सेलिब्रिटी झाल्यानंतर एखाद्याचे आयुष्य खासगी असे राहात नाही. प्रत्येकाला या सेलिब्रिटींच्या आयुष्यात झाकून पाहायचे असते. ते काय करतात? कोणाला डेट करतात ? कोणत्या ब्रँडचे कपडे वापरतात? हे सगळे माहीत करुन घ्यायचे असते.पण असे करताना त्यांना ट्रोल करण्याचीही संधी काहीजण सोडत नाही. असंच काहीसं झालं आहे अभिनेत्री नेहा पेंडसेसोबत. अभिनेत्री नेहा पेंडसेने नुकतेच बिझनेसमन शार्दुल व्याससोबत लग्न केले. पण त्याचा लठ्ठपणा आणि घटस्फोटीत असणे अनेकांना फारसे रुचलेले दिसत नाही, म्हणूनच की काय शार्दुलसोबत शेअर केलेल्या फोटोंखाली त्याच्या जाडीबद्दल आणि त्याच्या गत आयुष्याबद्दल बरेच काही बोलले जात आहे. पण नेहा ते ऐकून गप्प बसली नाही तर तिने ट्रोलर्सना असे काही खडेबोल सुनावले आहे की त्यांची चांगलीच बोलती बंद झाली आहे.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘आनंदी गोपाळ’ची बाजी
मला काहीच फरक पडत नाही- नेहा
नेहाला मुलाखतीदरम्यान या संदर्भात म्हणाली की, ही तीच लोकं आहेत जी माझा द्वेष करतात. कारण माझे काम त्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. शार्दुलबद्दल सांगायचे झाले तर त्याची आधी दोन लग्नं झालेली आहेत हे मला माहीत होते. त्याने माझ्यापासून काहीही लपवलेले नाही. त्यामुळे मला काही फरक पडत नाही. लोकं काय विचार करतात याच्याशी माझं काही घेणं-देणं नाही. असे बोल्ड उत्तर देत नेहाने पती शार्दुलची आणि त्यांच्या प्रेमाची बाजू उचलून धरली आहे.
शार्दुल घटस्फोटीत
नेहा पेंडसेच्या लग्नाच्या बातमीनंतर अनेकांनी शार्दुल कोण? याचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी शार्दुल हा बिझनेसमन असल्याचे कळले. पण या व्यतिरिक्त तो नेहाच्या आधी आणखी दोन वेळा विवाहबद्ध झाला आहे. पहिल्या दोन्ही लग्नातून त्याला प्रत्येकी एक मुलं देखील आहेत. त्यामुळे अनेकांनी तिच्या लग्नाच्या बातमीवर नाकंही मुरडली होती. पण नेहा कायमच बोल्ड वागत आली आहे. तिने या आधीही येणाऱ्या कमेंट्सचा कधीही विचार केला नाही. तिने शार्दुलला कधीही सोशल मीडियापासून लपवले नाही.
माझी बाजू कोणालाच नाही माहीत, पहिल्यांदाच अंकिता बोलली ब्रेकअपबाबत
केला शाही विवाहसोहळा
नेहाचा विवाहसोहळा फारच थाटामाटात पार पडला. तिने जानेवारी 2020 मध्ये लग्न केले. महाराष्ट्रीयन पद्धतीने तिचा विवाहसोहळा पार पडला. तिच्या लग्नाचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. तिच्या आऊटफिटचीही खूपच चर्चा झाली होती. संगीत पासून तिच्या रिसेप्शनपर्यंत तिने वेगवेगळे डिझायनर आऊटफिट घातले होते.
सध्या या मालिकेत करतेय काम
नेहा पेंडसेने हिंदी, मराठीच नाही तर दाक्षिणात्य भाषेतही आपली ओळख निर्माण केली आहे. 7 हून अनेक भाषांमध्ये तिने काम केले आहे. सध्या ती ‘भाभीजी घर पे है’ या मालिकेत गौरी भाभीच्या रोलमध्ये दिसत आहेत. सौम्या टंडनची जागा तिने या मालिकेत घेतली असून तिला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
दरम्यान, नेहला तिच्या नवऱ्यावरुन ट्रोल करणाऱ्यांनी थोडं जपून कारण तिला त्याचा काहीही फरक पडणार नाही.
दीपिका पादुकोणच्या ‘द्रौपदी’नंतर रणवीर सिंह साकारणार आता सूर्यपुत्र ‘कर्ण’