निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी शरीराप्रमाणेच मानसिक स्वास्थही गरजेचं असतं. आजकाल मानसिक स्वास्थाच्या अभावी अनेकजण नैराश्य आणि आत्महत्येसारख्या गोष्टींना बळी पडतात. पूर्वी या विषयावर उघडपणे बोलण्यासाठी लोक संकोच करत असत. मात्र सुशांत सिंह राजपूत प्रकरणामुळे आता अनेकांना या विषयावर उघडपणे बोलण्याचे धाडस मिळाले आहे. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीनेही याबाबत तिचे मत आणि अनुभव उघडपणे मांडला आहे.
नव्याला का घ्यावे लागले मानसिक उपचार
नव्याने कबुल केलं आहे की तिच्यावर काही दिवसांपासून मानसिक उपचार सुरू होते. काही ताणतणावानां सामोरं गेल्यामुळे काही दिवसांपासून ती मानसिक त्रासात होती आणि या त्रासातून बाहेर पडण्यासाठी तिच्यावर मानसिक उपचारही करण्या आले आहेत. या मानसिक अवस्थेतून बाहेर पडल्यावर तिने आणि तिची आई श्वेता बच्चनने एक हेल्थ फाऊंडेशन सुरू केलं आहे. या संस्थेचं नाव ‘आरा हेल्थ फाऊंडेशन’ असून याबाबत एक पोस्ट नव्याने नुकतीच शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने या संस्थेच्या इंन्स्टाग्रामवर पेजवर को – फाऊंडर्स सोबत चर्चा केली आहे. या चर्चेचमुळे मानसिक स्वास्थाबाबत लोकांमध्ये जागरूकता आणि मानसिक रूग्णांना उपचार घेण्याबाबत प्रोत्साहन निर्माण होईल असं तिला वाटत आहे. यात तिने स्वतःचा मानसिक त्रास आणि त्यावर उपचार घेताना आलेला अनुभव लोकांसोबत उघडपणे शेअर केला आहे.
नव्या कशा पद्धतीने गेली या त्रासाला सामोरी
मानसिक त्रास आणि उपचार याबाबत आता उघडपणे बोलण्यात नव्या नवेलीला कोणताच संकोच वाटत नाही. आधी तिला या त्रासावर उपचार घेताना खूपच संकोच वाटत होता. कारण ही गोष्ट तेव्हा तिच्यासाठी खूपच नवीन आणि त्रासदायक होती. तिच्या घरातील सर्वांना ती या थेरेपी घेत आहे हे माहीत होतं. मात्र तिच्या मित्रमैत्रिणींना याची मुळीच खबर नव्हती. तिने अजूनही तिच्या फ्रेंड्सनां याबाबत काही सांगितलेले नाही. त्यामुळे त्यांना सांगावं की नाही याबाबत ती अजूनही ठाम नाही. नव्याने पुढे सांगितलं आहे की, तिच्या आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा तिच्या आजुबाजुला सकारात्मक विचारांचे लोक नव्हते. ज्यामुळे तिच्या विचारांवरही या गोष्टींचा परिणाम झाला होता. तिच्या मनात सतत नकारात्मक विचार येत असत. हे विचार फक्त स्वतःबद्दल नसत तर इतरांबद्दल ही ती नकारात्मक विचार करत असे. थेरपीमुळे तिला या त्रासातून बाहेर पडण्यास मदत झाली. नव्याच्या या व्हिडिओवर तिच्या आईने श्वेता बच्चनने तिला ‘ब्रावो’ अशी कंमेट दिली आहे. तिच्या या धाडसाचा आणि स्तुत्य उपक्रमाचा उपयोग इतरांना व्हावा आणि सर्वांना मानसिक स्वास्थ मिळावे अशीच तिची इच्छा आहे. नव्या नवेली 23 वर्षांची असून तिने न्युयॉर्कच्या फोरडम युनिव्हर्सिटीतून डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी घेतली आहे. याच वर्षी तिने हे पदवीचे शिक्षण पूर्ण केलं असून ती पुन्हा मुंबईतील तिच्या घरी परतली आहे. नव्याच्या मित्रमंडळींमध्ये शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान आणि जावेद जाफरीचा मुलगा मीजान जाफरी यांचा समावेश आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
प्रदर्शित व्हायच्या आधीच ‘गँग्ज ऑफ फिल्मिस्तान’वादात, अभिनेत्रीचा आरोप
अक्षय कुमारचा नवा स्टंट, बेअर ग्रिल्ससोबत करणार खतरनाक जंगलात भटकंती
संजय लीला भन्सालीला अखेर ‘बैजू बावरा’ सापडला, 13 वर्षानंतर करणार एकत्र काम