ADVERTISEMENT
home / Care
ब्राम्हीने थांबेल केस गळणे, जाणून घ्या कसा करावा वापर

ब्राम्हीने थांबेल केस गळणे, जाणून घ्या कसा करावा वापर

भारतात अनेक औषधी वनस्पती आढळतात. ज्यांचा वापर आरोग्य आणि सौंदर्यासाठी केला जातो. ब्राम्ही या  वनस्पतीला आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान आहे. ब्राम्हीचा वापर स्मरणशक्ती वाढवण्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे ब्राम्ही तुमच्या केसांच्या वाढीसाठी लाभदायक ठरते. ब्राम्हीमध्ये कॅल्शिअम, झिंक, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन सी, सेलेनिअम आणि व्हिटॅमिन बी १, बी २ असते. यासाठीच अनेक हेअर प्रॉडक्टमध्ये ब्राम्हीचा वापर केला जातो. ब्राम्हीच्या पाने, फुले, मुळांमध्ये औषधी गुणधर्म असतात. ब्राम्ही पावडर अथवा तेल स्वरूपात तुम्ही केसांसाठी वापरू शकता. यासाठीच जाणून घ्या ब्राम्हीचे केसांवर काय फायदे होतात. 

ब्राम्हीचे केसांवर होणारे फायदे –

आरोग्याप्रमाणेच ब्राम्ही वनस्पती तुमच्या केसांच्या वाढीसाठी पुरक आणि पोषक असते यासाठीच जाणून घ्या फायदे

केसांना फाटे फुटणे कमी होते –

आजकाल धुळ, माती, प्रदूषण, अती हेअर ट्रिटमेंट याचा परिणाम केसांवर होताना दिसतो. केस कोरडे झाल्यामुळे केसांच्या टोकांना फाटे फुटतात. फाटे फुटलेल्या केसांची पुढे वाढ होत नाही. यासाठी ते वेळच्या वेळी ट्रिम करून केसांचे पोषण कसे होईल याचा विचार करायला हवा. तुम्ही ब्राम्हीचा वापर केला तर केसांचे फाटे फुटणे कमी होते. कारण ब्राम्हीमुळे केसांवर संरक्षण कवच निर्माण होते. ज्यामुळे केसांचे योग्य पोषण होते आणि फाटे फुटण्यापासून केसांचा बचाव होतो.

केस गळणे कमी होते –

केस गळणे ही अलिकडे मोठ्या प्रमाणावर जाणवणारी समस्या आहे. केसांच्या अपुऱ्या पोषणामुळे आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे केस गळणे वाढत जाते. मात्र जर तुमचे केस गळून टक्कल पडण्याची वेळ आली असेल तर तुम्हाला वेळीच सावध व्हायला हवं. ब्राम्हीचे तेल नियमित वापरल्यामुळे तुमचे केस गळणे कमी होऊ शकते. ब्राम्हीचे तेल तुमच्या केसांच्या मुळांमध्ये मुरते आणि त्यांना मजबूत करते. 

ADVERTISEMENT

कोंडा कमी होतो –

ब्राम्हीमुळे त्वचेला पोषण मिळते. जर तुमच्या केसांमध्ये सतत कोंडा होत असेल तर याचा अर्थ तुमच्या स्काल्पचे योग्य पोषण होत नाही. केसांमधील त्वचेचं पोषण न झाल्यामुळे त्वचा कोरडी होते आणि केसांमध्ये कोंडा होतो. यासाठीच केसांचे जास्तीत जास्त पोषण कसे होईल याची काळजी घ्यायला हवी. तुम्ही नियमित केसांना ब्राम्हीच्या तेलाने मसाज करून केसांची काळजी घेऊ शकता. ब्राम्हीच्या तेलामुळे केसांच्या खालील त्वचा स्वच्छदेखील होते. ज्यामुळे त्वचेचं इनफेक्शनपासून संरक्षण होतं.

instagram

केसांची वाढ जोमाने होते –

ताणतणाव, चिंता, काळजी अती दगदग याचा परिणाम तुमच्या केसांवर होतो आणि केस अती प्रमाणात गळू लागतात. मात्र जर तुम्ही नियमित ब्राम्हीच्या तेलाने केसांना मालिश केली तर तुमचा ताण कमी होतो. तुम्हाला शांत वाटू लागतं, निवांत झोप लागते. ताणतणाव कमी करण्यासाठी नियमित केसांना ब्राम्ही तेलाने मसाज जरूर करा. 

ADVERTISEMENT

ब्राम्हीचा केसांवर कसा वापर करावा –

ब्राम्ही तुम्ही पावडर अथवा तेलाच्या स्वरूपात केसांवर वापरू शकता. जसं की, ब्राम्हीची पाने सुकवून त्या पावडरचा वापर तुम्ही केसांवर एखाद्याय हेअर मास्कप्रमाणे करू शकता. ब्राम्हीच्या तेलात ब्राम्हीचे औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे केसांना ब्राम्ही तेल लावणे नक्कीच फायद्याचे ठरते. तुम्ही घरच्या घरी ब्राम्हीचे  तेल करू शकता.

होममेड ब्राम्ही तेल कसे बनवावे

साहित्य- 

  • नारळाचे तेल
  • ब्राम्हीची पाने

तेल बनवण्याची पद्धत –

ADVERTISEMENT
  • एका भांड्यात पाणी घ्या त्यात ब्राम्हीची पाने टाका
  • पाने उकळून त्याचा अर्क काढा. म्हणजे पाणी निमपट होईपर्यंत ते उकळा
  • या पाण्यात नारळाचे तेल टाका आणि काही मिनिटे मंद गॅसवर गरम करा
  • ज्यामुळे पाण्याची वाफ होईल आणि तेलामध्ये ब्राम्हीचा अर्क उतरेल
  • थंड झाल्यावर हे तेल एका बाटलीत भरून ठेवा आणि केसांना लावा 

instagram

फोटोसौजन्य – 

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

केसांना तेल लावल्यावर करू नका ‘या’ चुका

आवळा शॅम्पूच्या वापराने होतील केस सुंदर (Best Amla Shampoo For Hair In Marathi)

रीठा वापरून घरीच तयार करा आयुर्वेदिक शॅंम्पू आणि कंडिशनर

14 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT