‘बिग बॉस मराठी’ मध्ये आपली एक वेगळी जागा निर्माण करणारी आणि मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवणारी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने तेजस देसाईशी लग्न केले आहे. रविवारी हा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. शर्मिष्ठाने काही महिन्यांपूर्वीच तेजसशी साखरपुडा करून प्रेक्षकांना सुखद धक्का दिला होता. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शर्मिष्ठाने आपल्या मेंदीपासून ते लग्नापर्यंतचे सर्व फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्याबद्दल शुभेच्छादेखील मानल्या आहेत. मराठमोळ्या पद्धतीने अगदी थाटामाटात शर्मिष्ठाने कुटुंब आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत लग्न केले.
या मालिकांमधून आला टिकल्यांचा प्रसिद्ध ट्रेंड, अभिनेत्रींमुळे गाजला ट्रेंड
फोटो झाले व्हायरल
शर्मिष्ठाने अगदी आपल्या मेंदीपासून ते लग्नापर्यंत सर्व फोटो पोस्ट केले आहेत. या सर्व फोटोंमध्ये शर्मिष्ठा आणि तिचा नवरा तेजस खूपच आनंदी दिसत असून स्वतःच्याच लग्नात दोघांनी धमाल केली असल्याचे व्हिडिओदेखील व्हायरल झाले आहेत. तर शर्मिष्ठाने लग्न सोहळा संपन्न झाल्याचीदेखील भावूक पोस्ट केली आहे. ‘लग्न सोहळा संपन्न. आज सगळ्यांनी भरभरून शुभाशीर्वाद दिले, खूप प्रेम दिलं, शुभेच्छा दिल्या, तुम्हा सगळ्यांच्या सदिच्छांमुळेच आम्ही आज आमच्या नव्या प्रवासाची छान सुरुवात करत आहोत. आज सगळ्यांनाच भेटणं, रिप्लाय देणं शक्य झालं नाही, पण आम्ही दोघेही तुम्हा सगळ्यांचे मनापासून ऋणी आहोत. सगळ्यांनी काळजी घ्या आणि असंच प्रेम करत राहा.’ असं शर्मिष्ठाने पोस्ट करून तेजस आणि आपल्याकडून मनापासून आभार मानले आहेत. तर तेजसबरोबर असणाऱ्या प्रत्येक फोटोलो अत्यंत सुंदर आणि प्रेमाच्या कॅप्शनही देण्यात आल्या आहेत. ‘रंग दे तू मोहे गेरूआ’, मला तुझ्याबरोबरच मोठं व्हायचं आहे अशा स्वरूपाच्या शर्मिष्ठाच्या कॅप्शन या तिच्या तेजसवरील प्रेमाची साक्ष देत आहेत. तर तेजसही शर्मिष्ठाला अत्यंत आनंदी ठेवत असल्याचं दिसून येत आहे. तेजसनेही आपल्या सोशल मीडियावर सगळे फोटो शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे.
अभिनेत्री आशा नेगीने ‘या’ अभिनेत्याच्या मारली कानाखाली, झाले व्हायरल
लॉकडाऊनमध्ये अनेक सेलिब्रिटींनी केले लग्न
लॉकडाऊनमध्ये अनेक सेलिब्रिटींनी लग्न केले आहे. आता शर्मिष्ठाचाही या यादीमध्ये समावेश झाला आहे. मात्र आता बऱ्याच गोष्टी अनलॉक होत असल्यामुळे शर्मिष्ठाला तिच्या लग्नात जास्त मजा करता आल्याचं पाहायला मिळतं आहे. शर्मिष्ठाचे जवळचे मित्रमैत्रिणीही तिला शुभेच्छा द्यायला तिच्या लग्नात आले होते. गेले तीन दिवस शर्मिष्ठाकडे या लग्नसोहळ्याची धमाल चालू असल्याचं तिने पोस्ट केलेल्या फोटोंवरून दिसून येत आहे. वधू आणि वर दोघांनीही या लग्नात अगदी धमाल केली आहे हे स्पष्ट आहे. उंच माझा झोका, जुळून येती रेशीमगाठी, मन हे बावरे या मालिकांमधून घराघरात पोहचलेल्या शर्मिष्ठाचा फॅन फॉलोईंगही खूप आहे. पण तिला खरी ओळख मिळाली ती बिग बॉसच्या मराठी पर्वातून. शर्मिष्ठाचे हे दुसरं लग्न असून तिने पहिल्यांदा अभिनेत्री अर्चना निपाणकरचा भाऊ अमेय निपाणकर याच्याशी लग्न केले होते. तर आपला घटस्फोट झाल्याचे तिने बिग बॉसमध्ये स्पष्ट केले होते. मात्र आता तेजस आयुष्यात आल्यापासून आपण अत्यंत आनंदी असल्याचंही तिने सांगितलं आहे. ‘POPxo मराठीकडून शर्मिष्ठा आणि तेजसला पुढील वाटचालीस शुभेच्छा!’
Bigg Bossफेम सना खानने फिल्म इंडस्ट्रीला केला अलविदा
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक