ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
Benefits Of Almond Face Pack in Marathi

बदामाच्या फेसपॅकचे आश्चर्यकारक फायदे (Benefits Of Almond Face Pack In Marathi)

बदामाच्या तेलाचा वापर सौंदर्य उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. कारण बदामामध्ये अॅंटि ऑक्सिडंट, व्हिटॅमिन ई, ओमेगा थ्री फॅटी अॅसिड, प्रोटीन्स, झिंक, कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतात.  बदाम भिजवून त्याची पेस्ट, बदामाचे तेल अथवा बदामाची पावडर सौंदर्य खुलवण्यासाठी नक्कीच उपयुक्त आहे. बदामातील घटक त्वचेत मुरतात आणि त्वचेचं सौंदर्य वाढवतात. शिवाय बदामाच्या फेसपॅकमुळे तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. यासाठीच जाणून घ्या बदामाच्या फेसपॅकचे फायदे (Almond Face Pack Benefits In Marathi) आणि कोणत्या त्वचेसाठी कसा तयार करावा बदामाचा फेसपॅक. 

Benefits Of Almond Face Pack in Marathi
Benefits Of Almond Face Pack in Marathi

बदाम फेसपॅकचे फायदे (Almond Face Pack Benefits In Marathi)

चेहऱ्यावर निरनिराळ्या प्रकारचे फेसपॅक वापरले जातात. मात्र बदामाचे फेसपॅक वापरण्याचे अनेक फायदे त्वचेवर होतात. यासाठीच जाणून घ्या बदाम फेसपॅकचे फायदे (Almond Face Pack Benefits In Marathi)

स्ट्रेच मार्क कमी होतात (Treat Stretch Marks)

बदामामुळे त्वचेला योग्य पोषण मिळते आणि त्वचेवरील डाग, व्रण, जखमा बऱ्या होतात. बाळंतपणानंतर अथवा वजन कमी केल्यामुळे तुमच्या त्वचेवर स्ट्रेच मार्क्स झाले असतील तर तुम्ही बदामाच्या तेलाने या खुणा नक्कीच कमी करू शकता. मात्र लक्षात ठेवा बाळंतपणानंतर झालेले स्ट्रेच मार्क्स नैसर्गिक असल्यामुळे ते पूर्णपणे निघून जात नाहीत. मात्र बदामाच्या तेलामुळे हे डाग विरळ होतात आणि सहज दिसत नाहीत. 

मेकअप काढण्यासाठी परफेक्ट (Perfect Make-up Removal)

मेकअप ही आज काळाची गरज झाली आहे. लग्नसमारंभ असो वा नेहमीचे ऑफिस रूटिन… खास कार्यक्रमापासून दैनंदिन रूटिनमध्येही आपण थोडासा का होईना मेकअप करतोच. मेकअपचे साईड इफेक्ट नको असतील तर मेकअप वेळेत आणि व्यवस्थित काढणं गरजेचं आहे. मेकअप काढण्यासाठी बदामाचे तेल अगदी परफेक्ट आहे. कारण त्यामुळे तुमचा मेकअप सहज निघतोच शिवाय तुमच्या त्वचेला मऊपणाही मिळतो.

ADVERTISEMENT

पफी आइज आणि डार्क सर्कल्स कमी होतात (Reduce Puffy Eyes and Dark Circles)

आजकाल रात्री उशीरा जागरण केल्यामुळे, अती कामाच्या ताणामुळे अथवा चिंता काळजीमुळे जर तुम्हाला पफी आइज अथवा डार्क सर्कल्सचा त्रास होत असेल तर तुम्ही ही समस्या दूर करण्यासाठी बदामाच्या तेलाचा वापर करू शकता. यासाठी डोळ्याखाली बदामाचे तेल अथवा बदामाची पेस्ट लावा आणि डार्क सर्कल्स, डोळ्यांची सूज कमी करा. 

पिंपल्सवर उपाय (Treat Acne)

चेहऱ्यावर पिंपल्स येणे, व्हाईट हेड, ब्लॅक हेड्स ही एक सामान्य समस्या सध्या झालेली आहे. त्वचेमध्ये अधिक सीबम निर्माण झाल्यामुळे त्वचेवर तेलकट थर निर्माण होतो. मात्र बदामामधील फॅटी अॅसिड तुमच्या सीबमच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवतं. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स, ब्लॅक हेड आणि इतर समस्या कमी होतात. यासाठी तुम्ही बदामाचा फेसऍक चेहऱ्यावर नियमित लावू शकता. 

हानिकारक सूर्यकिरणांपासून संरक्षण मिळते (Prevents Harmful Effects of the Sun)

बदामाचे तेल तुमच्या त्वचेसाठी अतिशय उत्तम ठरतं. ऊन्हात फिरण्यामुळे त्वचा काळंवडते आणि रापते. अशा वेळी त्वचेचं हानिकारक सूर्यकिरणांपासून संरक्षण होणं गरजेचं आहे. बदामचे तेल त्वचेत लगेच मुरतं आणि त्वचेवर एक सुरक्षिक थर निर्माण करतं. त्वचेचं हानिकारक सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी बदामाचे तेल नक्कीच फायद्याचं आहे. 

त्वचा मऊ होते (Supple and Smooth Skin)

बदामाच्या तेलात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असतं. ज्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होते. बदामाचे तेल अथवा भिजवलेल्या बदामाची पेस्ट त्वचेला लावण्यामुळे त्वचेत बदामाचे गुणधर्म चांगल्या पद्धतीने मुरतात. बदामाच्या तेलामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि लवकर सॉफ्ट होते. 

ADVERTISEMENT

त्वचेचा टोन सुधारतो (Improve Your Skin Tone)

बदामाच्या तेलामध्ये त्वचा उजळ करणारे गुणधर्म असतात. सहाजिकच त्यामुळे त्वचा मुळापासून स्वच्छ आणि उजळ होते. त्वचेचा टोन सुधारण्यासाठी तुम्ही भिजवलेले बदाम वाटून त्वचेवर लावू शकता. ज्यामुळे त्वचेतील धुळ, माती, प्रदूषण, डेड स्किन निघून जाते आणि चांगले पोषण झाल्यामुळे त्वचेच्या नवीन पेशींच्या निर्मितीला चांगली चालना मिळते. ज्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि त्वचा उजळ होते.

एजिंगच्या समस्या कमी होतात (Reduce the Effects of Ageing)

बदामात भरपूर अॅंटि ऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन ई असते. ज्यामुळे त्वचा फ्री रेडिकल्सपासून दूर राहते. त्वचेमधील नवीन पेशींच्या निर्मितीसाठी आणि डेड स्कीन निघून जाण्यासाठी बदामातील घटक फायदेशीर ठरतात. त्वचा पेशींची निर्मिती चांगली झाल्यामुळे तुमची त्वचा सतत चिरतरून राहते आणि एजिंगच्या खुणा कमी होतात. त्वचेचे पोषण झाल्यामुळे त्वचेवर सुरकुत्या दिसत नाहीत. 

चेहऱ्यासाठी उपयुक्त बदामाचे फेसपॅक (Almond Face Packs)

Benefits Of Almond Face Pack in Marathi
Benefits Of Almond Face Pack in Marathi

प्रत्येकीची त्वचा निरनिराळी असते. त्यामुळे त्वचेनुसार तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर बदामाचा फेसपॅक लावायला हवा. यासाठीच आम्ही हे फेसपॅक तुमच्यासोबत शेअर करत आहोत.

कोरड्या त्वचेसाठी बदामाचा फेसपॅक

जर तुमची त्वचा कोरडी असेल तर त्वचेला पोषण देण्यासाठी तुम्ही हा बदामाचा फेसपॅक नियमित वापरू शकता.

ADVERTISEMENT
  • एक चमचा ओटस्
  • एक चमचा बदामाचे तेल

ओट्स दळून त्याची पावडर तयार करा आणि त्यामध्ये बदामाचे तेल मिसळा. मिश्रण एकजीव करून तुमच्या चेहरा आणि मानेवर लावा. पंधरा ते वीस मिनीटांनी चेहरा पाण्याने धुवा. 

तेलकट त्वचेसाठी बदामाचा फेसपॅक

अती प्रमाणात झालेल्या सीबमच्या निर्मितीमुळे त्वचा सतत तेलकट असेल तर तुम्ही हा फेसपॅक नक्कीच वापरू शकता.

  • एक चमचा मुलतानी माती
  • एक चमचा बदामाची पावडर
  • गुलाबपाणी

सर्व साहित्य एकजीव करा आणि तुमच्या चेहरा आणि मानेवर लावा.  दहा मिनीटांनी चेहरा तुम्ही कोमट साध्या पाण्याने धुवू शकता.

संवेदनशील त्वचेसाठी बदामाचा फेसपॅक

संवेदनशील त्वचेवर कोणतेही घरगुती उपाय करताना विशेष काळजी घ्यायला हवी. मात्र हा फेसपॅक तुम्ही तुमच्या त्वचेसाठी नक्कीच वापरू शकता.

ADVERTISEMENT
  • एक चमचा कच्चे दूध
  • एक चमचा बदामाची पावडर

दोन्ही घटक एकत्र करा आणि तुमच्या चेहऱ्यावर ही पेस्ट हलक्या हाताने लावा. पंधरा ते वीस मिनीटांनी चेहरा पाण्याने धुवून टाका.

पिंपल्ससाठी बदामाचा फेसपॅक

चेहऱ्यावर सतत पिंपल्स येत असतील तर ते दूर करण्यासाठी बदामाचा हा फेसपॅक फायद्याचा आहे.

  • एक चमचा घट्ट दही
  • एक चमचा बदामाची पावडर

दही आणि बदामाची पावडर एकत्र करून तयार पेस्ट पिंपल्स आलेल्या भागावर लावा.  दहा मिनीटांनी चेहरा धुवा. ज्यामुळे तुमचा चेहऱ्यावर एक छान ग्लो येईल. शिवाय हळू हळू यामुळे तुमच्या पिंपल्सची समस्या कमी होईल.

त्वचा उजळ दिसण्यासाठी बदामाचा फेसपॅक

घरात एखादा कार्यक्रम असेल अथवा अचानक एखाद्या पार्टीला जायचं असेल तर त्वचा उजळ दिसण्यासाठी तुम्ही हा फॅसपॅक वापरू शकता.

ADVERTISEMENT
  • एक चमचा बेसन
  • चिमूटभर हळद

एक चमचा बदामाचे तेल

तिनही घटक एकत्र करा आणि तयार पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. पंधरा मिनीटांनी चेहरा धुवा. तुमच्या चेहऱ्यावर इन्संट ग्लो नक्कीच येईल.

मसूर डाळीचे सोपे आणि घरगुती फेसपॅक्स (DIY Masoor Dal Face Packs In Marathi)

फेसपॅक लावताना फॉलो करा या टिप्स (Tips For Applying DIY Face Masks Properly)

Benefits Of Almond Face Pack in Marathi

कोणताही घरगुती फेसमास्क अथवा फेसपॅक लावताना तुम्हाला काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. कारण जर चुकीच्या पद्धतीने फेसपॅक लावला अथवा काढला तर त्याचा हवा तसा परिणाम त्वचेवर होत नाही.

ADVERTISEMENT
  • चेहऱ्यावर फेसमास्क, फेसपॅक लावण्याआधी चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि पुसून कोरडा करा.कारण अस्वच्छ त्वचेवर फेसमास्क लावला तर त्या फेसमास्क सोबत त्वचेतील धुळ, माती, प्रदूषणही त्वचेत मुरू शकते. 
  • त्वचेवर फेसपॅकचा एक पातळ थर लावा. मात्र फेसपॅक लावताना डोळे आणि ओठाकडील भागावर तो लावणे टाळा.
  • फेसमास्क पंधरा ते वीस मिनीटांच्या वर त्वचेवर ठेवू नका.
  • फेसमास्क धुताना गरम पाणी कधीच वापरू नका. कोमट अथवा साध्या पाण्याने फेसपॅक धुवून टाका. 
  • घासून अथवा रगडून फेसमास्क काढू नका.
  • फेसपॅक काढल्यावर स्वच्छ टॉवेलने चेहरा टिपून घ्या.
  • फेसपॅक दररोज चेहऱ्यावर लावू नका. आठवड्यातून एकदा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास चांगला फायदा जाणवेल. तसंच जाणून घ्या बदाम खाण्याचे फायदे | Badam Khanyache Fayde In Marathi

बदामाच्या फेसपॅकबाबत निवडक प्रश्न – FAQ’s

1. बदाम फेसपॅकचा वापर रोज करू शकतो का ?

बदामामध्ये अनेक गुणधर्म असतात. जे त्वचेसाठी अतिशय उपयुक्त ठरतात. त्यामुळे दररोज त्वचेवर बदामाच्या तेलाचा वापर करणे नक्कीच फायद्याचे ठरेल. मात्र दररोज बदामाचा फेसपॅक लावू नका. आठवड्यातून एकदा अथवा दोनदा तुम्ही बदामाचा फेसपॅक नक्कीच लावू शकता. 

2. बदामाचा वापर चेहऱ्यासाठी करणे कितपत योग्य आहे ?

बदामाचे तुमच्या त्वचेवर चांगले परिणाम होतात. त्यामुळे तुम्ही चेहऱ्याची त्वचा मऊ आणि मुलायम करण्यासाठी फेसपॅकच्या माध्यमातून चेहऱ्यावर बदामाचा वापर नक्कीच करू शकता. 

3. बदाम फेसपॅकने त्वचा उजळते का ?

बदामाच्या तेलामध्ये त्वचा उजळणारे गुणधर्म असतात. त्यामुळे जर तुम्हाला त्वचा उजळ करायची असेल तर तुम्ही बदामाच्या तेलाचा वापर त्वचेसाठी नक्कीच करू शकता.

16 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT