही आमचे नाते अजूनही चांगले आहे. किरणसोबतच नाही तर माझी पहिली पत्नी रिना दत्तासोबतही माझे नाते खूप चांगले असून आम्ही आजही सगळे एकत्र भेटतो. आठवड्यातून एकदा तरी आमची भेट होत असते. त्यामुळे आमच्यामध्ये एक कौटुंबिक नाते आहे. त्यामध्ये कुठेही तणाव नाही. 

आमिरने दाखवली त्याची वेगळी बाजू

आमिर खान हा फारसा बोलत नाही असे खूप जणांना वाटते. पण असे अजिबात नाही. आमिरमध्येही सेन्स ऑफ ह्युमर आहे हे त्याने हा शो करताना दाखवून दिले. करिना ही गॉसिप क्वीन आहे हे आपण जाणतो. पण आमिर खानची एक वेगळी बाजू यामध्ये दिसून आलेली आहे. इतकेच काय सगळ्यांना काहीही प्रश्न विचारुन रोस्ट करणारा करणही यामध्ये आमिरकडून रोस्ट होताना दिसत आहे. त्यामुळे ही मजा पाहण्यातही मजा येणार आहे. Kwk चा नवा सीझन खरंच खूप मजा आणणारा आहे. त्यामुळे हा एपिसोड तुम्ही बघायलाच हवा असा आहे.

किरणसोबत या कारणासाठी घेतला घटस्फोट

खूप जणांना आमिरने किरणसोबत घटस्फोट घेतला असा अनेकांना प्रश्न पडला होता. पण या बद्दल आमिरने आधीच खुलासा केला होता. त्याने या संदर्भात सांगितले की, किरण आणि त्याच्यामध्ये काही विचारांची तफावत झाली आहे. शिवाय त्यांना जसे आयुष्य हवे अशी मुभा त्यांना या एकमेकांसोबत राहून मिळत नाही त्यामुळे त्यांनी एकमेकांसोबत राहण्यापेक्षा मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला. 

ADVERTISEMENT

आता आमिरने त्याच्या नात्यासंदर्भात नेमके काय सांगितले यासाठी तुम्हाला याचा नवा एपिसोड पाहावा लागेल. 

03 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT