सध्या चालू असलेल्या लॉकडाऊनमुळे प्रत्येकावर काही ना काहीतरी वेळ न सांगता आली आहे. काहींना यातून अतीव दुःखालाही सामोरं जावं लागलं आहे तर काहींच्या घरी या काळात बाळांचे जन्मही झाले आहेत. मात्र एका अभिनेत्यावर या लॉकडाऊनच्या काळात दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याला त्याच्या वडिलांचे अखेरचे दर्शनही घेता आलेले नाही. आपल्याला नक्की कोणत्या परिस्थितीचा सामाना करावा लागला आहे हे आता स्वतः त्या अभिनेत्याने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. ‘सेठ जी’ या मालिकेत काम करणारा अभिनेता अनुराग मल्हान सध्या या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत त्याने एका मुलाखतीमध्ये आपली सद्यस्थिती व्यक्त केली आहे.
काटा लगा फेम शेफाली जरीवाला लागले मातृत्वाचे वेध
वडिलांना शेवटचे पाहताही न आल्याचे दुःख जन्मभर राहील
लॉकडाऊनमुळे सध्या कोणालाही बाहेर जाता येत नाही. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायची परवानगीही नाही. पोलिसांचे पहारे प्रत्येक ठिकाणी चोख कामगिरी बजावत आहेत. पण यामध्ये काही संकटे अशी येत आहेत की ज्यामुळे प्रत्येकाचे हृदय हेलावून जाईल. अभिनेता अनुराग मल्हानही सध्या याच परिस्थितीतून जात आहे. एप्रिल 14 रोजी त्याच्या वडिलांचे निधन झाले. ‘गेल्या काही महिन्यांपासून त्यांना टीबी झाला होता. त्यातून ते बरेदेखील होत होते मात्र 14 च्या रात्री 2 वाजता अचानक ते या जगातून गेल्याचा फोन आला. लॉकडाऊनमुळे दिल्लीला स्वतः ड्राईव्ह करत जाण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईतील घर 2.30 वाजता सोडलं. सकाळी 6 पर्यंत गुजरातमधील वलसाड चेकपोस्टपर्यंत कसाबसा पोचलो पण पोलिसांनी अडवलं. सर्व परिस्थिती सांगूनही त्यांनी मला जाऊ दिले नाही. कारण माझे वडील गेले आहेत याचा पुरावा देणं मला शक्य नव्हतं. डेथ सर्टिफिकेट मिळणं लगेच शक्य नव्हतं. त्यामुळे हतबल होऊन मी अर्ध्या रस्त्यातून तसाच परत आलो. शेवटचे सर्व विधी माझ्या भावाने केले. पण माझ्या वडिलांना मी शेवटचे पाहू शकलो नाही याचे दुःख मला जन्मभर राहील. जेव्हा माझ्या कुटुंबाला माझी सर्वात जास्त गरज आहे तेव्हाच मी त्यांच्याबरोबर नाहीये याचंही दुःख राहील.’ लवकरात लवकर ही परिस्थिती सावरून घरी कधी जाता येईल याचीच सध्या अनुराग वाट पाहात आहे. त्याशिवाय अशा वेळी त्याची सर्वात जास्त घरी गरज असल्याचे त्याला वाटत आहे.
टीव्हीवरील या जोड्यांनी केले लपूनछपून लग्न, चाहत्यांना दिला धक्का
अनुरागसारखी वेळ कोणावरही न येवो
सध्या सगळेच लॉकडाऊनमुळे घरी आहेत. पण अशी परिस्थितीत कोणावरही न येवो अशीच सगळे सध्या प्रार्थना करत आहेत. अनुरागचे वडील जाऊन केवळ आठवडा झाला आहे. मात्र 3 मे पर्यंत तरी त्याला दिल्लीला त्याच्या घरी जाणं शक्य नाही. शिवाय त्याला सध्याच्या परिस्थितीत सावरायलाही त्याच्या जवळ कोणीही नाही. त्यामुळे केवळ त्याला बळ मिळू दे अशीच प्रार्थनाच त्याचा मित्रपरिवार सध्या करत आहे. दिल्लीला जाणं सध्याच्या परिस्थितीत शक्य नाही त्यामुळे आता पुढे काय असा प्रश्नही अनुरागसमोर आहे. मात्र अशी परिस्थिती कोणावरही न येवो असं त्यानेही यावेळी नमूद केलं आहे.
ब्लाऊज पीसपासून कसे शिवायचे मास्क.. सांगतेय विद्या बालन