बॉलीवूड स्टार्स जिथे जातात तिथे त्यांच्यामागे नेहमीच कॅमेरा हा पोचतोच. मग या कॅमेरापासून वाचण्यासाठी हिरो आणि हिरोईन्सना कधी कधी चेहराही लपवावा लागतो. तुम्हाला जर लक्षात असेल तर कधी सारा अली खान बुरखा घालून बाहेर पडताना दिसते तर कधी कार्तिक आर्यन वेगळ्या लुकमध्ये बाहेर पडताना दिसला आहे. असंच काहीसं झालं एका बॉलीवूड अभिनेत्रीसोबतही. जिने आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर केला बनारचा दौरा आणि तिकडे तिला कॅमेराला टाळण्यासाठी लढवावी लागली शक्कल.
जान्हवीची बनारस डायरी
अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मोठी मुलगी जान्हवी मित्रमैत्रिणींसोबत बनारसच्या दौऱ्यावर आहे. आपल्या या दौऱ्याचे फोटो जान्हवीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअरही केले आहेत. जान्हवीने येथे गंगा आरतीमध्येही सहभाग घेतला. या दौऱ्याचं मुख्य आकर्षण ठरला तो जान्हवीचा साधा आणि सिंपल लुक.
वाचा – बॉयफ्रेंडच्या वाढदिवसासाठी आश्चर्य
दशाश्वमेध घाटावर गंगा सेवा निधीद्वारे आयोजित विश्व प्रसिद्ध दैनिक गंगा आरतीच्या आयोजनात जान्हवीने भक्तिभावाने सहभाग घेत आरती केली. तिच्या या भक्तीने आणि साधेपणाने तेथे उपस्थित सगळेच अवाक झाले.
जान्हवीचं साधं सोपं रूपडं
नेहमी जिमला जाताना शॉर्ट्समध्ये दिसणारी जान्हवी या संपूर्ण दौऱ्यात बहुतेकदा छानश्या सलवार कमीजमध्ये दिसली. तिने बनारसमध्ये नो मेकअप लुकला पसंती दिल्याचंही दिसलं. इथे तिने रिक्षातूनही प्रवास केला. तसंच बनारसमधील खाद्य पदार्थांचाही आस्वाद घेतला. जान्हवीच्या या फोटोंजवर तिचे काका आणि चुलत बहीण सोनम कपूरनेही कमेंट केली आहे. या फोटोजना जान्हवीच्या फॅन्सनीही पसंती दिली आहे.
थोडक्यात काय तर जान्हवीने इथे ग्लॅमरस लुकऐवजी जैसा देश वैसा भेसला पसंती दिली
लवकरच झळकणार या सुपरस्टारसोबत
जान्हवीने 2018 साली आलेल्या सैराटचा रिमेक असलेल्या धडकमधून बॉलीवूडमध्ये एंट्री केली. पण त्यानंतर तिचा एकही सिनेमा आला नाही. याचं कारण हे नाही की तिच्या प्रोजेक्ट्स नाहीत. उलट जान्हवीकडे सध्या रोमँटिक हॉरर चित्रपट ‘रूहआफ्जा’ ‘गुंजन सक्सेना’ वरील बायोपिक, दोस्ताना 2 आणि वेबसीरिज ‘घोस्ट स्टोरीज’ मध्येही ती दिसणार आहे. एवढंच नाहीतर ती दाक्षिणात्य सुपरस्टार अर्जुन रेड्डी फेम विजय देवरकोंडासोबत झळकणार आहे. या चित्रपटातून ती दाक्षिणात्य चित्रपटात डेब्यू करणार आहे. सध्या ती दोस्ताना 2 च्या चित्रीकरणात व्यस्त असून या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन आणि अजून नवा चेहरा दिसणार आहे.
जान्हवीनंतर खुशी कपूरलाही बॉलीवूडचे वेध
बॉलीवूडमध्ये आलेल्या इतर सेलिब्रिटी किड्सच्या तुलनेत जान्हवीने जरी अजून हवा तसा स्पीड पकडला नसला तरी तिची हळूहळू का होईना वाटचाल सुरू आहे. आता येत्या काळात तिच्या लुक्सऐवजी भूमिकांमुळे तिला जास्त प्रसिद्धी मिळणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.