ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
कतरिना कॅफ झाली ‘बोटॉक्स क्वीन’ प्लास्टिक सर्जरीने बदलला चेहरा

कतरिना कॅफ झाली ‘बोटॉक्स क्वीन’ प्लास्टिक सर्जरीने बदलला चेहरा

अभिनेत्री कतरिना कैफ सध्या खूप चर्चेत आहे. बऱ्याच दिवसांनी ती पुन्हा एकदा सूर्यवंशी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येत आहे. अक्षय कुमारसोबत कतरिना कैफची यात मुख्य भूमिका आहे. दोन वर्ष रखडल्यानंतर आता दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सूर्यवंशी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र त्याआधीच चित्रपटाची अभिनेत्री कतरिना कैफ मात्र सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे. याचं कारण कतरिनाचा बदललेला लुक आहे.

Bigg Boss Marathi: गायत्री-मीराचे उघडले डोळे, जय-उत्कर्षवर झाले नाराज

का होतेय कतरिना ट्रोल

कतरिना कैफने नुकतंच तिचं एक नवं फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या फोटोशूटमध्ये तिचा बदलेला लुक पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली. कतरिनाने हे फोटोशूट एका मासिकासाठी केलेले आहे. कव्हरपेजवरील कतरिनाचा चेहरा मात्र यात काहिसा वेगळाच दिसत आहे. बॉलीवूड सेलिब्रेटी सतत आकर्षक दिसण्यासाठी स्वतःच्या लुकमध्ये बदल करत असतात. यासाठी बोटॉक्स, लेझर आणि प्लास्टिक सर्जरीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. बऱ्याचदा अशा महागड्या ट्रिटमेंट केल्यानंतर सेलिब्रेटीजचा लुक होता त्यापेक्षा वाईट दिसू लागतो. ज्यामुळे नेटकरी त्यांच्या आवडत्या कलकारांना ट्रोल करतात. आता या कलाकारांच्या लिस्टमध्ये कतरिनाचे नावही जोडले गेले आहे. कारण चाहत्यांच्या मते कतरिनाने प्लास्टिक सर्जरी आणि बोटॉक्सने स्वतःचा चेहरा बिघडवून घेतला आहे. 

सुश्मिता सेनच्या घरी दिवाळीत लक्ष्मीचं आगमन, चारू असोपा झाली आई

ADVERTISEMENT

कतरिना झालीय बोटॉक्स क्वीन

सूर्यवंशीच्या प्रदर्शनाआधीच कतरिना ट्रोलिंगमध्ये वाईट पद्धतीने फसली आहे. कारण सोशल मीडियावर सूर्यवंशीपेक्षा तिच्या बिघडलेल्या लुकची चर्चा जास्त होतेय. लोकांनी यासाठी तिला बोटॉक्स क्वीन असं नावही ठेवलं आहे. चाहत्यांना कतरिनाचा हा नवा लुक मुळीच आवडलेला नाही. त्यामुळे ते त्यांच्या लाडक्या अभिनेत्रीवर खूपच नाराज झाले आहेत. “कतरिना लग्न तेव्हाच लग्न करेल जेव्हा तिला विश्वास वाटेल की आता तिच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करता येणार नाही” किंवा “अरे आता हिला काय झालं हिने तर बोटॉक्स केलं आहे” अशा प्रकारच्या कंमेट्स तिला या फोटोजवर मिळत आहेत. कतरिनाला मात्र याची काहिच पर्वा दिसत नाही. कारण ती मात्र मस्तपैकी सूर्यवंशीच्या प्रमोशनसाठी अनेक शोजमध्ये सहभागी होताना दिसत आहे. कतरिना कैफ नुकतंच बिग बॉस 15, कौन बनेगा करोडपती 12, दी बिग पिक्चर, झी मराठी पुरस्कार सोहळा अशा अनेक कार्यक्रमात सहभागी झाली होती. 

प्राजक्ताच्या ‘साजनी’ या नवीन गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती

03 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT