आवळा, आमला, gooseberry नावाने ओळखले जाणारे तुरट असे हे फळ. फारच फायदेशीर आहे. अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये याचा वापर केला जातो. आवळा जितका तुरट असतो. तितकाच तो आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी वरदान आहे. व्हिटॅमिन C ने युक्त असे हे लहानसे फळ केसांसाठी फारच चांगले आहे. आवळ्याचे फायदे लक्षात घेत आवळ्याचा वापर तुम्ही केसांसाठी करण्याचा निर्णय घेतला असेल तर बाजारात मिळणारे आवळा शॅम्पू तुम्ही वापरुन पाहायला हवेत. तुमच्या सुंदर केसांना अधिक चमक मिळावी, केसांची वाढ चांगली व्हावी यासाठी आम्ही काही उत्कृष्ट आवळा शॅम्पू शोधले आहेत. जे तुम्ही नक्की वापरुन पाहायला हवेत. पण या सोबतच तुम्हाला आवळ्याचे फायदेही माहीत हवेत.
आवळा आणि रिठाचे कॉम्बिनेशन असलेला हा शॅम्पू तुमच्या केसांसाठी एकदम बेस्ट चॉईस आहे. केसांच्या वाढीसाठी हा शॅम्पू हा बेस्ट आहे कारण या शॅम्पूमध्ये रिठा आहे. रिठा केस नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ करतो. आणि आवळ्याचे घटक केसांच्या वाढीला चालना देऊन केसांची उत्तम वाढ करतात. हा शॅम्पू नैसर्गिक घटकांनी बनले असल्यामुळे तो अनेकांच्या आवडीचा आहे.
फायदे (Pros): हा शॅम्पू पुरुष आणि स्त्री दोघांसाठी आहे.त्यामुळे घरातील कोणत्याही व्यक्तीला हा वापरता येईल.
तोटे (Cons): या शॅम्पूची किंमत ही थोडी जास्त आहे. याच्यामध्ये आवळ्यासोबत शिकेकाई, रिठा असेही काही घटक आहेत .जे कदाचित तुम्हाला नको असतील
केसांची मजबूत मुळ तुम्हाला हवी असतील तर तुमच्यासाठी हा शॅम्पू एकदम बेस्ट आहे. केसांच्या वाढीसाठी यामध्ये अनेक वेगळे घटक टाकण्यात आले आहेत. मेथी दाणा, गव्हाचा अर्क,जास्वंदाचा अर्क, खस असा वेगवेगळ्या घटकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. ज्यामुळे केसांच्या वाढीला चालना मिळते. केसगळत कमी होण्यास मदत मिळते.
फायदे (Pros): एकाचवेळी केसांसाठी अधिक फायदे देणारे घटक असल्यामुळे हा एक बेस्ट शॅम्पू आहे. यामुळे केसांना एकाचवेळी अनेक फायदे मिळतात.
तोटे (Cons) : केसांसाठी एखादा बजेट शॅम्पू शोधत असाल तर हा बजेट शॅम्पू मुळीच नाही. त्यामुळे तुम्ही तो घेताना थोडासा विचार करा.
खादी हे सौंदर्य उत्पादनामधील अग्रेसर असे नाव आहे. यांचे नैसर्गिक घटक केसांसाठी फारच फायदेशीर असतात. केसांसाठी आवळा आणि भृंगराज हे दोन्ही फारच फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्ही याचा नक्कीच उपयोग करुन सुंदर केस मिळवू शकता. केसांची वाढ होण्यासाठी हा शॅम्पू खूपच चांगला आहे. त्यामुळे तुम्ही या शॅम्पूची निवड करु शकता.
फायदे (Pros): आवळा आणि भृंगराज केसांच्या वाढीला चालना देते. केसांची मूळं मजबूत करुन केसं अधिक मजबूत करते.
तोटे (Cons): आवळ्याला फारसा वास नसला तरी भृंगराजला थोडासा वेगळा वास असतो. त्यामुळे कदाचित हा तुम्हाला आवडणार नाही.
शिकेकाई, बेहडा, रिठा आणि आवळा असे आवश्यक घटक असलेला हा शॅम्पू ही तुमच्य केसांसाठी आहे उत्तम निवड. केसांना स्वच्छ करुन त्याचा तेलकटपणा काढण्याचे काम शिकेकाई, रिठा करते. तर आवळा केसांना मजबुती देण्याचे काम करते. अगदी जरासा शॅम्पू वापरला तरी केस उत्तम होतात. केस अधिक चमकदार आणि चांगले दिसतात.
फायदे (Pros): आवळ्यासोबत यामध्ये असलेले अन्य घटक केसांच्या वाढीसाठी फारच उत्तम आहे. केसांशी संबंधित अनेक समस्या दूर करण्याचे काम हा शॅम्पू करते.
