बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आपल्या 76 व्या वर्षीही बॉलीवूडमध्ये स्थान टिकवून आहेत. आजही अमिताभ बच्चन यांना टक्कर देईल असा एकही अभिनेता नाही. नव्या अभिनेत्यांनाही अमिताभ आजही तितकीच टक्कर देत आहेत. लहान मुलांपासून ते अगदी म्हाताऱ्यांपर्यंत अमिताभ यांचे चाहते नाहीत असं कोणीही नाही. दर रविवारी अमिताभ यांच्या बंगल्याबाहेर त्यांना बघण्यासाठी प्रचंड गर्दी जमते. अमिताभ नेहमी बंगल्याबाहेर येऊन आपल्या चाहत्यांना भेटतात. पण यावेळी 36 वर्ष चालू असलेली परंपरा अमिताभ यांची तब्बेत खराब असल्यामुळे तुटली आहे आणि त्यामुळे अमिताभ बच्चन यांना स्वतःला वाईट वाटत आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
अमिताभ यांची तब्बेत बिघडली
अमिताभ बच्चन यांची दोन दिवसापूर्वी आलेल्या रविवारी तब्बेत बिघडली आणि याबाबत त्यांनी आपल्या चाहत्यांना ट्विट करून माहिती दिली आहे. तब्बेत खराब असल्यामुळे त्यांना रविवारी नेहमीप्रमाणे आपल्या चाहत्यांना भेटता आलं नाही. हे वाचून अर्थातच त्यांचे चाहते निराश झाले असले तरीही अमिताभ यांच्या तब्बेतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी म्हणूनही प्रार्थना केली. अमिताभ बच्चन गेल्या 36 वर्षांपासून आपल्या जुहू येथे असलेल्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर येऊन आपल्या चाहत्यांची भेट घेतात. या साप्ताहिक कार्यक्रमाचं ‘संडे दर्शन’ असंही नाव ठेवण्यात आलं आहे. दर रविवारी प्रचंड प्रमाणात ‘जलसा’च्या बाहेर चाहत्यांची गर्दी जमलेली असते. अमिताभ यांचे चाहते खूप दूरून फक्त त्यांना बघायला रविवारी इथे येतात. त्यावेळी अमिताभ एका प्लॅटफॉर्मवर उभे राहून त्यांना अभिवादन करतात आणि काही वेळाने पुन्हा घरात जातात. त्यांची एक झलक बघण्यासाठी बरेच लोक भारतातील विविध ठिकाणाहून येत असतात.
मुंबईत पहिल्यांदा आलेला माणूस जातो ‘जलसा’वर
यामध्ये कोणतीही शंका नाही ही मुंबईत पहिल्यांदा आलेला माणूस हा अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी ‘जलसा’ बंगल्यावर पोहचतो. प्रत्येकाला अमिताभ बच्चन आणि त्यांचं घर बघण्याची इच्छा असते. अमिताभ बच्चन यांचा बंगला ‘जलसा’ अतिशय सुंदर असून बाजूलाचा अभिषेक आणि ऐश्वर्याचा ‘प्रतीक्षा’ हा बंगलादेखील आहे.
बीग बी ने काय केलं ट्विट?
T 3154 – All Ef and well wishers .. not doing the Sunday meet at Jalsa Gate this evening .. 🙏
— Amitabh Bachchan (@SrBachchan) May 5, 2019
बीग बी ने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, ‘संध्याकाळी आज ‘जलसा’ च्या गेटवर संडे मीटिंग मी करू शकत नाहीये.’ तर ब्लॉगवर माहिती देत अमिताभ यांनी चाहत्यांना उद्देशून लिहिलं आहे की, ‘आज संडे दर्शन करू शकत नाहीये. तुम्हाला सगळ्यांना मी या माध्यमातून माझी तब्बेत ठीक नसल्याचं सांगू इच्छितो. चिंता करण्याचं काहीही कारण नाही. फक्त घराबाहेर पडू शकत नाहीये.’ त्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये बीग बी च्या तब्बेतीविषयी नाही म्हटलं तरी चिंता आहे. बीग बी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी सर्वच चाहते सध्या प्रार्थना करत आहेत.
KBC मध्ये व्यग्र
बीग बी अर्थात अमिताभ सध्या अयान मुखर्जीबरोबर ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटाच्या चित्रकरणात व्यग्र असून नागराज मंजुळेच्या ‘झुंड’ या चित्रपटाचं चित्रीकरणही सध्या चालू आहे. शिवाय लवकरच टीव्हीवरील नावाजलेला ‘केबीसी’ अर्थात कौन बनेगा करोडपतीचा पुढचा सीझनही चालू होत असून त्याचे प्रश्न टीव्हीवर यायला सुरुवात झाली आहे आणि लवकरच या शो चं चित्रीकरणही अमिताभ बच्चन चालू करणार आहेत. त्यामुळे या वयातदेखील एखाद्या तरूणाला लाजवेल अशी एनर्जी अमिभात बच्चनमध्ये असून ते प्रचंड व्यग्र आहेत.
फोटो सौजन्य – Instagram, Twitter
हेदेखील वाचा –
अमिताभ बच्चन यांनी विकली त्यांची आलिशान कार
जेव्हा सारा अली खानने केला अमिताभ बच्चन यांना ‘आदाब’ पहा हा क्युट व्हिडिओ
Good News: बच्चन कुटुंबात पुन्हा नवी खुषखबर, ऐश्वर्या पुन्हा प्रेगनंन्ट