सध्या देशभरात सगळीकडे लॉकडाऊन चालू आहे. या लॉकडाऊनच्या काळात आता खरंच मनोरंजनाचीही गरज आहे. कारण सध्या सगळेच घरात असल्यामुळे कोणतेही मनोरंजनात्मक कार्यक्रमही चालू नाहीत. पण आता या लॉकडाऊनच्या काळात मात्र अजून एक स्टार किड बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. Lockdown luanching या स्टारकिडचं होत असल्याचं दिसून येत आहे. सुप्रसिद्ध अभिेनता आणि नेता परेश रावल यांचा मुलगा आदित्य रावल आता अनुराग कश्यपच्या ‘बमफाड’ मधून पदार्पण करत आहे. डिजीटल प्लॅटफॉर्म असणाऱ्या ZEE5 वर 10 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये आदित्य रावलसह सुपरहिट तेलुगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ (हिंदीतील रिमेक – कबीर सिंह) मधील अभिनेत्री शालिनी पांडेदेखील दिसणार आहे. या चित्रपटाचा प्रिमियर 10 एप्रिलला असून यामध्ये आदित्य आणि शालिनीशिवाय सध्याचा हॉट आणि आपल्या अभिनयाने आपलंसं करून घेणारा अभिनेता विजय वर्मा आणि जतीन सरना यांच्याही प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.
या एका सवयीमुळे रामाच्या भूमिकेसाठी अरुण गोविल झाले रिजेक्ट
अनुरागने केले पोस्टर शेअर, आदित्यने व्यक्त केला आनंद
निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यपने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्टर शेअर केले आणि लिहिले, ‘जहां दिल लगाना नहीं आसान, वहा आशिकी होगी #बमफाड’ यामध्ये आदित्य रावल नासिर जमालची भूमिका साकारत असून शालिनी पांडे साकारत असलेल्या भूमिकेचे नाव नीलम आहे. दरम्यान एका ठिकाणी मुलाखतीमध्ये आदित्यने आपला आनंद व्यक्त केला आहे. ‘अशा रोमांचक चित्रपटाचा मी भाग आहे याचा मला खूपच आनंद आहे, मला ही संधी मिळाली. वास्तविक या चित्रपटाची प्रेरणा या चित्रपटाची प्रेमकहाणी आहे. मी या इंडस्ट्रीमध्ये एक अभिनेता म्हणून आपली ओळख बनवायला आलो आहे आणि नासिर जमालची ही भूमिका या पहिल्याच टप्प्यावर मिळणं हे माझंं भाग्य असून मी अतिशय आनंदी आहे. ही एक अशी भूमिका आहे जी स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला नाही म्हणणं शक्यच नव्हतं. लोक या चित्रपटाला भरभरून प्रेम देतील अशी मला आशा आहे आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेसाठी मी सध्या उत्सुक आहे.’
दीपिका – रणवीरचे काय बिनसले, रणवीरने केलाय दीपिकावर गंभीर आरोप
शालिनी म्हणाली अभूतपूर्व कथा
शालिनी पांडे हे दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पण बॉलीवूडमधील तिचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाविषयी शालिनी म्हणाली की, ‘नीलम 24 वर्षाची बोल्ड आणि अतिशय धैर्यशील मुलगी आहे. पण या भूमिकेने मला आकर्षित करून घेतले. एक कलाकार म्हणून अशी भूमिका करायला मिळणं हे खूपच आनंदाचं आहे. माझ्यासाठी हे एक आव्हानच होतं. या चित्रपटाने मला खरंच मेहनत करण्यास भाग पाडलं आणि ही भूमिका साकारताना मला खूप काही शिकायला मिळालं. ही एक अभूतपूर्व कथा आहे.’ तर निर्माते रंजन चांदेल यांच्यानुसार आदित्य आणि शालिनी ही एक फ्रेश जोडी आहे आणि प्रेक्षकांना ही कथा बघायला खूपच आवडेल. सध्या महामारीच्या दिवसात डिजीटल प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित करून आम्ही जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहचवू शकतो असं त्यांनी सांगितलं आहे.
लॉकडाऊनआधीच हे कपल होतं क्वारंटाइनमध्ये (क्रिती-पुलकित)
परेश रावलने ट्विट करून मागितला आशिर्वाद
Need your love and blessings. This is a Debut film of my son Aaditya . Plz watch . pic.twitter.com/adm9MT9Nxg
— Paresh Rawal (@SirPareshRawal) April 3, 2020
अभिनेता परेश रावलनेही आपल्या मुलाच्या चित्रपटाचे पोस्टर ट्विट करून प्रेक्षकांकडून आदित्य रावलसाठी आशिर्वाद आणि प्रेम मागितले आहे. आता आदित्य रावल आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांमध्ये चालवू शकेल का हे तर 10 एप्रिलला चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कळेलच. पण अजून एका स्टार किडची भर बॉलीवूडमध्ये पडली हे मात्र निश्चित.