तोटे (Cons) : जर तुम्हाला अॅलोवेराची एलर्जी असेल तर तुम्ही त्या दृष्टिकोनातून प्रॉडक्टची निवड करा.
बिफा या आयुर्वेदिक कंपनीचा हा आवळा शॅम्पू ही आहे फारच उत्तम आहे. केसांना उत्तम रक्त पुरवठा करणे, केस स्वच्छ करणे, केसांचा रंग टिकवणे आणि केसांना उत्तम वाढ देणे असे या शॅम्पूचे फायदे आहेत. हा अगदी साधासोपा आणि फायदेशीर असा शॅम्पू आहे.
फायदे (Pros): केसांच्या अनेक तक्रारींवर हा एक उत्तम शॅम्पू आहे. यामुळे केस स्वच्छ होण्यास मदत मिळेल. केस अधिक चांगले दिसू लागतील.
तोटे (Cons): याचे फार काही तोटे नाहीत. त्यामुळे तुम्ही त्यांची निवड करु शकता.
लोटस हर्बल यांचा हा आवळा- शिकेकाई शॅम्पू अनेकांच्या आवडीचा आहे. आवळा, रिठा, बेहडा असे घटक यामध्ये असल्यामुळे केस मुलायम आणि चमकदार होण्यास मदत मिळते. केसांमधील कोंडा कमी होतो. शिवाय तुमच्या बजेटमध्येही हा शॅम्पू बसतो
फायदे (Pros): बजेट फ्रेंडली असा हा शॅम्पू आहे. ही एक अग्रगण्य कंपनी असल्यामुळे केसांना त्याचा खूप फायदा होतो.
तोटे (Cons): जर तुम्हाला नैसर्गिक घटक चालत नसतील तर तो तुमच्या केसांसाठी घातक ठरु शकतो.
आवळा- रिठा आणि शिकेकाईचे गुणधर्म असलेला हा शॅम्पू अनेकांच्या आवडीचा आहे. आवळा- रिठा आणि शिकेकाईमुळे केसांची वाढ होते. तसेच केसांचा एक चांगली चमक मिळते. केसांच्या उत्तम वाढीसाठी हा शॅम्पू फार बेस्ट चॉईस आहे.
फायदे (Pros): स्त्री आणि पुरुष दोघांसाठी हा शॅम्पू असून यामुळे केसांना अधिक फायदा होतो. केसांच्या उत्तम वाढीसाठी आणि केसगळतीसाठी हा एक उत्तम शॅम्पू आहे.
तोटे (Cons) : जर तुम्हाला शिकेकाई नको असेल तर तुम्ही हा शॅम्पू टाळा
आवळा शॅम्पूबद्दल बोलतोय आणि डाबरचे प्रॉडक्ट येणार नाही असे मुळीच होणार नाही. कारण आजही अनेकांच्या सौंदर्याच्या व्याख्येमध्ये डाबरचे प्रॉडक्टस येतात. केसांसाठी डॅमेज थेरपी असलेला असा हा शॅम्पू असून यामध्ये अनेक वेगळ्या घटकांचा समावेश आहे.
फायदे (Pros): उत्तम ब्रँड आणि इतक्या वर्षांची परंपरा असल्यामुळे या शॅम्पूवर विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही.
तोटे (Cons): तुम्हाला एकाच शॅम्पूमध्ये असे खूप असे घटक नको असतील तर हा शॅम्पू तुमच्यासाठी नाही
केसांच्या वाढीसोबतच केसांना उत्तम कंडिशन करण्याचे काम हा शॅम्पू क्लिन्झर करतो. केसांच्या वाढीला चालना देण्याचे काम करुन केसातील कोंडा कमी करण्यासाठी हा शॅम्पू फायदेशीर आहे पॅराबिन आणि कोणतेही केमिकल्स नसल्यामुळे हा एक उत्कृष्ट नॅचरल असा शॅम्पू आहे.
फायदे (Pros): यात कोणतेही केमिकल्स नाहीत. त्यामुळे याचा त्रास केसांना होत नाही.
तोटे (Cons): काहींना नैसर्गिक घटकांची अॅलर्जी असते. त्यांनी वापरताना विचार करावा.
आवळा आणि भृंगराजचे उत्तम कॉम्बिनेशन असलेला हा शॅम्पू आहे जो केसांसाठी फारच फायदेशीर आहे. या शॅम्पूच्या वापरामुळे आवळ्याचे जास्तीत जास्त घटक केसांना मिळतात. यात कोणतेही केमिकल्स नसल्यामुळे केसांना हानी पोहोचत नाही.
फायदे (Pros): नैसर्गिक घटकांनी युक्त असा हा शॅम्पू केसांसाठी वरदान आहे.
तोटे (Cons): नैसर्गिक घटकांचा समावेश असल्यामुळे हा शॅम्पू थोडासा उग्र वाटू शकतो. याचा सौम्य असा सेंट जाणवणार नाही. काही काळासाठी याच्या वापरामुळे कोरडेपणा जाणवू शकतो. पण नंतर केस चांगले दिसतील.
व्हिटॅमिन C ने युक्त अशा आवळ्याचे खूप फायदे आहेत केसांसाठी तर आवळा वरदान आहे. जाणून घेऊया आवळ्याचे फायदे
आवळ्याचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे केसांच्या वाढीला चालना देणे. आवळ्यामधील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स केसांच्या वाढीला चालना देण्याचे काम करते. अगदी कोणत्याही वयात केसांची वाढ खुंटली असेल तर केसांच्या मुळांना पोषक घटक पुरवून केस वाढवण्याचे काम आवळा करते. आवळ्याची पेस्ट करुन किंवा रस काढून तुम्ही मुळांना लावला तर केसांच्या वाढीला चालना मिळते. जर तुमचे केस वाढत नसतील तर तुम्ही आवळ्याचे सेवन किंवा आवळ्याचा अशा पद्धतीने वापर केल्यामुळे केसांच्या वाढीला चालना मिळते.
केसात कोंडा झाला असेल तर तुमच्यासाठी आवळा हे वरदान आहे. कोंडा हा बरेचदा तेलकट स्काल्पमुळे होते. जर तुमची स्काल्प खूपच तेलकट असेल तर अशी त्वचा सुकल्यानंतर त्याचा कोंडा तयार होतो. आवळ्याच्या वापरामुळे स्काल्प स्वच्छ होते पर्यायी कोंड्याचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. स्काल्प स्वच्छ झाल्यामुळे केसांच्या वाढीला आपोआप चालना मिळते.
अकाली केस पांढरे होण्याचा त्रास अनेकांना असतो. केस पांढरे का होतात? यासाठी मेलनिन कारणीभूत असले तरी देखील शरीरात चांगल्या गोष्टी गेल्या की, केसांचा रंग हा टिकून राहतो. आवळ्यामधील घटक हे केसांचा रंग टिकवण्यास मदत करतात. त्यामुळे अकाली केस पांढरे होण्याची चिंता कमी होते. आवळ्याच्या सेवनाने किंवा ते असलेले प्रॉडक्ट वापरल्यामुळे केस अधिक काळासाठी काळे राहतात.
केस गळतीचा त्रास असेल तर तुमच्यासाठी आवळा एकदम बेस्ट आहे. आवळ्याच्या वापरामुळे केस गळती कमी होते. केसांच्या मुळांना मजबूती आणण्याचे काम आवळा करत असल्यामुळे केसगळती कमी होते. केसांची गळती जास्त झाली असले तर तुम्ही अगदी हमखास केसांसाठी आवळ्याचा वापर करायला हवा. केसांना कोणतेही केमिकल्स लावण्यापेक्षा आवळ्याची पेस्ट किंवा आवळा रस लावला की, केस गळती कमी होण्यास मदत मिळते.
केसांना रंग देण्याचे काम मेलनिन हे रंगद्रव्य करत असले तरी अनेक घटक हे रंगद्रव्य टिकवण्याचे काम करते. आवळ्यामधील अनेक उपयुक्त ङटक केसांचा रंग टिकवण्याचे काम करते. केसांचा असलेला मूळ रंग टिकवून केसांना चमक देते. त्यामुळे केस हे अधिक सुंदर आणि चांगले दिसतात. केसांच्या रंगासाठी आवळा हे फारच उत्तम आहे.
आवळा हे फळ व्हिटॅमिन C ने युक्त असते. त्यामुळे केस आणि त्वचेसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आवळ्याचे सेवन आणि आवळ्याच्या पाण्याचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. आवळ्याच्या अर्काचा उपयोग करुन शॅम्पू तयार करण्यात येतो. या शॅम्पूच्या वापरामुळे केस अधिक चमकदार होतात. केसांच्या वाढीला चालना मिळते.
काही जणांना आवळ्याचा त्रास असतो. जरा जरी आंबंट शरीरात गेले की, आवळ्याचा अर्क त्वचेला लागला की, त्वचा कोरडी होते. पण ते सर्वस्वी प्रत्येकाच्या त्वचेवर अवलंबून आहे. जर तुम्हाला अॅलर्जी असेल तर तुम्ही आवळ्याचा वापर टाळा. पण जर तुम्हाला आवळ्याचा त्रास नसेल तर मात्र तुम्हाला घाबरण्याचे काहीच कारण नाही.
आवळा केसांसाठी फारच फायदेशीर आहे. केसांना चमक देण्याचे काम आवळा करते. आवळा केसांना मजबूती आणून स्काल्प स्वच्छ ठेवते. त्यामुळे केसांचा कोंडा दूर होतो. त्यामुळे आवळा केसांना मजबूती आणण्याचे काम करतो.