ADVERTISEMENT
home / मनोरंजन
चकाचक गाण्याची चर्चा

साराच्या ‘चकाचक’ गाण्यावर झालेत सेलिब्रिटीही फिदा

 हाय चकाचक चकाचक हूँ मै… या गाण्याने सध्या सगळ्यांना वेड लावले आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक काहीही सुरु केलं तर तुम्हाला हे गाणं नक्कीच दिसेल. प्रेक्षकांनाच नाही तर सेलिब्रिटींनाही या गाण्याचं वेड लागलं आहे.  सेलिब्रिटींनी देखील या गाण्यावर आपले रिल्स व्हिडिओ बनवून पोस्ट केेले आहे. ए.आर. रहमानचे संगीत असलेल्या या गाण्याला इतकी पसंती मिळाली आहे की, सारा देखील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  साराने केलेला डान्स तर उत्तम आहेच.पण आता यावर सेलिब्स करत असलेला डान्ही एकदम चकाचक आहे असे म्हणायला हवे. जाणून घेऊया कोणत्या सेलिब्सला पडली आहे या गाण्याची भुरळ

 राणी गुणाजी आणि टीम

राणी – मिलिंद गुणाजी यांचा मुलगा अभिषेक गुणाजी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्यांच्या घरी सध्या लगीनघाई सुरु झालेली आहे. दरम्यान त्यांच्या घरात या नव्या गाण्यावर मस्त डान्स केलेला दिसत आहे. पुढे राणी गुणाजी तर त्यांच्या मागे मंजिरी भावे अर्थात सुबोध भावे याची बायको  आणि गँग दिसत आहे. त्यांनी या गाण्यावर मस्त डान्स केला आहे. त्यामुळे अर्थात #GoWithTrend  त्यांनीही फॉलो केलेला दिसत आहे.

अमृता खानविलकर

अमृता ट्रेंडच्या बाबतीत मागे राहील तरी कशी तिने देखील या गाण्यावर मस्त परफॉर्मन्स केला आहे.  अंकिता लोखंडेच्या लग्नासाठी तिने नेसलेल्या लाल रंगाच्या साडीमध्ये ती या व्हिडिओमध्ये दिसत आहे. चकाचक गाण्यावर ती मस्त थिरकताना दिसत आहे. अमृता खानविलकर उत्तम डान्स करते हे आपण सगळेच जाणतो. ती अधून मधून तिच्या डान्सचे वेगवेगळे फोटो पोस्ट करत असते. जे सगळ्यांंना बघायला खूप आवडतात. आता त्यामध्ये आणखी एका गाण्याची भर पडली आहे.

सोशल मीडियावर धुमाकूळ

चकाचक गाण्याने सेलिब्सनाच नाही तर सोशल मीडियावरील सगळ्यांनाच वेड लावले आहे. या गाण्यावर अनेक इन्फुएन्सर देखील थिरकताना दिसत आहे. तुम्हाला डान्स व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर तुम्हाला अनेक ठिकाणी हे व्हिडिओ पाहायला मिळतील. त्यामुळे सध्या या गाण्याची चांगलीच चलती आहे असे म्हणायला हवे. अनेकांनी या गाण्यावर स्टेप्स बसवून डान्स केलेला आहे.  खूप दिवसांनी ए.आर रहमानने असे हिट गाणे दिल्यामुळे खूप जणांनी हे गाणं देखील एन्जॉय केला आहे.

ADVERTISEMENT

राजेशाही थाटात केले अंकिता लोखंडेने लग्न, मराठी कलाकारांची हजेरी

साराची होतेय चर्चा

सारा अली खान कायमच चर्चेत असते. तिचे मीडियासोबतचे वागणे यामुळे ती कायमच लोकांना आवडते. ती नबाव असली तरी देखील सर्वसामान्य राहायला तिला आवडते. त्यामुळे तिला नेहमीच पसंती मिळते. तिचा अतरंगी रे हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत धनुष आणि अक्षय कुमार यांच्या प्रमुख भूमिका दिसणार आहेत. या चित्रपटाची आता सगळ्यांना उत्सुकता आहे. 

तुम्हीही हे गाणं अजून पाहिले नसेल तर आताच बघा

Bigg Boss Marathi : फिनालेकडे घौडदौड सुरु,अनेक समीकरणे बदलली

ADVERTISEMENT
15 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT