ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
Almond Benefits In Marathi

बदाम खाण्याचे फायदे सुंदर त्वचा आणि निरोगी आरोग्यासाठी | Badam Khanyache Fayde In Marathi

घरात ड्रायफ्रुटमध्ये असणारा हमखास असणारा पदार्थ म्हणजे ‘बदाम’. तुम्ही काही विसरलात की, तुम्हाला बदाम खाण्याचा सल्ला अगदी हमखास दिला जातो. ‘’बदाम खा बदाम तुझ्या लक्षात राहील असे म्हणत दात विचकणारे लोक अनेक आहेत’’ पण ते म्हणत आहेत ते अगदी खरं आहे बरं का.. कारण बदाम खाण्याचे भरपूर फायदे (badam benefits in marathi) आहेत. एक बदामही तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरु शकते. इतकेच नाही जर तुम्हाला सुंदर आणि नितळ त्वचा हवी असेल तर मग तुम्ही बदाम अगदी हमखास खायला हवे. बदामाचे इतके फायदे पाहता आज आपण जाणून घेऊया बदामाविषयी सर्वकाही. याशिवाय तुम्ही बदामाचा फेसपॅकही वापरू शकता

बदाम आहेत खास कारण बदामांमध्ये आहेत हे गुणधर्म (Almond Nutritional Value Chart)

Almond Nutritional Value Chart
Almond Benefits In Marathi

बदामाचा विचार केला तर बदामामध्ये नेमकं असं काय दडलं आहे हे देखील तुम्हाला माहीत हवे. या चार्टच्या माध्यमातून जाणून घेऊया बदामामध्ये नेमकं काय आहे ते 

फायबर( Fiber) : 3.5 ग्रॅम 
प्रोटीन (Protein) : 6 ग्रॅम
फॅट (Fat) : 14 ग्रॅम ( मोनोसॅच्युरेटेडचे प्रमाण जास्त)
मॅगनीझ (Manganese):  20%
व्हिटॅमिन E (Vitamin E) : 37%
मॅग्नेशिअम (Magnesium) : 20%
याशिवाय कॉपर (Copper), व्हिटॅमिन B2 आणि फॉस्फरस 

वाचा – पिस्त्याचे आरोग्यदायी फायदे

ADVERTISEMENT

जाणून घ्या बदामाचे आरोग्यदायी फायदे (Amond Benefits In Marathi For Health)

Amond Benefits In Marathi For Health
Badam Benefits In Marathi

प्रत्येकाच्या घरात ड्रायफ्रुटमध्ये बदाम हे नक्कीच असतात. इतर ड्रायफ्रुटप्रमाणेच बदामाचेही भरपूर फायदे आहेत. आरोग्यासाठी बदाम हे फारच चांगले असून तुम्हाला बदामाचे आरोग्यदायी फायदे माहीत हवेत.

1. पोषकतत्वांनी परिपूर्ण

तुमच्या शरीराला आवश्यक असलेले न्युट्रीएंटस म्हणजेच पोषक तत्वे तुम्हाला बदामामध्ये मिळू शकतात. तुम्हाला पोषक आहार घेणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या आहारात बदामाचा समावेश करावा. त्यामुळे तुमच्या उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असलेली पोषकतत्वे तुम्हाला मिळू शकतील. कारण इतर व्हिटॅमीन्ससह बदाम फॉलिक एसिडयुक्त पदार्थ (Folic Acid Foods In Marathi) मानला जातो.

2. अँटीऑक्सिडंटनी भरलेले

तुमच्या निरोगी आरोग्यासाठी अँटीऑक्सिडंट हे अत्यंत महत्वाचे असते. अँटीऑक्सिडंटमध्ये आजारांशी लढण्याची ताकद असते. कॅन्सर, हृदयविकारासारखे आजार नियंत्रणात ठेवण्यात ते मदत करतात त्यामुळे बदामाचे सेवन हे आवश्यक आहे. कारण बदामामध्ये अँटीऑक्सिडंटची मात्रा अधिक असते. म्हणूनच बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो.

3. कोलेस्ट्रॉल ठेवते नियंत्रणात

बदामापासून तेल काढले जाते म्हणजे त्यामध्ये फॅट आलेच. पण बदामामधील फॅट हे तुमच्या शरीरासाठी आवश्यक असते. तुम्हाला जर कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी बदाम मदत करतात. योग्य प्रमाणात बदामांचे सेवन केले तर त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो.

ADVERTISEMENT

4. कॅन्सरला ठेवते दूर

कॅन्सरशी दोन हात करण्याची ताकदही बदामामध्ये असते. बदामामधील अँटीऑक्सिडंट आजारांना दूर ठेवतात. त्यापैकीच एक मोठा आणि भयकंर आजार म्हणजे कॅन्सर..बदामाच्या नित्यसेवनामुळे तुम्ही कॅन्सरला दूर सारता. त्यामुळे तुम्ही बदाम नक्की खायला हवे.

वाचा – तोंडाचा कर्करोग लक्षणे व उपाय

5. साखर ठेवते नियंत्रणात

जर तुम्ही डायबिटीसचे रुग्ण असाल तरी देखील तुम्ही बदामाचे अगदी हमखास सेवन करु शकता. कारण बदामामुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तुम्हाला भविष्यात मधुमेहाचा त्रास होऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही अगदी आरामात तुमच्या आहारात बदामाचा समावेश करायला हवा.

6. हृदयविकार ठेवते नियंत्रणात

हृदयविकार असणाऱ्यांनी तर बदाम खायलाच हवे. तुमच्या आरोग्यासाठी बदाम हे उत्तम आहेत. तुमच्या शरीरासाठी अनावश्यक असलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहिल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ही कमी होते. त्यामुळे बदामाचे सेवन हे आवश्यक असते. 

ADVERTISEMENT

7. वजन ठेवते नियंत्रणात

Weight Management
Badam Khanyache Fayde In Marathi

तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही आवर्जून बदाम खायलाच हवेत. कारण बदामामुळे तुमची अतिरिक्त भूक नियंत्रणात राहते. शिवाय अशा भूकेच्यावेळी तुम्ही बदाम खाल्ल्यानंतर चुकीच्या वेळी शरीरात जाणारे चुकीचे फॅटही जात नाही. त्यामुळे तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

8. रक्तदाब ठेवते नियंत्रणात

तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल तर मग तर तुम्ही बदाम खायलाच हवे. बदामामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो. बदामामध्ये हेल्दी फॅट्स, प्रोटीनचा स्रोत, मॅग्नीशिअम आणि व्हिटॅमिन E त्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो.

9. अतिरिक्त भूक ठेवते नियंत्रणात

कधी कधी काहींना विनाकारण नको त्या वेळी नको ते खाण्याची सवय असते. मग तुम्ही कितीही डाएट करत असलात तरी ही भूक नियंत्रणात राहात नाही. जर तुम्हाला अशी अतिरिक्त भूक लागत असेल तर तुम्ही मधल्या आणि चुकीच्या भुकेच्यावेळी बदाम खाल्ले तर तुमची भूक नियंत्रणात राहील. तुमच्या शरीराला आवश्यक असलेली उर्जा तुम्हाला यामधून मिळू शकेल.

10. स्मरणशक्ती

तुम्ही अनेकांना हे बोलताना नक्कीच ऐकले असेल की, बुद्धी वाढवण्यासाठी बदाम खा. ते अगदी खरं आहे. तुमच्या मेंदूला रिलॅक्स करण्याचे काम करते. त्यामुळे तुमची बुद्धी तल्लख राहते. तुम्हाला गोष्टी चांगली लक्षात राहतात. त्यामुळे लहान मुलांना बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो.

ADVERTISEMENT

सुदंर त्वचेसाठी आणि केसांसाठी बदाम आहे वरदान (Beauty Benefits Of Almonds In Marathi)

Beauty Benefits Of Almonds In Marathi
Almond Benefits In Marathi

आरोग्यासोबतच बदामाचा वापर हा सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. क्रिम, स्क्रब, तेल अशा स्वरुपामध्ये बदामांचा उपयोग केला जातो. पण बदामाचे नेमके तुमच्या त्वचेला काय फायदे होतात ते देखील आपण आता जाणून घेऊया.

1. मऊ मुलायम त्वचा

जर तुमची त्वचा कोरडी, रुक्ष आणि खरखरीत असेल तर त्याला मुलायम करण्याचे काम बदाम करते. बदामामधील व्हिटॅमिन B आणि C तुमची त्वचा चांगली करण्याचे काम करते. त्यामुळे कोरडी त्वचा असणाऱ्यांसाठी बदाम हे एक प्रकारे वरदान आहे. बदामाच्या तेलाचा वापर करुन तुम्हाला तुमची कोरडी त्वचा मुलायम करता येईल. शिवाय बदाम असलेल्या सौंदर्यप्रसाधनांमुळेही तुमची त्वचा मुलायम होण्यास मदत होऊ शकेल.

2. केसगळती होते कमी

जर तुमचे केस गळत असतील तर बदाम तुमची केसगळती रोखून तुमच्या केसांच्या वाढीला चालना देण्याचे काम करते. बदामामध्ये असलेले मॅग्नेशिअम आणि न्युट्रीएडंस तुमचे केस जाड करतात. शिवाय तुमच्या केसांच्या वाढीला मदत करतात. तुमच्या केसांशी निगडीत असलेल्या अनेक समस्या बदामामुळे कमी होऊ शकतात. त्यामुळे केसगळती किंवा केसांच्या समस्या असणाऱ्यांसाठी बदामाचे तेल हे उत्तम असते.

3. केमिकल फ्री मेकअप रिमुव्हर

Chemical Free Makeup Remover
बदाम खाण्याचे फायदे

मेकअप केल्यानंतर तो काढणे म्हणजे एक दिव्यच असते. मेकअप काढण्यासाठी आता कितीही सोल्युशन आले आणि त्याने कितीही झटपट मेकअप निघत असला तरी त्यात केमिकल हे असतेच. पण जर तुम्ही बदामाच्या तेलाचा उपयोग केलात तर तुमचा मेकअप अगदी सहज तुम्हाला काढता येतो. बदामाचे तेल नारळाच्या तेलाच्या तुलनेत कमी तेलकट असते. त्यामुळे तेलामुळे होणारा पिंपल्सचा त्रासही तुम्हाला होणार नाही.

ADVERTISEMENT

4. डोळ्यांसाठी बदाम चांगले

तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी बदाम हे उत्तम आहे. बदामामध्ये असलेले व्हिटॅमिन E तुमच्या डोळ्यांसंदर्भातील सगळ्या तक्रारी दूर करते. तुम्हाला जर चष्मा असेल तर तुमची दृष्टी सुधारण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी खायला सांगितल्या जातात. त्यामध्ये बदामाचा  समावेश आहे. तुमचे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही बदामाचा आहारात समावेश करायला हवा.

5. पिंपल्सचे डाग करते कमी

चेहऱ्यावर असलेले डाग कमी करण्यासाठी बदामाचा उपयोग करता येऊ शकतो. तुम्ही बदामाचा कसाही उपयोग करुन तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी करता येऊ शकतात. शिवाय तुमच्या पिंपल्सना कमी करण्याचे कामही बदाम करु शकते.

6. त्वचा चमकण्यास करते मदत

त्वचेवर असलेला ग्लो कोणाला आवडत नाही. चेहऱ्यावरील ग्लो तुमची संपूर्ण पर्सनॅलिटी बदलून टाकते. त्वचेचे सगळे विकार दूर झाल्यानंतर तुमच्या त्वचेला आपोआपच ग्लो येतो. बदामाच्या सेवनामुळे किंवा बदामाच्या सौंदर्यप्रसाधनांमुळे तुमच्या त्वचेला नैसर्गिक पद्धतीने ग्लो येतो. हा ग्लो तात्पुरता नाही तर कायम टिकणारा असतो.

7. त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकते

त्वचा चांगली असण्यासोबतच त्याची काळजी घेणे फार आवश्यक असते. त्वचेची काळजी घेण्यामध्ये स्क्रब, मॉश्चरायझ करणे आवश्यक असते. तुमच्या त्वचेवर जर मृत त्वचा असेल तर त्याला अगदी सहजपणे काढून टाकण्याचे काम बदाम करु शकते. तुमच्या त्वचेला कोणतीही हानी न पोहोचवता बदाम तुमच्या त्वचेवरील मृत त्वचा अत्यंत नाजूकपद्धतीने काढते. असे करताना तुमच्या त्वचेला तजेला देण्याचे कामही बदाम करते. त्यामुळे जर तुम्हाला कोणते स्क्रब वापरु असा प्रश्न असेल तर तुम्ही बदामाचा वापर करु शकता.

ADVERTISEMENT

8. त्वचेची जळजळ थांबवते

काही कारणामुळे त्वचेला जळजळ होते. अशावेळी बदाम असल्यास तुम्ही बदाम चंदनाप्रमाणे उगाळून तुमच्या चेहऱ्याला लावू शकता. बदामाच्या थंडाव्यामुळे तुमच्या त्वचेवरील जळजळ कमी होण्यास मदत होऊ शकते. जर घरात चंदन नसेल पण बदाम असेल तर तुम्हाला त्याचा उपयोग हमखास करता येईल.

9. चिरतरुण त्वचा

वयपरत्वे तुमच्या त्वचेवर सुरकुत्या येतात. पण काहींना खूप कमी वयातही अशा चेहऱ्याला सुरकुत्या येतात. त्वचा चिरतरुण राहावे असे अनेकांना वाटते. जर तुम्हालाही असे वाटत असेल तर तुम्ही बदामाचा उपयोग करायला हवा. बदामाचा उपयोग केल्याने तुम्हाला अपेक्षित असलेली त्वचा तुम्हाला नक्कीच मिळू शकेल. 

10. नैसर्गिक मॉश्चरायझर

बदामामध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म तुमच्या त्वचेसाठी चांगले आहेत हे तर तुम्ही वाचलेच. पण तुम्ही सौंदर्यप्रसाधन म्हणून बदामाचा उपयोग केला तर तुमची त्वचा अधिक चांगली होईल. बदामामाध्ये असलेले गुणधर्म तुमच्या त्वचेला नैसर्गिक पद्धतीने मॉश्चराईज करत असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी बदामाचा कोणत्याही पद्धतीने वापर करायला हवा.

बदामाचा केसांसाठी आणि त्वचेसाठी असा करा वापर (How To Use Almond For Skin And Hair)

How To Use Almond For Skin And Hair
Badam Khanyache Fayde In Marathi

तुम्ही केसांसाठी आणि तुमच्या त्वचेसाठी बदामाचा वापर करु शकता. पण त्याचा उपयोग कसा करायचा हे देखील तुम्हाला माहीत हवे. आता आपण काही असे मास्क पाहूया ज्याचा उपयोग तुम्ही तुमच्या केसांसाठी आणि चांगल्या त्वचेसाठी करु शकता.

ADVERTISEMENT

केसांसाठी हनी-बनाना-आलमन्ड हेअर मास्क

तुमचे केस कोरडे झाले असतील तर तुम्ही हा मास्क अगदी हमखास ट्राय करुन पाहू शकता. तुम्हाला एका भांड्यात काही वाटलेले बदाम, साधारण मोठा चमचा मध आणि पिकलेलं केळं घ्या. ते एकत्र करुन तुम्ही तयार हेअर मास्क केसांना लावायचा आहे. तुम्हाला हा मास्क लावल्यानंतर गरम पाण्याची वाफ घेता आली तर फारच उत्तम. साधारण 20 ते 30 मिनिटं हा मास्क ठेऊन तुम्हाला तुमचे केस धुवून टाकायचे आहेत.

अवकाडो आणि बदाम हेअर मास्क

तुम्हाला केस गळती थांबवून केस चांगले वाढवायचे असतील तर तुम्हाला हा मास्क नक्कीच ट्राय करुन पाहायला हवा. तुम्हाला अवाकाडो आाणि बदाम समप्रमाणात घेऊन त्याचा मास्क तयार करायचा आहे. तयार मास्क स्वच्छ केसांवर आणि तुमच्या स्काल्पला लावायचे आहे. साधारण 40 मिनिटे हा मास्क ठेऊन मग तुम्हाला तुमचे केस स्वच्छ धुवायचे आहेत.

बदाम- लिंबू स्कीन लाईटनिंग मास्क

तुम्हाला एक ते दोन बदामाची पेस्ट तयार करायची आहे. बदाम तुम्ही मिक्सरमधून वाटून घेण्यापेक्षा तुम्ही उगाळून घेतले तर जास्त चांगले. त्यात तुम्हाला लिंबाचा रस घालून तयार मास्क तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला आणि मानेला लावायचा आहे. मास्क वाळल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ धुवायचा आहे. या मास्कमुळे तुमच्या त्वचेचा रंग उजळण्यास मदत होईल. आठवड्यातून दोनदा असे करुन पाहायला काहीच हरकत नाही.

अंड आणि बदामाचे तेल

अंड तुमच्या केसांसाठी चांगले असते. तुम्ही या दोघांना एकत्र करुन वापरले तर तुम्हाला त्याचा फायदा अधिक होईल. तुम्हाला एका अंड्याचा पांढरा बलक घेऊन तो फेटायचा आहे. त्यामध्ये बदामाचे तेल घालून तुम्हाला तुमच्या केसांना तयार मास्क लावायचा आहे. हा मास्क तेलाप्रमाणेच आहे. तुम्हाला हा मास्क लावून मसाज करायचा आहे आणि मग स्वच्छ केस धुवून टाकायचे आहे.

ADVERTISEMENT

ओटमिल- आलमन्ड फेस मास्क

तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही ओट्सचा वापर करू शकता. ओटमिल- बदामाचे मास्कही नक्की तयार करु शकता तुम्हाला एका भांड्यात ओट्स आणि वाटलेले बदाम घ्यायचे आहेत ते भिजवून तुम्हाला तयार मास्क तुमच्या चेहऱ्याला लावायचा आहे. मास्क वाळल्यानंतर तो काढताना तुमच्या चेहऱ्यावर ते स्क्रब करायचे आहे. म्हणजे तुम्हाला त्याचे दुप्पट फायदे मिळतील.

बदामासंबंधी तुम्हाला हे माहीत हवं (FAQ’s)

1. बदाम भिजवून खाण्याचा सल्ला का दिला जातो ?

साल असलेले बदाम खाण्यापेक्षा बदाम रात्रभर भिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो. अभ्यासानुसार जर तुम्ही बदाम भिजवून खाल्ले तर त्याचे साल काढून तुम्ही बदामाचे सेवन करता त्यामुळे तुमची पचनशक्ती वाढते. भिजवलेल्या बदामामधून इन्झाईम लीप्स येते. ज्याचा फायदा म्हणजे फॅट पचण्यास मदत मिळते.म्हणूनच जर तुम्ही बदाम भिजवून खाल्ले तर तुम्हाला त्याचा फायदा मिळेल.

2. कच्चे बदाम खाणे आरोग्यासाठी चांगले आहे का ?

बदाम न्युट्रिएंटसने भरलेले असते. तुम्हाला जर कच्चे बदाम खायला आवडत असतील तर तुम्ही त्यांचे सेवन करु शकता. कच्च्या बदामामध्ये ओमेगा 3 असते. जे तुमच्या शरीरासाठी आवश्यक असते. हृदयविकारासंबंधीचे सगळे आजार बदामाच्या सेवनामुळे दूर होतात. 

3. दिवसातून किती बदाम खाणे चांगले ?

बदाम एकदा खायला घेतले की अनेक जण ते स्नॅक्ससारखे खातात. ते खाणं कुठे थांबवायचं ते नेमकं कळत नाही. पण जर तुम्हाला बदाम खायला आवडत असेल तर तुम्ही ते किती खायला हवे हे देखील तुम्हाला माहीत हवे. समोर आलेल्या अभ्यासानुसार तुम्ही दिवसाला किमान 23 बदाम खाऊ शकता. त्यापेक्षा जास्त बदाम तुम्ही खाऊ नका. कारण त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. 

ADVERTISEMENT

4. कोणते बदाम खाण्यासाठी चांगले ?

जगभरात वेगवेगळे देश बदामाची शेती करते. यामध्ये पहिला क्रमांक अमेरिकेचा लागतो. त्याखालोखाल स्पेन, इराण, मोरक्को या देशांचा क्रमांक लागतो. बदामाचा विचार केला तर कॅलिफोर्निया बदाम हे सगळ्यात चांगले बदाम मानले जातात. उत्तम प्रतीचे बदाम देशातही आयात केले जातात. त्यांचा आकार आणि त्यांची चव ही वेगळी असते. ते तुम्हाला हे बदाम खाल्यानंतर नक्कीच लक्षात येईल.

5. बदाम खाण्याचे काही दुष्परिणाम आहेत का ?

जर तुम्ही एकच वेळी खूप बदाम खाल्ले तर त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. बद्धकोष्ठता,पोट फुगणे, पोट बिघडणे असे काही त्रास तुम्हाला होऊ शकतात. त्यामुळे बदाम अगदी मोजून खायला हवेत.

05 Sep 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT