ADVERTISEMENT
home / अॅस्ट्रो वर्ल्ड
कुंभ राशीत शनी करणार प्रवेश

30 वर्षांनी या राशीत करणार शनिदेव प्रवेश, होणार हे फायदे

शनीची अवकृपा झाली की, आयुष्यात सगळ्या गोष्टींमध्ये अडथळे येतात हे आपण सगळेच जाणतो. शनीची साडेसाती कोणालाही नको असते. शनीची अवकृपा होऊ नये याचसाठी अनेक जण शनिदेवाची मनोभावे पूजा करतात. त्याचा रोष आपल्यावर राहू नये याची योग्य ती काळजी देखील घेतात. पण काही जणांसाठी शनीचे येणे हे एका  दुग्धशर्करा योगासारखे आहे. तब्बल 30 वर्षांनी एका राशीत शनिदेव प्रवेश करणार आहे. याचा फायदा या राशीच्या लोकांना भरपूर मिळणार आहे. कोणत्या राशीत शनिदेव प्रवेश करणार आहे आणि त्याचा फायदा लोकांना कसा होणार आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

राशीत करणार प्रवेश

Shani Dev

काही राशी या शनीच्या खास राशी असतात. या राशींमध्ये शनीचा प्रवेश करणे हे शुभ मानले जाते. मकर राशीत शनीचे वास्तव्य होते आणि आता मकर राशीतून शनिदेव हे कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.  शनिचे संक्रमण हे सगळ्यात हळू होत असते. येत्या 29 एप्रिल रोजी शनी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.  तो या राशीत 17 मे 2022 पर्यंत असणार आहे. कुंभ राशीत प्रवेश केल्यामुळे कुंभ राशीसोबत अन्य काही राशींना देखील याचा फायदा होणार आहे आणि काही राशींना नुकसान देखील होणार आहे. 

कन्या रास

शनिचा कुंभ राशीतील प्रवेश कन्या राशीच्या लोकांसाठी अनेक दृष्टिकोनातून फायद्याचा ठरणार आहे. कन्या राशीच्या लोकांना चांगली नोकरी या काळात मिळू शकते. नोकरी इच्छुक लोकांनी चांगल्या कामाच्या ठिकाणी प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. कामाच्या ठिकाणी चांगला लाभ होणार आहे. इतकेच नाही तर जोडीदाराची या काळात चांगलीच साथ या राशीच्या लोकांना मिळणार आहे. या काळात यात्रा घडल्यास त्यामुळे आर्थिक फायदा होण्यासही मदत मिळणार आहे.

वृषभ रास

शनीचा कुंभ राशीतील प्रवेश हा वृषभ राशीच्या लोकांसाठी फायद्याचा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी योग्य तो मान मिळणार आहे.ज्यांना पगारवाढीची अपेक्षा आहे त्यांना या काळात खूप चांगला फायदा मिळणार आहे.  ज्यांना नोकरी हवी आहे अशांना त्यांच्या आवडीची नोकरी आणि पगार देखील मिळणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी हा काळ खूपच जास्त फायद्याचा असणार आहे. 

ADVERTISEMENT

वृश्चिक रास

नवीन नोकरीच्या शोधात नसाल तरी देखील वृश्चिक राशीच्या लोकांना नव्या नोकरीच्या अनेक संधी मिळण्याची या काळात शक्यता आहे. तुमचा चांगला काळ असल्यामुळे तुम्हाला चांगला आणि उत्तम पगार देखील मिळणार आहे. काही काळापासून तुम्ही आर्थिक त्रासातून जात असाल पण आता तुम्हाला या सगळ्यातून दिलासा मिळणार आहे.

धनु रास

शनीची साडेसाती आता या राशीवरुन जाणार आहे. त्यामुळे धनु राशीचा चांगला काळ आतापासून सुरु होणार आहे. या लोकांना धनलाभ होण्याची देखील शक्यता आहे.  ज्यांना करिअरची चिंता असेल अशांनी करिअरचा विचार करण्याची फारशी गरज नाही कारण तुम्हाला करिअरच्या उत्तम संधी मिळणार आहे. 

आता जय शनिदेव म्हणून या राशीच्या लोकांनी आपला चांगला फायदा करुन घ्यायला हवा. 

20 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT