ब्लाऊज पीसपासून कसे शिवायचे मास्क... सांगतेय विद्या बालन

ब्लाऊज पीसपासून कसे शिवायचे मास्क... सांगतेय विद्या बालन

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सगळ्यांनाच विशेष काळजी घेण्यास सांगितली जात आहे.घराबाहेर कोणत्याही कामासाठी बाहेर पडताना मास्क लावून बाहेर पडायला सांगितले आहे. पण सध्या मास्कच्या वाढत्या किमती पाहता आणि तुटवडा लक्षात घेता सगळ्यांनाच मास्क घेणे परवडेल असे होणार नाही. म्हणूनच यावर विद्या बालनने एक युक्ती काढली आहे. तिने घरीच असलेल्या ब्लाऊज पीसपासून उत्तम मास्क शिवले आहेत. याचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

प्रसाद ओकने स्वीकारलं हे अनोखं चॅलेंज

इन्स्टावर शेअर केला व्हिडिओ

लॉकडाऊनमुळे सगळेच सेलिब्रिटी आपल्या घरात आहेत. अनेक जण त्यांच्या मदतनीसांशिवाय असल्यामुळे घरातच काम करत आहेत. घरातील अत्यावश्यक सामान संपले तर ते बाहेर आणायला जाताना अधिक काळजी घ्यावी लागत आहे. ही काळजी म्हणजे मास्क घालून जाणे. त्यामुळेच घरीच चांगले मास्क कसे बनवायचे याचा एक व्हिडिओ विद्या बालनने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओला लोकांचीही भरपूर पंसती मिळाली आहे. तिच्या या व्हिडिओमुळे ती सध्या चर्चेत आली आहे. 

काटा लगा फेम शेफाली जरीवाला लागले मातृत्वाचे वेध

असा बनवला विद्याने फेस मास्क

विद्याने बनवलेला हा मास्क फारच सोपा आहे. कारण हा मास्क तिने घरी असलेल्या जुन्या साडी, ओढणी किंवा ब्लाऊज पीसचा उपयोग करुन बनवता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला घराबाहेर वेगळा कपडा घ्यायला जायची गरज नाही. विद्या बालनने हा मास्क बनवून त्याला ‘देश का मास्क’ असे नाव दिले आहे. विद्याचा हा व्हिडिओ देशासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल असा आहे. त्यामुळे तुम्हीही असा मास्क नक्कीच करुन पाहा.

विद्याचे व्हिडिओ फारच प्रसिद्ध

Instagram

सोशल मीडियावर विद्या बालनचे व्हिडिओ फारच प्रसिद्ध असतात. तिच्या व्हिडिओला नेहमीच चांगली प्रसिद्धी मिळते. त्यामुळे तिचा हा व्हिडिओही फारच चालला आहे. या व्हिडिओमध्ये अनेकांनी तिला ही सोपी गोष्ट सांगितल्यामुळे धन्यवादही दिले आहेत. 

Four more shots 3 मध्ये दिसेल का करीना कपूरची गँग

विद्या बालन सध्या काय करतेय?

विद्या बालनचा करीअरग्राफ पाहता तिने तिच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक गोष्टी ट्राय केल्या आहेत. तिने तिच्या करीअरची सुरुवात जाहिरातीच्या माध्यमातून केली. तुम्हाला जर जुनी व्हिलची जाहिरात आठवत असेल तर त्या जाहिरातीतून तिने काम केले होते जाहिरात म्युझिक अल्बम असे करत करत ती चित्रपटांमध्ये आली. तिचा ‘डर्टी पिक्चर’ हा चित्रपट इतका गाजला की,तिला अभिनेत्री म्हणून एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. त्यानंतर तिच्या अभिनयाची खऱ्या अर्थाने सगळ्यांना जाणीव झाली. नुकतीच ‘मिशन मंगल’ या चित्रपटात एका शास्त्रज्ञाच्या रुपात दिसली होती. तिच्या या जिद्दी भूमिकेचीही फारच तारीफ करण्यात आली. त्यानंतर विद्या बालनने कोणत्याही चित्रपटात काम केले नाही. 

बॉडी शेमिंगवरुन झाली ट्रोल

बॉडी शेमिंगवरुन अनेकदा सेलिब्रिटींना ट्रोल केले जाते. यामध्ये विद्या बालनचचेही नाव घेतले जाते. विद्या बालनचे लग्नानंतर अचानक वजन वाढले त्यामुळे तिला अनेकांनी ट्रोल केले.पण तरीही तिने कधीचहार मानली नाही. ती कायम आपल्या आत्मविश्वावासावर टिकून राहिली.