ADVERTISEMENT
home / मनोरंजन
वीणा जगताप

अभिनेत्री वीणा जगतापच्या फोटोवर अश्लील कमेंट, वीणाने घेतला समाचार

सेलिब्रिटींच्या फोटोला कमेंट या हजारो-लाखोंच्या घरात पडतात. आता त्यापैकी सगळ्याच कमेंट चांगल्या असतात तर अजिबात नाही. बरीच जण त्या फोटोखाली अश्लील कमेंट्सचा भडीमार करतात. दुर्लक्ष करण्याची एक हद्द संपली की सेलिब्रिटीसुद्धा आपला राग व्यक्त करतात. असेच काहीसे घडले आहे अभिनेत्री वीणा जगतापसोबत. तिने काही दिवसांपूर्वी एक फोटो शेअर केला तिच्या या फोटोखाली खूप जणांनी कमेंट्स केल्या. पण एका नेटकऱ्याने तिला डीएम करत फारच अश्लील भाषा वापरली. त्यानंतर भडकलेल्या वीणाने त्याचा असा काही समाचार घेतला की, तो तरुण माफी मागू लागला.

डीएम करत अश्लील भाषा

 वीणाच्या बहिणीचे नुकतेच लग्न झाले आहे. तिने बहिणीच्या लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. तिने लग्नात एक लाल रंगाचा सुंदर लेहंगा घातला होता. फुल स्लिव्हज आणि कुठूनही काहीही आक्षेपार्ह दिसणार नाही असा वीणाचा हा सुंदर डिझायनर लेहंगा होता. यामध्ये वीणा दिसतही सुंदर होती. पण या फोटोमध्ये एका तरुणाने अश्लीलता शोधून काढत तिला तिच्या काही खास भागांमध्ये नको नको ते प्रश्न विचारले. शेवटी वीणाने न राहवत त्या मुलाचे स्क्रिन शॉट शेअर करत त्याची महिती दिली. त्यामुळे ही गोष्ट कळली. वीणाने उचलेले असे कडक पाऊल पाहता तो मुलगाही घाबरुन गेला आणि त्याने माफी मागितली. 

जलेबी बेबी’ लुकमुळे मल्लिका शेरावत झाली ट्रोल

वीणाने लिहिली रितसर पोस्ट

अनेकदा सगळ्यांना वाटते की, सेलिब्रिटींना कितीतरी डीएम येत असतील. ते कुठे काहीही लिहिले तरी पाहणार आहेत. नको त्या मेसेजकडे नक्कीच दुर्लक्ष करत असतील. पण प्रेमाने फॉलो करणाऱ्यांना ते नक्कीच रिप्लाय करतात. पण आता ज्या मुलाने वीणाला पर्सनल  मेसेज करुन त्रास दिला त्याने त्या चॅटमध्ये काय काय म्हटले त्याचा तिने स्क्रिनशॉट काढला आहे. हा तरुण वीणाला तिचा रेट विचारत आहे? तिच्या शरीराच्या वाढलेल्या मापांबद्दल अत्यंत निर्लज्जपणे विचारत आहे. ते तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे. तिने आणि शिव ठाकरेने याचा पाठपुरावा करत त्या मुलाचा शोध लावला आहे. तिने त्याच्या अकाऊंटची माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सगळ्यांनीच वीणाला पाठिंबा दिला आहे. 

ADVERTISEMENT

मुलगी झाली हो’… अभिनेत्री स्मिता तांबे झाली आई

फॅन्सनी केले कौतुक

वीणाने ही पोस्ट टाकल्यानंतर तिच्या फॅन्सनी तिला सपोर्ट केला आहे. अशापद्धतीने त्यांचे भांडे फोडायला हवे. त्यांना योग्यवेळी शिक्षा मिळायलाच हवी असे देखील म्हटले आहे. वीणा-शिवच्या फॅन्सनी कायम त्यांच्या जोडीचा आदर केला आहे. त्यामुळे अशापद्धतीने ट्रोल करु नका. स्त्रियांचा मान राखा अशा कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान, वीणा ही ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेत दिसली होती. पण तिला या मालिकेचे शूटिंग शेड्युल न जमल्यामुळे तिने ही मालिका सोडून दिली. 

सध्या वीणाला कमेंट करणाऱ्या त्या व्यक्तीवर सगळ्यांचाच डोळा आहे. त्यामुळे त्याने सावध राहणेच चांगले

शनाया कपूरला पाहून म्हणाले ही तर दुसरी अनन्या पांडे

ADVERTISEMENT
02 Sep 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT