एकता कपूरच्या नागिनचा पाचवा सिझन नुकताच सुरू झाला आहे. नागिन हा टेलिव्हिजनवरील एक सुपरहिट शो आहे. सुपरनॅचरल पॉवरवर आधारित मालिका प्रेक्षकांना नेहमीच आवडतात मात्र एकताचा हा शो नेहमीच टॉप रेटिंगवर असतो. म्हणूनच तिने याचे आतापर्यंत अनेक सिझन हिट केलेले आहेत. नागिन मालिकेच्या पाचव्या सिझनच्या प्रोमोवरून या सिझनची इच्छाधारी नागिण हिना खान साकारणार असं वाटत आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या शोमध्ये हिनाची भूमिका काही काळापुरतीच असून त्यानंतर सुरभि चंदना या शोची मुख्य अभिनेत्री म्हणजेच इच्छाधारी नागिण असेल. हा सिझन सुरू झाल्यावर त्यामागचं गुपित सर्वांना उघड होणारच आहे. म्हणूनच आपण याआधीच्या चार सिझनमध्ये कोणकोणत्या अभिनेत्रींनी नागिणीची भूमिका साकारली ते पाहूयात…
मौनी रॉय –
नागिनच्या पहिल्या सिझनमध्ये मौनी रॉय प्रमुख भुमिकेत दिसली होती. तिला या शोमधून एवढी लोकप्रियता मिळाली होती की एकताने नागिनच्या दुसऱ्या सिझनमध्येही प्रमुख भूमिकेसाठी मौनीलाच सिलेक्ट केलं होतं. तिसऱ्या भागातही तिने गेस्ट अपिअरन्स देत एक छोटीशी भूमिका साकारली होती. पहिल्या सिझनमध्ये तिचे नाव शिवन्या होते तर दुसऱ्या सिझनमध्ये शिवांगी. थोडक्यात या दोन्ही सिझनमध्ये तिने इच्छाधारी नागिण साकारून टेलिव्हिजवर धुमाकूळ घातला होता.
अदा खान –
नागिनच्या दुसऱ्या सिझनमध्ये अभिनेत्री अदा खान हिने शेषा आणि त्यानंतर यामिनीची भुमिका साकारली होती. अदा खानने तिसऱ्या सिझनमध्येही गेस्ट अपिअरन्स दिला होता. या दोन्ही सिझनमध्ये तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना प्रंचड आवडली होती.
सुरभि ज्योती –
नागिनच्या तिसऱ्या सिझनमध्ये अभिनेत्री सुरभि ज्योती नागिणीच्या रूपात झळकली होती. तिने बेला आणि श्रावणी या भूमिका यात साकारल्या तर तिसऱ्या भागातही गेस्ट अपिअरन्स देत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
अनीता हंसनंदानी –
अनिता हंसनंदानीनेही नागिनच्या तिसऱ्या आणि चौथ्या सिझनमध्ये विशाखाच्या भूमिकेत दिसली होती. नागमणी मिळवण्यासाठी ती चौथ्या सिझनध्येही परत आलेली दाखवण्यात आली होती. मात्र या सिझनमध्ये तिचे मुद्रिका या नावामध्ये परिवर्तन झालेलेल दाखवण्यात आले होते.
रक्षंदा खान –
रक्षंदा खानने सुमित्रा या नागिणीची भूमिका तिसऱ्या सिझनमध्ये साकारली होती. मात्र तिची भूमिका फक्त याच सिझनपुरती मर्यादित होती आणि जास्त शक्तीशाली असलेल्या नागराणी श्रावणीकडून तिचा मृत्यू झालेला यात दाखवण्यात आला होता.
निया शर्मा –
नागिनचा चौथा भाग चांगलाच गाजला होता. लॉकडाऊनमुळे बंद पडलेला हा शो लॉकडाऊन संपताच पुन्हा सुरू झाला. लॉकडाऊननंतर काही भागाचं शूटिंग पुर्ण करून चौथा सिझन संपवण्यात आला. या सिझनची मुख्य नायिका होती निया शर्मा. निया शर्माने यात वृंदाची भूमिका साकारली होती. नियाला तिच्या दिलखेचक अदांमुळे या सिझनमध्ये चांगलीच प्रसिद्धी मिळाली.
जास्मिन बसीन –
जास्मिनने चौथ्या भागात एका नागिणीची भूमिका साकारली होती. ती या भागात मान्यताची दत्तक मुलगी या रूपात दिसली. ती शलाका या नावाने तिच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी या भागात अवतरली आहे असं दाखवण्यात आलं होतं. मात्र तिने हा शो मध्येच सोडून दिल्यामुळे तिच्याजागी अभिनेत्री रश्मी देसाईने ही भूमिका पुर्ण केली होती. रश्मी देसाई बिग बॉसमधून बाहेर पडल्यावर या शोमध्ये दाखल झाली होती.
या व्यतिरिक्त नागिन च्या चौथ्या भागात सयांतनी घोष हीने मान्यताची भूमिका साकारली होती तर करिष्मा तन्ना हिने तिसऱ्या सिझनमध्ये रूही या नावाने गेस्ट अपिअरन्स दिला होता.
आता लवकरच नागिनच्या पाचव्या भागात दोन नव्या इच्छाधारी नागिण प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.शनिवारी आणि रविवारी सुरू झालेल्या एपिसोजमधून या सिझनमध्ये मागच्या सिझनपेक्षा काहीतरी वेगळं पाहायला मिळेल अशी आशा वाटत आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
करिना कपूरने नेपोटिझमवर सुनावले खडे बोल, यावर चर्चा होणंच विचित्र वाटतं
बॉलिवूडच्या या अभिनेत्रींची ओळख आहे त्यांची उंची
संगीतप्रेमींसाठी मेजवानी, लता मंगेशकर मराठी गाणी (Lata Mangeshkar Marathi Songs)