ADVERTISEMENT
home / मनोरंजन
टिप टिप बरसा पानीवर थिरकताना कतरिना

सध्या जिथे तिथे होतेय कतरिनाच्या टिप टिप बरसा पानीची चर्चा, रविना म्हणाली

 एखाद्या गाण्याचा रिमेक आला की, त्याची काही काळासाठी चर्चा तर होतेच. एखाद्या जुन्या गाण्याचा रिमेक आपल्यासाठी काहीही नवा नाही. आतापर्यंत अनेक गाण्यांचे रिमेक आलेले आहेत. पण गोल्डन इरामधील अशी काही गाणी असतात जी आहे त्या रुपातच लोकांना ऐकायला आवडतात. सध्या ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. एकेकाळी ज्या गाण्यावर आपल्या मोहक अदा दाखवत रविना नाचली होती. आता त्याच गाण्यावर नव्या अंदाजात कतरिना नाचताना दिसत आहे. ‘सूर्यवंशी’ या चित्रपटातील हे गाणे खूप जणांना चांगलेच आवडले आहे. यावर मूळ टिप टिप बरसा पानी गर्ल म्हणजे अभिनेत्री रविना टंडन काय म्हणाली ते घेऊया जाणून

पूनम पांडे पुन्हा चर्चेत, पतीविरोधात केली तक्रार

रविना म्हणाली…

सूर्यवंशी हा चित्रपट रिलीज होण्याआधी या गाण्याची झलक सगळीकडे प्रदर्शित करण्यात आली होती. कोरिओग्राफर फराह खान हिने या डान्सची कोरिओग्राफी केली असून तिने त्या आधी रविनाचे भरभरुन कौतुक केले आहे. फराहने ज्यावेळी या गाण्यासाठी अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या त्यावेळी तिने रवीना काय म्हणाली ते अगदी आर्वजून सांगितले आहे. रविनाने गाणे पाहिल्यानंतर पहिला फोन फराहला केला आणि सांगितले की, गाणं एकदम मस्त झाले आहे आणि कतरिना या गाण्यामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. त्यामुळे नक्कीच या गाण्याचे रिमिक्स झाले हे रवीनाला आवडले आहे. हे गाणे सूर्यवंशी चित्रपटात अक्षय- कतरिनावर चित्रित झालेले आहे. 

कतरिना कॅफ झाली ‘बोटॉक्स क्वीन’ प्लास्टिक सर्जरीने बदलला चेहरा

ADVERTISEMENT

थिएटरमध्ये मिळाला चांगला प्रतिसाद

कोरोना काळानंतर थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा ‘सूर्यवंशी’ हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाने आपले खाते चांगलेच उघडले आहे. खूप जणांनी इतक्या वर्षानंतर थिएटरमध्ये जाऊन पिक्चर पाहणे पसंत केलेले आहे. त्यामुळे रोहित शेट्टीचे थांबणे हे सार्थकी ठरले आहे. असे म्हणायला हवे. सिंबा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पाठोपाठ काही काळानंतर हा सूर्यवंशी येणे अपेक्षित होते. याची घोषणा आधीच झाली होती. चित्रपटही तयार होता. पण कोरोनामुळे थिएटर बंद असताना ओटीटीवर चित्रपट रिलीज करणे रोहित शेट्टीला नको होते. अखेर त्याने चित्रपटगृहे सुरु झाल्यानंतरच चित्रपट रिलीज केला आहे.

तीन हिरोंच्या मुख्य भूमिका

सिंघम, सिंबा आणि सूर्यवंशी अशी तीन समाजातील चांगल्या व्यक्तिंची प्रतिके असून वाईटावर चांगल्याची मात असा संदेश यातून देण्याचा प्रयत्न केला आहे.  जो अनेकांना आवडला आहे. वाईटावर चांगल्याची मात आणि पोलिसांची मलीन प्रतिमा स्वच्छ करण्याचा हा प्रयत्न खूप जणांना आवडलेला आहे. त्यामुळेच या चित्रपटात तीन महत्वाचे हिरो आहेत. अजय देवगण, रणवीर सिंह आणि आता अक्षय कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिंघममध्ये अजय सोबत काजल अग्रवाल, सिंघम रिर्टन्समध्ये करिना कपूर, सिंबामध्ये रणवीरसोबत सारा अली खान आणि आता सूर्यवंशीमध्ये अक्षयकुमारसोबत प्रमुख भूमिकेत कतरिना कैफ दिसली आहे. 

तुम्ही अद्याप हा चित्रपट पाहिला नसेल तर तो जरुर पाहा आणि कतरिनाने केलेला डान्स कसा वाटला नक्की कळवा

10 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT