ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
शनाया कपूर

शनाया कपूरला पाहून म्हणाले ही तर दुसरी अनन्या पांडे

कपूर घराणे आणि बॉलिवूड यांचे चांगलेच कनेक्शन आहे. कपूर खानदातील अनेक चेहरे आतापर्यंत बॉलिवूडमध्ये आलेले आहेत. आता यामध्ये आणखी एका चेहऱ्याची भर पडली आहे. तो चेहरा म्हणजे शनाया कपूर. शनाया कपूर ही संजय कपूर यांची मुलगी असून ती आता बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. नुकतीच तिची एक जाहिरात आली आहे. या जाहिरातीत पाहून बॉलिवूडकरांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.पण रसिक मायप्रेक्षकांनी मात्र तिला ट्रोल केले आहे. तिला पाहून तिला ही तर दुसरी अनन्या पांडे अशी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही ही जाहिरात पाहिली का?

…म्हणून मयुरी देशमुख दिसते इतकी सुंदर, शेअर केलं सौंदर्याचं रहस्य

शनाया कपूरची पहिली जाहिरात

शनाया कपूरने एका स्ट्रेटनिंग मशीनसाठी जाहिरात केली आहे. ही जाहिरात करण जोहरने पोस्ट केली आहे. #Missperfect नावाने शूट कऱण्यात आलेल्या या अॅड मध्ये शनाया अगदी पहिल्या फ्रेमपासून अनन्यासारखीच दिसते असे सगळ्यांचे म्हणणे आहे. इतकेच नाही तर शनायाचा आवाज सुद्धा अनन्यासारखाच दाखवण्यात आला आहे. बरं या जाहिरातीमध्ये विशेष असे काही नाही. एका स्ट्रेटनरच्या जाहिरातीसाठी काम करताना शनाया दाखवण्यात आली आहे. ती इतकी वेंधळी आहे की नुडल्स घाताना ती संपूर्ण कपड्यांवर ते पाडते. तोंड रंगवते. पण तिचे केस काही खराब होत नाहीत. तिचे केस शेवटपर्यंत चांगलेच दिसत राहतात. ही जाहिरात बी टाऊनला क्लासी वाटत असली तरी खूप जणांना ही जाहिरात अजिबात आवडलेली नाही. त्यामुळेच तिच्यावर टीका होत आहे. इतकेच नाही तर तिची तुलना थेट अनन्याशी करण्यात येत आहे.

बिग बॉस मराठी: गॉसिपला उधाण, हे कलाकार करणार प्रवेश

ADVERTISEMENT

शनायाचा बोलबाला

शनाया ही अजून बॉलिवूड पदार्पणाआधीच फार चर्चेत आहे. तिचे सोशल मीडियावर बरेच चाहते आहेत. तिचा फॉलोवर्सचा आकडा पाहता बॉलिवूडमध्ये तिने पदार्पण केल्यानंतर तिचे आणखी चाहते वाढणार आहे याची शक्यता आहे. ती वेगवेगळे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. त्यामुळे आता तिच्या या जाहिरातीवर चर्चा होणार यात काही शंका नाही. पण अनन्याशी तिची तुलना होणे तिच्या बॉलिवूड करियरसाठी अजिबात चांगले नाही यात काही शंका नाही. तुम्हाला या बद्दल काय पाहता तुम्हाला काय वाटते. 

अनन्याचा होतो भास

Instagram

काहीच वर्षांपूर्वी अनन्याला करण जोहरने लाँच केले. ‘स्टुडंट ऑफ द इयर’ (student Of The Year) या चित्रपटातून तिने पदार्पण केले. पण या चित्रपटात तिला फारच मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. त्यानंतर तिने करणच्या अनेक चित्रपटात काम केले. अनेक जाहिराती केल्या आहेत. 22 वर्षांची अनन्या पांडे चंकी पांडेची मुलगी असून ती सध्या 22 वर्षांची आहे. तिचा 2021 मध्ये आणखी एक चित्रपट येणार आहे ज्याची तयारी ती सध्या करत आहे. इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह असलेली अनन्या कायमच चर्चेत असते. तिच्या अनेक फोटोजला प्रेक्षकांचे लाईक्स मिळत असतात.  त्यामुळे तिची चर्चा कायम असते. 

तुम्हाला शनायाला पाहून अनन्याची आठवण झाली का?

शाहिद कपूर मीराला पाठवतो ‘हे’ मेसेज, मीरा कपूरने शेअर केला स्क्रीनशॉट

ADVERTISEMENT
01 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT