ADVERTISEMENT
home / Natural Care
तुमच्याही स्तनांजवळ येतात पिंपल्स ही आहेत कारणं

तुमच्याही स्तनांजवळ येतात पिंपल्स ही आहेत कारणं

पिंपल्स यावेत असे कोणालाही वाटत नाही. पण शरीरातील बदलामुळे आणि काही कारणामुळे चेहऱ्यावरच नाही. तर शरीराच्या इतर भागावरही अनेकांना पिंपल्स येण्याचा त्रास होतो. चेहऱ्याप्रमाणेच स्तनांजवळ येणारे पिंपल्सही तितकेच दुखणारे आणि सौंदर्य बिघडवणारे असतात. एकूणच काय पिंपल्स कुठेही आले तरी ते नकोसे असतात.आज आपण स्तनांजवळ येणाऱ्या पिंपल्स विषयी जाणून घेणार आहोत. स्तनांजवळ पिंपल्स नेमके का येतात आणि ते आल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी ते आता आपण जाणून घेऊया. 

मेकअपसाठी लागणारा ब्युटी ब्लेंडर धुण्याची गरज काय?, जाणून घ्या कारण

पोअर्समध्ये घाण साचणे

चेहऱ्यावरच नाही तर आपल्या संपूर्ण शरीरावर बारीक बारीक छिद्र असतात. ही बारीक बारीक छिद्रातून घामाचे उत्सर्जन होत असते. काही जणांना खूप घाम येतो. हा घाम साचून राहिल्यामुळे तो छिद्रातून आत जातो. हा घाम जर योग्यवेळी टिपला गेला नाही आणि तो तसाच त्वचेमध्ये मुरला की, तो पोअर्स बंद करतो. पोअर्स बंद झाल्यामुळे घामाद्वारे आत गेलेली घाण पिंपल्स बनून वर येते. आता तो घाम किती आत झिरपला यानुसार त्याचे रुपांतर पिंपल्समध्ये होते. या पिंपल्सचा आकार कधीकधी इतका मोठा असतो की, त्यामध्ये पस येतो. 

उपाय: जर तुम्हाला घाम खूप येत असेल तर तुम्ही कॉटनच्या कपड्यांची निवड करा. शिवाय आतील कपडे घालताना घाम टिपला जाईल अशा कपड्यांची निवड करा. जीम किंवा व्यायाम केल्यानंतर तातडीने आंघोळ केल्यास फारच उत्तम

ADVERTISEMENT

घट्ट कपडे

घट्ट कपड्यांची निवड

Instagram

महिलांना ब्रा घालणे हे अगदी अनिवार्य आहे. स्तनांचा सुडौलपणना टिकवण्यााठी ब्रा ही गरजेचीच आहे. पण ब्रा वेगवेगळ्या मटेरीअलमध्ये आणि पॅटर्नमध्ये मिळतात. आपल्या कम्फर्टनुसार आपण त्यांची निवड करत असतो. पण असे कपडे ज्यावेळी घट्ट असतात त्यावेळी त्याचे शरीरासोबत अधिक घर्षण होते. शरीरावर असलेले बारीक बारीक केस त्यामुळे घासले जातात. त्यातच एखादा केस परतला तर केसांची मूळ दुखावतात. त्या ठिकाणी पुळी येते. त्या पुळीकडे दुर्लक्ष केले तर त्यामध्ये पू साचतो. जो अधिक त्रासदायक ठरतो.  केसतोडीमुळेही अनेकदा स्तनांजवळ पिंपल्स येतात. जे खूप दुखतात. 

उपाय: त्वचेवर घासले जातील असे सिथेंटिक मटेरिअलच्या ब्रा वापरु नका. त्यापेक्षा कॉटन किंवा अशा मटेरिअलची निवड करा. 

ADVERTISEMENT

चेहरा देत असेल असे संकेत तर आताच थांबवा स्क्रबिंग

अस्वच्छता

अस्वच्छता हे खरंतरं त्वचेसंदर्भातील सगळ्यात मोठे कारण आहे. जर तुमची त्वचा स्वच्छ नसेल तर तुम्हाला अशा पद्धतीने त्रास होणे अगदी स्वाभाविक असते. चेहऱ्यासोबत तुम्हाला शरीराच्या इतर भागांचीही स्वच्छता राखता यायलाच हवी.ही स्वच्छता तुम्ही योग्य पद्धतीने राखली तर तुम्हाला त्वचेचा कोणताही त्रास होणार नाही. कधीही घाम आलेल्या शरीरावर क्रिम किंवा स्प्रेचा प्रयोग करु नका. त्वचा जितकी स्वच्छ ठेवता येईल तेवढी ठेवा. जर तुम्ही डीप नेकसाठी मेकअप करत असाल तर असा मेकअप काम झाल्यानंतर योग्य पद्धतीने कढायला विसरु नका. 


आता स्तनांजवळ पिंपल्स येण्याची कारणं कळली असतील तर अशी घ्या काळजी

मुरूमांसाठी उत्कृष्ट क्रिम्स, वापरून समस्या करा दूर

ADVERTISEMENT

तुमच्या उत्तम त्वचेसाठी आमच्याकडे आहे MyGlammचे बेस्ट प्रोडक्ट

22 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT