फोर्ब्सने नुकतीच यावर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांची लिस्ट जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या लिस्टमध्ये स्वतःचे निर्माण करणारा अक्षय कुमार हा एकमेव बॉलीवूड कलाकार आहे. यावर्षी अक्षयने चित्रपटांच्या माध्यमातून जवळजवळ 362 कोटी रूपये कमावले आहेत. ज्यामुळे तो या लिस्टमध्ये जगातील सर्व कलाकारांच्या मध्ये सहाव्या क्रमांकावर पोहचला आहे. मागच्या वर्षी अक्षयकुमारने एकामागोमाग अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. एकाचवेळी इतक्या चित्रपटांमध्ये काम केल्यामुळे तो सर्वाधिक श्रीमंत बॉलीवूड कलाकार झालेला आहे.
अक्षय कुमार या लिस्टमधला एकमेव भारतीय कलाकार
फोर्ब्सच्या मते या लिस्टमध्ये जे जगभरातील कलाकार आहेत त्यांनी जाहिरात आणि प्रॉडक्ट एंडोसमेंट मुळे सर्वात जास्त कमाई केलेली आहे. चित्रपटाप्रमाणेच अक्षय कुमारनेही अनेक उत्पादनांच्या जाहिरात केलेल्या आहेत. अक्षय एकाच वेळी अनेक चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आजही त्याच्या अनेक आगामी चित्रपटांवर काम सुरू आहे. ज्यामुळे तो भविष्यातही अनेक चित्रपटांमध्ये झळकणार आहे. तो सध्या अमेरिकेत ‘बेल बॉटम’ या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. तसंच त्याचे लक्ष्मी बॉंम्ब, सुर्यवंशी, पृथ्वीराज आणि अतंरगी रे लवकरच प्रदर्शित होणाऱ्या मार्गावर आहेत. त्यामुळे अक्षयसाठी हे मानधन आणि लिस्टमध्ये अव्वल असणं नेहमीचच आहे. तो कलाकारांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर असून संपूर्ण जगातील श्रीमंताच्या यादीत 52 क्रमांकावर आहे.
अक्षय एक श्रीमंत आणि दानशूर कलाकार
अक्षय कुमार 52 वर्षांचा कलाकार असून तो अतिशय फिट आहे. ज्यामुळे तो एकाच वेळी अनेक चित्रपटांमध्ये काम करू शकतो. अक्षय नेहमी सकाळी लवकर उठतो, व्यायाम करतो, योग्य आहार घेतो आणि रात्री कोणत्याही पार्टीमध्ये न जाता रात्री लवकर झोपतो. ज्यामुळेच त्याची कार्यक्षमता इतरांपेक्षा जास्त आहे. योग्य जीवनशैली आणि मेहनत घेणं हेच त्याच्या या यशस्वी आणि श्रीमंत जीवनाचं रहस्य आहे. एवढंच नाही तर तो फक्त श्रीमंतच नाही तर दानशूरही आहे. कोव्हिड 19 मुळे अचानक उद्धवलेल्या संकटावर मात करण्यासाठी अक्षयने मोठ्या मनाने सरकारला पीएम केअर फंडसाठी 25 कोटींची मदत केली होती. जेव्हा जेव्हा देशाला मदतीची गरज असते तेव्हा अक्षय देणगी देण्यासाठी सर्वात पुढे असतो. त्यामुळे भारतीयांसाठी अक्षयने श्रीमंताच्या यादीत असणं ही एक आनंदाची बातमीच आहे. इतरांच्या मदतीसाठी सदैव पुढे असलेल्या या भारतीय सुपरस्टारची दिवसेंदिवस अशीच प्रगती होत राहो. कारण तो फक्त स्वतःचाच विचार करत नाही तर गरज पडल्यास इतरांसाठी आपल्याकडे असलेल्या धनाचे दान करायला मागेपुढेही पाहत नाही. असं म्हणतात दान करणाऱ्याची तिजोरी कधीच रिकामी होत नाही. त्यामुळे अक्षयही असाच ऐश्वर्यसंपन्न होत राहो.
फोर्ब्सच्या या लिस्टमध्ये इतर सेलिब्रेटी
फोर्ब्सने जाहीर केलेल्या या यादीमध्ये बॉलीवूडचा फक्त अक्षय कुमारच आहे. मात्र या व्यतिरिक्त हॉलीवूडचे काही कलाकार आणि इतर सेलिब्रेटीही यामध्ये आहेत. या लिस्टच्या टॉप टेनच्या यादीत रॉजर फेडरर, क्रिस्टियानो रेनाल्डो, लिओनेल मेस्सी अशा अनेर सेलिब्रेटीजचा समावेश आहे. मात्र या यादीत भारतीय कलाकारांमध्ये मात्र अक्षय कुमार एकटाच समाविष्ठ झालेला आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
टीव्ही स्टार प्रणिता पंडित झाली आई, मुलीला दिला जन्म
हिरोंपेक्षाही हँडसम आहेत हे ऑनस्क्रिन व्हिलन