आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जगभरात महिलांच्या स्वावलंबन आणि सशक्तीकरणाविषयी जागरुकता निर्माण केली जाते. बॉलीवूड सिनेसृष्टी या कामात मुळीच मागे नाही. सध्या बॉलीवूडच्या आघाडीच्या आठ अभिनेत्रींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका गाण्याचं टिझर असून लवकरच ते गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित केलं जाणार आहे. या गाण्याचे बोल आहेत ‘कुडी नू नच ने दे’ अभिनेता इरफान खानच्या आगामी चित्रपटातील हे गाणं असून त्यात बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींचा समावेश करण्यात आला आहे.
काय आहे या गाण्यामध्ये खास
इरफान खानच्या आगामी चित्रपटातील कुडी नू नचने दे या गाण्याचं टीझर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन करत आहेत. महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देण्यासाठी या चित्रपटात हा खास प्रयोग करण्यात आला आहे. या चित्रपटाचा प्रमुख कलाकार इरफान खान एका गंभीर आजारपणातून नुकताच बाहेर पडला आहे. ज्यामुळे अंग्रेजी मीडियमच्या प्रमोशनसाठी त्याला फार वेळ देता येत नाही आहे. इरफानच्या या कठीण काळात त्याला मदत करण्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. खास ज्यामुळे इरफान खानच्या या चित्रपटात काम न करताही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी काही आघाडीच्या अभिनेत्री एकत्र आल्या आहेत. त्यांच्या या खास गाण्याच्या माध्यमातून चित्रपटाचं प्रमोशन केलं जाणार आहे. या गाण्यासाठी बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट, राधिका मदान, अनुष्का शर्मा, कतरिना कैफ, अन्यना पांडे, कियारा अडवाणी, क्रिती सनॉन, जान्हवी कपूर यांनी एकत्र काम केलं आहे.
कसा होता या अभिनेत्रींचा अनुभव…
आलिया भटच्या मते तिला या गाण्याचे बोल फारच आवडले आहेत. ज्यातून एखाद्या स्त्रीला मोकळ्या आकाशात मुक्त संचार केल्याप्रमाणे वाटू शकतं. हे गाणं प्रत्येकाला बिनधास्त नाचण्याचं संदेश देतं. शिवाय या गाण्याचा अर्थ खोल असून त्यात एक सुंदर संदेश लपलेला आहे. कतरिना कैफच्या मते, काही खास मित्रांनी या गाण्यात काम करण्याची विनंती केल्यामुळे तिला नाही म्हणणं मुळीच शक्य नव्हतं. या खास मित्रांसाठीच ती या गाण्यात दिसणार आहे.शिवाय या गाण्याचे बोल मनाला वेड लावणारे आहेत. अनुष्काच्या मते, जेव्हा मला या गाण्यासाठी विचारण्यात आलं तेव्हा मी ते माझ्या म्युझिक सिस्टिमवर सतत ऐकून पाहिलं आणि मला ते फारच आवडलं. हे एक असं गाणं आहे त्यामुळे तुम्हाला लगेच आनंद मिळू शकतं. इतर बॉलीवूड अभिनेत्रीदेखील या गाण्यात काम करून नक्कीच खुश आहेत.
फोटोसौजन्य – इस्टाग्राम
हे ही वाचा –
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला
अधिक वाचा –
अमिताभ बच्चनच्या या हिट गाण्यावर थिरकणार असीम आणि जॅकलिन