ADVERTISEMENT
home / मनोरंजन
राजेश्वरीचा अंदाज

फॅन्ड्रीची शालू होतेय दिवसेंदिवस बोल्ड, बघा तिचा ग्लॅमरस अंदाज

 फॅन्ड्रीची शालू अजूनही अनेकांना लक्षात असेल. तिचा तो भोळेपणा आणि तिचा अभिनय खूप लोकांना आवडला होता. पण आता ही शालू खूपच बदलली आहे. तिच्या सोशल मीडियावर तिचा एक हटके अंदाज प्रेक्षकांना दिसू लागला आहे. सतत सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलेली शालू हल्ली तिच्या बोल्ड अवतारात दिसत आहे. तिने हल्ली तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत ते पाहिल्यानंतर तुम्हाला तिचा ग्लॅमरस अवतार नक्कीच दिसेल. दरम्यान, शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात हिला प्रिया बापटचे लहान बहीण म्हणून देखील ओळखले जाते.

साराच्या ‘चकाचक’ गाण्यावर झालेत सेलिब्रिटीही फिदा

दिसते नेहमी ग्लॅमरस

राजेश्वरी खरात तिच्या इन्स्टावर सतत फोटो पोस्ट करत असते. वेगवेगळ्या रुपात ती कायम दिसते. कधी साडी तर कधी बोल्ड ड्रेस फॅशनमध्ये तिचा हात कोणीही धरु शकत नाही. ती सगळे कपडे उत्तम कॅरी करताना दिसते. त्यामुळे तिच्या फॅन्समध्येही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राजेश्वरी खरातने नुकतेच एक फोटोशूट केले आहे. ज्यामध्ये तिने न्यूज पेपर प्रिंटचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. या ड्रेसमध्ये ती आपली फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तिचा हा अंदाज पाहून अनेकांना नक्कीच धक्का बसला असेल. इतकेच नाही तर त्याआधी तिने काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्येही तिचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.

रिल्स करण्यात एक्सपर्ट

 राजेश्वरीला डान्स करायला खूपच जास्त आवडते कारण  ती तिचे काही रिल्स व्हिडिओ सतत शेअर करत असते. तिचे अनेक डान्स व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल देखील होत असतात. जर तुम्ही अजून तिचे व्हिडिओ पाहिले नसतील तर काही व्हिडिओ तुम्ही नक्की पाहायला हवे. सोशल मीडियावरील ट्रेंड करा फॉलो करायचा हे तुम्ही राजेश्वरीकडून शिकायला हवे.

ADVERTISEMENT

जुन्या गाण्यांची विशेष आवड

राजेश्वरीला जुन्या गाण्यांची विशेष आवड दिसते. कारण ती जुन्या गाण्यांवर अनेक व्हिडिओ करताना दिसते. तिने केलेल्या व्‍हिडिओला जास्ती जास्त लाईक मिळतात. जुन्या गाण्यांची निवड पाहता तिची ही आवड आहे असे म्हणावे लागेल. तिचे अनेक रिल्स खूपच हिट झालेले आहेत. राजेश्वरीचे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला याचा नक्कीच अंदाज येईल.

साडीत दिसते खूपच सुंदर

साडीत राजेश्वरीचे अनेक फोटो आतापर्यंत खूप जणांनी पाहिले असतील तिचा साडीतील लुकमधील अंदाज हा देखील खूप जणांना आवडतो. अगदी नऊवारी साडीपासून ते सहावारी साडीपर्यंत तिने साड्यांवरील फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच उठून दिसते. 

राजेश्वरीचा हा ग्लॅमरस अंदाज पाहता तिच्या प्रेमात पडावा असाच तिचा लुक आहे. 

लग्नानंतर विकी जैनने अंकिताला गिफ्ट केला मालदिव्जमध्ये लग्जरी व्हिला

ADVERTISEMENT
16 Dec 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT