ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
दीवमध्ये ‘राम सेतु’चं शूटिंग पूर्ण, अक्षय कुमार शेअर ही केली खास गोष्ट

दीवमध्ये ‘राम सेतु’चं शूटिंग पूर्ण, अक्षय कुमार शेअर ही केली खास गोष्ट

बॉलीवूड अभिनेता त्याच्या चित्रपट शूटिंगमध्ये नेहमीच बिझी असतो. एकाच वेळी भरपूर चित्रपट करण्यात त्याचा हातखंडा असल्यामुळे त्याच्या नॉन स्टॉप कामासाठी तो नेहमीच चर्चेतही असतो. आजही अक्षयकडे अनेक चित्रपट हातात असून तो सध्या त्या चित्रपटांचे शूटिंग लवकर पूर्ण करण्याच्या मागे आहे. नुकतंच त्याने त्याच्या आगामी चित्रपट राम सेतुसाठी दीव दमणमधील शूटिंग पूर्ण कले आहे. हे शूटिंग संपताच अक्षयने त्याचा एक फोटो आणि एक खास गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली. 

अभिनेत्री प्रीतम कागणेने ‘विजेता’ चित्रपटासाठी केले तब्बल 6 किलो वजन कमी

काय आहे ही खास गोष्ट 

अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने दीव दमणमधील काही अद्भूत अनुभूती शेअर केली आहे. या फोटोत तो एका पिलरला टेकून उभा आहे. ज्याच्या मागे निसर्गाचा अदभूत नजारा दिसत आहे. सूर्यप्रकाशात चमचमणारा समुद्र आणि निवांतपणा यात दिसत आहे. अक्षयने यात शेअर केलं आहे की, “राम सेतुचं शेड्यूल पूर्ण करताना दीव दमणमधील या अद्भूत आठवणी पुन्हा डोळ्यासमोर येत आहेत. नैसर्गिक सुंदरता, प्रेमळ लोक आणि मुळीच पाहायला विसरू नका माझ्या मागे असलेलं हे पाण्याचं कोठार आणि जिथे मी उभा आहे ते तो किल्ला जेलदेखील…हे ठिकाण इतिहासात गुंडाळलेलं एक अविश्वसनिय रत्न आहे. दीव मी तुला माझं मन दिलं…”

नवा कोरा कॉमेडी शो ‘हे तर काहीच नाय’ म्हणत स्टार्स घालणार धुमाकूळ

ADVERTISEMENT

याआधी श्रीलंकेत होणार होतं राम सेतुचं शूटिंग

अक्षय कुमारच्या राम सेतुचं एक शेड्यूल उटीमध्ये शूट करण्यात आलं आहे. अक्षयने तिकडच्या सुंदर आठवणीदेखील सर्व चाहत्यांसोबत आधीच शेअर केल्या् होत्या. त्यानंतर खरंतर या चित्रपटाचा एक मोठा भाग श्रीलंकेत शूट होणार होता मात्र परवानगी न मिळाल्यामुळे टीमने ते शूटिंग दीवमध्ये करण्याचा निर्णय घेतला. ज्याचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं आहे. राम सेतुमध्ये अक्षय कुमारसोबत जॅकलीन फर्नांडिस आणि नुसरत भरूचादेखील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात सत्यदेवची भूमिकाही महत्त्वाची असेल. चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक शर्मा करत असून या चित्रपटाचं शूटिंग डिसेंबर महिन्यात पूर्ण केलं जाईल. लवकरच म्हणजे पुढच्या वर्षी 24 ऑक्टोबरला चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. 

Bigg Boss Marathi: वाईल्ड कार्ड एंट्रीने पुन्हा आले हे स्पर्धक घरात

06 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT