ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
साडेसाती सुसह्य होण्यासाठी हे उपाय करा

साडेसाती सुसह्य होण्यासाठी हे उपाय करा

ज्यांचा फलज्योतिष्य, ग्रह, तारे आणि त्यांचा आपल्या आयुष्यावर परिणाम होणे ह्या गोष्टींवर विश्वास आहे अशांना साडेसातीची कायम धास्ती वाटते. पण शनिदेवाची उपासना केल्याने साडेसातीचा काळ सुसह्य होतो. साडेसाती म्हणजे साडे सात वर्षांचा कालावधी होय. आपल्याला कल्पना आहेच की आपल्या सूर्यमालेत प्रत्येक ग्रहाचा सूर्याभोवती भ्रमण करण्याचा एक विशिष्ट कालावधी आहे. आता सूर्य गोलाकार असल्याने आणि सर्व ग्रहांची कक्षा ही गोलाकाराच्या जवळ जाणारी असल्याने त्यांच्या भ्रमणाचा कालावधी ३६० अंशात बारा भागांत विभागला आहे. ह्यांनाच आपण मेष ते मीन अश्या बारा राशी म्हणून ओळखतो. तर सूर्याभोवती फिरताना सूर्यमालेतील सर्व ग्रह बारा राशींतून फिरतात अशी आपण कल्पना करतो. प्रत्येक ग्रहाचा भ्रमणाचा कालावधी वेगवेगळा असतो. 

साडेसाती म्हणजे काय?

शनी ग्रह आपल्या पत्रिकेतील ज्या घरातील राशीत मुक्कामाला असतो त्या घराच्या मागच्या व पुढच्या घरातील राशींना साडेसाती लागली आहे असे म्हणतात. शनीचा प्रत्येक राशीत अडीच वर्षांचा मुक्काम असतो. उदाहरणार्थ सध्या शनीचा मुक्काम जर धनु राशीत असेल तर धनु राशीच्या मागची रास वृश्चिक व पुढची रास मकर ह्या तीन राशींना साडेसाती सुरु आहे असे मानले जाते. साडेसातीचा प्रभाव प्रत्येकावर त्याच्या पत्रिकेनुसार पडतो. काहींना साडेसातीच्या काळात प्रचंड कसोटीचा सामना करावा लागतो तर काहींना साडेसातीत चांगले फळ मिळते

याचे कारण शनिदेव हे न्याय करणारे आहेत. ज्याची जशी कर्म त्याप्रमाणे त्याला ते फळ देतात. साडेसातीतून आपण तावून सुलाखून बाहेर पडतो कारण ह्या काळात आपल्या संयम व सहनशीलतेची कसोटी लागते. शनीची साडेसाती आपल्या संपूर्ण आयुष्यात तीन वेळा येते असे म्हणतात. अशा वेळी जर काही उपाय केले तर साडेसातीचा कालावधी आपल्यासाठी सुसह्य होईल. 

अधिक वाचा – घरात सकारात्मक उर्जा टिकून राहण्यासाठी टाळा या गोष्टी

ADVERTISEMENT

साडेसाती दरम्यान करण्याचे उपाय

शनिदेवाची पूजा करणे आणि शनिस्त्रोत्राचे पठण केल्याने शनिदेवांची आपल्यावर कृपादृष्टी होते असे म्हणतात. परंतु शनिदेवांची पूजा ही सूर्यास्तानंतरच करावी असे ज्योतिषशास्त्राचे तज्ज्ञ सांगतात. शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे व शनिदेवांचे ध्यान करावे. शनिदेवांची प्रार्थना करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि ‘ऊँ शं शनैश्चराय नमः।’ या मंत्राचा जप करावा.  

तसेच साडेसातीच्या काळात आपल्या इष्टदेवतेची उपासना व जप केल्याने देखील शनिदेवांच्या प्रकोपापासून रक्षण होते. तसेच आपल्या कुलदेवतेची उपासना केल्यानेही सर्व संकटे दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी नांदते असे तज्ज्ञ सांगतात. आपली कुलदेवता ही आपल्या मात्या-पित्याप्रमाणेच आपले सगळे हट्ट पुरवते आणि आपले रक्षण करते. त्यामुळे कुलदेवतेची उपासना करण्यास अनन्यसाधारण महत्व आहे. याखेरीज विघ्नांचा नाश करणाऱ्या श्रीगणेशाची उपासना व जप केल्यानेही सर्व संकटे दूर होतात असा अनेकांचा अनुभव आहे. इष्टदेवतेचा जप करताना आकाशमुद्रा करणे लाभदायक आहे. 

साडेसातीत दानधर्म केल्याचेही अनेक फायदे आहेत. गरजूंना अन्न -वस्त्राचे दान केल्याने शनिदेवांची कृपा होते. तसेच संकटमोचन हनुमंताचे शनिवारी दर्शन घ्यावे आणि भीमरूपी महारुद्रा हे मारुती स्तोत्र म्हणावे किंवा हनुमानचालिसेचे नियमित पठण करावे. हनुमंताची उपासना केल्याने आपले मन खंबीर होते, आपले मनोबल वाढते असे म्हणतात. साडेसातीच्या काळात आपले मन सैरभैर असते. अशावेळेला ही स्तोत्रे नियमितपणे म्हटल्यास मन शांत राहण्यास मदत होते. 

साडेसातीला घाबरून जाण्याचे कारण नाही. शनिदेव आपल्या चांगल्या कर्मांची आपल्याला चांगलीच फळे देतात. त्यामुळे चांगले वर्तन असणाऱ्या व्यक्तींना साडेसातीचा फार त्रास होत नाही. 

ADVERTISEMENT

अधिक वाचा – जाणून घ्या राशीनुसार कोणता रंग आहे तुमच्यासाठी शुभ

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा  MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

03 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT