रुपेरी पडदा हा अनेकींना भूरळ घालतो. आपल्याला काम मिळावे, प्रसिद्ध व्हावे अशी अपेक्षा अनेकांना असते. इंडस्ट्रीत आल्यानंतर अनेकांना ते यश मिळते देखील. पण त्यानंतरही या झगमगीत जीवनापासून दूर जाण्याचा आणि आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा विचार अनेक जण करतात. त्यापैकीच आहे अशी एक अभिनेत्री जिच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. एकेकाळी या अभिनेत्रीचे नाव अनेकांच्या तोंडी होते. अनेक प्रोजेक्ट्समध्येही ती दिसली होती. पण आता ती या सगळ्यापासून खूपच दूर गेली आहे. आम्ही बोलत आहोत उदिता गोस्वामीबद्दल (Udita Goswami)…. उदिताचा विसर अनेकांना पडला असला तरी देखील ती सोशल मीडियावर चांगलीच ॲक्टिव्ह असते.
अधिक वाचा : काजोल आणि सूर्या होणार आता ऑस्कर समितीचे सदस्य, चाहते झाले खूष
उदिता प्रगतीच्या शिखरावर
मल्लिका शेरावत, तनुश्री दत्ता यांच्या काळात अनेक बोल्ड चित्रपट येत होते. अशाच काही चित्रपटांमधून उदिताची एंट्री झाली होती. उत्तम फिगर, सौंदर्य आणि बोल्ड सीन यामुळे ती अल्पावधितच चांगली प्रसिद्ध झाली. तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. अनेक मोठ्या कलाकारांसोबत तिने काम केले. त्यानंतर ती अचानक गायब झाली. पण आता तिचे नाव पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिचा नवरा मोहित सुरी याचा येणारा नवा चित्रपट. एक व्हिलन रिटर्न’ या चित्रपटाचे काही पोस्टर्स तिने शेअर केले आहेत. यावरुन ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मोहित सुरी हा तिचा नवरा असून त्याच्या अनेक चित्रपटांमध्ये तिने कामं केली आहेत. या पोस्टमुळेच अनेकांनी तिची प्रोफाईल स्क्रोल केल्यानंतर ती किती वेगळी दिसते याची चर्चा होऊ लागली आहे.
मोहितशी केले लग्न
इंडस्ट्रीत मोहितचे नाव फारत प्रसिद्ध आहे. ज्यावेळी उदिता ही इंडस्ट्रीमध्ये होती. त्यावेळी मोहित आणि तिच्या डेटिंगच्या चर्चा खूप होत्या. या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा खूप वाढलेल्या असताना 2013 साली तिने मोहित सुरीशी लग्न केले. मोहित सुरीसोबत लग्न केल्यामुळे तिचे नाते भट आणि हाश्मी परिवाराशी जोडले गेले. आलिया भटची उदिता ही वहिनी लागते. तर इम्रान हाश्मी हा तिचा नात्याने दीर लागतो. लग्नानंतर या रुपेरी पडद्यापासून तिने दूर राहणेच पसंत केले. सध्या उदिताची इनस्टा प्रोफाईल पाहिल्यानंतर ती फारच कमी ॲक्टिव्ह आहे अशी दिसते. पण तिच्यात फारसा काही फरक पडला आहे असे दिसत नाही. तिला आणि मोहितला दोन मुलं असून ती सध्या आईची भूमिका खूप मस्त पार पाडताना दिसत आहे.
अधिक वाचा : अंकिता लोखंडेचं नवं घर, तुलसी विरानी स्टाईलमध्ये केलं सर्वांचं स्वागत
नात्यातही आला होता दुरावा
उदिता – मोहितच्या नात्यातही दुरावा आला होता. अशा काही बातम्याही फिरत होत्या. उदिताने मोहितचे कॉल रेकॉर्डस मागवले होते. त्यामुळे त्यांचे नाते तुटणार असे सांगितले जात होते. पण असे काहीही झाले नाही. उदिता आणि मोहित यांनी एकमेकांना कधीही सोडले नाही. आता त्यांच्या लग्नाला जवळ जवळ 11 वर्षे झाली आहेत. त्यांचा संसार सुखाचा सुरु आहे. उदिता पुन्हा कधी परतेल असे काही दिसत नाही.
तिच्या चाहत्यांना तिला पाहून कसे वाटले ? नक्की कळवा.