बॉलीवूड कलाकारांचे घर आणि इंटेरिअर याबाबत जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. सध्या कोरोनाच्या कठीण काळातही बॉलीवूडचे अनेक कलाकार प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवत असताना दिसत आहे. जान्हवी कपूर, सनी लिऑन, अर्जुन कपूर, ह्रतिक रोशन, सोनाक्षी सिन्हा, मलायका अरोरा, आलिया भट आणि अमिताभ बच्चन याच्या पाठोपाठ आता अजय देवगन आणि काजोल यांनीदेखील जुहूमध्ये एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. या बगंल्याची किंमत करोडोंच्या घरात असल्याची सध्या चर्चा आहे.
कसे आहे अजय आणि काजोलचे नवे घर
कोरोना महामारीमुळे जगभरातील लोकांवर आर्थिक संकट आलेलं असताना बॉलीवूड कलाकार मात्र प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवताना दिसत आहेत. कारण या काळात अनेक कलाकारांनी आलिशान प्रॉपर्टी खरेदी केल्या आहेत. मागच्याच आठवड्यात अर्जून कपूरने बांद्र्यामध्ये आलिशान स्काय व्हिला खरेदी केला तर आता अजय आणि काजोलने जुहूत आलिशान बंगला खरेदी केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजय-काजोलचा हा बंगला जवळजवळ साठ कोटींचा आहे. 5390 स्कॅअर फूटवर पसरलेला हा बंगला अजय आणि काजोलचं राहतं घर शांतीपासून काहीच मिनीटांवर आहे. अजय आणि काजोल जवळजवळ एक वर्षांपासून नवा बंगला शोधत होते. शेवटी त्यांना जुहूतच त्यांच्या राहत्या घराजवळ हा बंगला मिळाला आहे. कपोल को-ऑपरेटिव्ह सोसायटीने 7 मेला हा बंगला वीणा वीरेंद्र देवगण आणि विशाल देवगण म्हणजेच अजय देवगणच्या नावावर ट्रान्सफर केला आहे. वास्तविक या बंगल्याची मूळ किंमत 65 ते 70 कोटी आहे. मात्र सध्या कोरोना महामारीमुळे घरांच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळेच अजयला हा बंगला साठ कोटींमध्ये खरेदी करता आला आहे. अजयने बंगल्याच्या इंटेरिअरचं काम लगेचच सुरू केलं आहे. आता अजयच्या शेजारी अक्षय कुमार, ह्रतिक रोशन, धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांचे बंगले आहेत. त्यामुळे तो या कलाकारांचा खऱ्या अर्थाने शेजारी झाला आहे.
लॉकडाऊनच्या काळात कलाकार खरेदी करत आहेत नवीन प्रॉपर्टी
कोरोना महामारीमुळे घरांच्या किंमती कमी झाल्या याचा जास्त फायदा सेलिब्रेटीज घेत आहेत. कारण सध्या अनेक सेलिब्रेटी यामुळे घर खरेदी आणि प्रॉपर्टीत पैसे गुंतवण्यासाठी सज्ज झालेले दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांनी नुकतंच 31 कोटींचा एक ड्युप्लेक्स खरेदी केला आहे. वास्तविक बिग बीने ही प्रॉपर्टी मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये खरेदी केली होती. मात्र घर रजिस्टर करण्यासाठी त्यांना एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागली. 5184 स्वॅअर फूटच्या या प्रॉपर्टीसाठी बिग बीला 62 लाखांची स्टॅंप ड्युटी भरावी लागली होती. या शिवाय सोनाक्षी सिन्हा, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरनेही काही दिवसांपू्र्वीच बांद्र्यामध्ये वीस कोटींचे स्कायव्हिला खरेदी केले आहेत. एकूणच हा लॉकडाऊन अथवा कोरोना महामारी प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी सेलिब्रेटीजच्या पथ्यावर पडलेली दिसून येत आहे.
2020 साली अजय देवगण तानाजी- दी अनसंग वॉरिअरमधून प्रेक्षकांसमोर आला होता. आता लवकरच तो भुजः दी प्राईड ऑफ इंडिआ, मैदान, मेडे, रेड 2, कॅथी आणि गोलमाल 5 मध्ये झळकणार आहे. त्यामुळे त्याचे आगामी चित्रपट पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
रणबीर आणि आलियाच्या ‘ब्रम्हास्त्र’चा आता निर्माता झाला अयान मुखर्जी
अर्जुन कपूरने बांद्रा येथे खरेदी केला आलिशान स्कायव्हिला, किंमत ऐकून व्हाल हैराण
राहुल वैद्यच्या ‘अली’ गाण्याने केले सगळ्यांना मंत्रमुग्ध, फॅन्सही झाले आनंदी