ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
anniversary gift ideas for husband in marathi

लग्नाच्या वाढदिवसाला त्याला द्या ही अमूल्य भेटवस्तू (Anniversary Gift Ideas For Husband)

लग्नाचा वाढदिवस म्हटला की, पुरुष जोडीदाराला काय भेटवस्तू द्यावी अनेकदा कळत नाही. महिलांसाठी गिफ्ट निवडणे अनेकदा सोपे असते कारण महिलांना गिफ्ट देण्यासाठी अनेक पर्याय असतात. कपडे, मेकअप, ज्वेलरी, बॅग आणि बरंच काही… पण पुरुषांना गिफ्ट देताना अनेकांना काय द्यावे असा प्रश्न पडतो. तुमचा हाच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. जोडीदाराच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही त्याला काय गिफ्ट द्यायला हवं याची एक भली मोठी यादी तयार केली आहे. फॅशन, गॅजेटप्रेमी, खेळाची आवड आणि पार्टी फ्रिक अशा लोकांना नेमके त्यांच्या आवडीचे काय गिफ्ट देता येईल हे तुम्हाला यातून कळेल. मग कसलाही वेळ न घालवता जाणून घेऊया लग्नाच्या वाढदिवसाला शुभेच्छा (anniversary wishes in marathi) त्याला देण्यासाठी अमूल्य भेटवस्तूंसाठीच्या आयडियाज

तुमच्या फॅशनेबल जोडीदारासाठी गिफ्ट (Fashion Freak Him Gift Ideas)

प्रत्येकाची आवड निवड ही वेगळी असते. काही पुरुषांना फॅशनेबल राहायला आवडते. त्यांचे सगळे काही अप डू डेट असते. म्हणजे बाहेर जाताना त्यांना नटून थटून जायला आवडते (नटण्याचा हक्क हा फक्त महिलांनाच नसतो) त्यामुळे वेगवेगळे कपडे किंवा फॅशन ट्रेंड फॉलो करायला अनेकांना आवडतात. अशा फॅशनेबल जोडीदारासाठी गिफ्ट निवडणे एकदम सोपे आहे कारण त्यांच्यासाठी बरेच पर्याय असतात. त्यापैकीच काही खालीलप्रमाणे

ट्रेंडी जॅकेट (Trendy Jackets)

एखादा फॅशनेबल जोडीदार असेल तर त्याला कपडे कितीही द्या कमीच असतात. अनेकांना जॅकेट्स घालायला खूप आवडतात. अनेकांची फॅशन त्यांच्या जॅकेट्सशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. पूर्वी पुरुषांसाठी इतके खास जॅकेट्स नसतील. पण आता इतके वेगवेगळे प्रकारचे जॅकेट मिळतात की, तुम्ही तुमच्या बजेटनुसार या जॅकेट्सची निवड करु शकता. अगदी मोठमोठ्या ब्रँड्समध्ये तुम्हाला डेनिम, स्पोर्टस आणि पार्टीवेअरपद्धतीचे जॅकेट मिळू शकतील.

तुम्ही उत्तम जॅकेट्सच्या शोधात असाल तर या जॅकेट्सची करा निवड

ADVERTISEMENT

टाय, कफलिंग क्युरेटेड बॉक्स (Tie,Cufflinks Curated Box)

‘तेनू सुट सूट कर दा’ हे गाणं मुलीसाठी असलं तरी सुटाबुटातील मुलं अनेकांना आवडतात. ज्यांना स्टाईल आवडते अशी मुलं त्यांच्या वॉर्डरोबमध्ये मस्त एखादा छान सुट नक्कीच ठेवतात. ब्लेझर, फॉर्मल पँट ही अशी गोष्ट आहे जी मुलं सतत बदलू शकत नाहीत ( म्हणजे एखाद्या व्यक्तीला ब्लेझर रोज वापरायची गरज नसेल तर) त्याची सतत खरेदी होत नाही. त्यामुळे एक ठराविक रंग, पॅटर्न मुलांकडे असतो. पण या ब्लेझरला नेहमीच वेगळे दाखवण्याचे काम टाय- कफलिंग करु शकते. थोडासा टायमध्ये बदल केला तरी देखील मुलांच्या लुकमध्ये केवढातरी फरक पडतो. त्यामुळे हे गिफ्ट वायाच जाऊ शकत नाही.

तुम्हाला हवा असेल असा क्युरेटेड बॉक्स तर इथे करा खरेदी

घड्याळ (Watch)

पुरुषांच्या फॅशनमधील अविभाज्य अशी फॅशन अॅसेसरीज म्हणजे घड्याळ. काही पुरुषांना कितीही घड्याळ दिली तरी  ती कमी असतात. काही जणांकडे वेगवेगळ्या घड्याळांचे कलेक्शनच असते.अशा घड्याळप्रेमी जोडीदाराला तुम्ही एक छानसे घड्याळ द्या. घड्याळामध्ये हल्ली वेगवेगळे प्रकार मिळतात. स्पोर्टस, फॉर्मल,डिजिटल असे प्रकार मिळतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे घड्याळ निवडू शकता. पुरुषांचे घड्याळ हे तुलनेने महाग असते.

तुम्ही एक चांगला बजेट तयार करुन मगच घड्याळाची खरेदी करा

ADVERTISEMENT

गॉगल (Glares)

घड्याळानंतर मुलांना आवडणारी आणखी एक गोष्ट म्हणजे गॉगल…  त्यांच्या स्टाईलमध्ये चार चाँद लावण्याचे काम गॉगल्स करतात. गॉगल्समध्ये वेगवेगळ्या फ्रेम्स आणि रंग मिळतात. अगदी टुरींगपासून ते ऑफिससाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे गॉगल निवडता येतात. वेगवेगळ्या ब्रँडचे आणि चांगले गॉगल तुम्हाला घेता येतील. फक्त गॉगल निवडताना तुम्ही सध्याच्या ट्रेंड काय आहे ते एकदा बघून घ्या. म्हणजे तुम्हाला त्यामधील वेगवेगळे प्रकार निवडता येतील.

ग्लेअर्सची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर इथून खरेदी करु शकता

जीन्स किंवा ट्राऊझर (Denim Or Trouser)

मुलांच्या फॅशनमध्ये जीन्स आणि ट्राऊझर हा प्रकार अगदी ठरलेला असतो. जीन्स आणि ट्राऊझरमध्ये अनेक व्हरायटी असतात. तुम्ही त्यापैकी लेटेस्ट अशा ट्रेंडच्या ट्राऊझर आणि पँट्सची निवड करु शकता. जीन्स आणि ट्राऊझर हे पर्याय तुम्हाला बजेटमध्ये मिळू शकतात. तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईीन अशा दोन पद्धतीने याची खरेदी करु शकता. 

जीन्स आणि ट्राऊझरची या ठिकाणी खरेदी करु शकता

ADVERTISEMENT

गॅजेटप्रेमी त्याच्यासाठी गिफ्ट आयडियाज (Anniversary Gift Ideas For Gadget Lover)

जर तुमच्या जोडीदाराला गॅजेटची आवड असेल तर गॅजेट प्रेमींना काही खास गिफ्ट्स तुम्हाला घेता येतील. गॅजेटमध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतात. पण तरीसुद्धा पुरुषांना काही खास गॅजेट्स त्यांच्याकडे असावे असे कायम वाटत राहते. त्यापैकीच काही आम्ही गिफ्ट म्हणून निवडले आहेत. 

पीएस4 (Ps4)

लहान असो वा मोठे हल्ली अनेक पुरुषांना गेमिंगने वेड लावले आहे. मोबाईलवर दिवसभर गेम खेळून झाला तरीही अनेकांना समाधान मिळत नाही. अशांसाठी गेमिंगचा उत्तम पर्याय म्हणजे PS4. तुम्ही या बद्दल कधी ऐकले आहे का?नसेल तर तुम्ही आताच याबद्दल जाणून घ्यायला हवे. याचा फुलफॉर्म म्हणजे प्ले स्टेशन 4  या पूर्वी या खेळाचे व्हर्जन आले होते. पण आता हे नवे आणि अपग्रेडेट व्हर्जन असून यात खेळण्याचा अनुभव हा अधिक चांगला आहे. 
PS4 बद्दल जाणून घ्या महत्वाची माहिती

ब्लूटुथ ट्रॅकर फोन फाईंडर (Bluetooth Tracker Phone Finder)

फोन जपण्याच्या बाबतीत मुलांचा हात कोणीच धरु शकत नाही (याला काही अपवाद नक्कीच असेल) आपला फोन दुर जाऊ नये असे सगळ्यांनाच वाटते. पण फोनवर जास्त प्रयोग करायल आवडतात. ब्लुटुथ फोन फाईंडर हे असे डिवाईस आहे. ज्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा फोन कुठे आहे याचा नक्कीच शोध लावता येईल. बाजारात तुम्हाला अनेक प्रकारचे ब्लुटुथ फाईंडर मिळतील पण तुम्ही हा ब्लुटुथ फाईंडर निवडू शकता.

गृहप्रवेशाला गिफ्ट देण्यासाठी बेस्ट आयडियाज (Gift For House Warming In Marathi)

ADVERTISEMENT

पर्सनलाईज्ड मूड लँप स्पिकर (Personalized Mood Lamp Speaker)

गाणी ऐकून अनेकांचा मूड नक्कीच चांगला होतो. तुम्हालाही तुमच्या जोडीदाराचा मूड चांगला ठेवायचा असेल तर तुम्ही त्यांना एक चांगला स्पिकर घेऊन द्या. हल्ली पर्सनलाईज्ड गिफ्ट असा पर्याय असल्यामुळे या स्पीकरवर तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा एखादा फोटो लावता येतो. त्याचा उपयोग बेड शेजारी एक लँप म्हणून आणि आवडीची गाणी ऐकण्यासाठी स्पिकर म्हणून करता येतो.

या ठिकाणी करा तुमच्या जोडीदारासाठी पर्सनलाईज्ड स्पिकरची खरेदी

पर्सनलाईज टेलिस्कोप (Personalized Telescope)

पृथ्वीच नाही तर अंतराळातील ज्ञान ज्याला आत्मसात करायला आवडते. अशा तुमच्या जोडीदारासाठी पर्सनलाईज्ड टेलिस्कोप हा चांगला पर्याय आहे. याशिवाय ट्रॅकिंग किंवा अँडव्हेंचरची आवड असलेल्या जोडीदाराकडे अगदी असायलाच हवा असा हा गॅजेटचा पर्याय आहे. त्याला एक स्पेशल टच म्हणून यावर जोडीदाराचे नाव कोरुन येणे हे खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला हा पर्याय देखील गिफ्ट म्हणून नक्कीच निवडता येईल.

एमरजन्सी चार्जर मोबाईल (Emergency Charger for Mobile)

मोबाईल हा आपल्या सगळ्यांचाच जीव की प्राण आहे. पण त्याचा वापर आपण इतका करतो की, तो दिवसभर चार्ज राहणे ही गरजेचे असते. सतत फोन चार्ज करण्यासाठीच असलेला हा चार्जरचा पर्याय आम्हालाही खूप आवडला आहे. अगदी कोणलाही आवडेल असे हे गिफ्ट आहे. यामध्येही तुम्हाला वेगवेगळे पर्याय मिळतील. तुम्ही तुमच्या बजेटनुसार याची निवड करा.

ADVERTISEMENT

ख्रिसमससाठी गिफ्ट आयडियाज (Christmas Gift Ideas In Marathi)

खेळाची आवड असणाऱ्यांसाठी खास गिफ्ट्स (Anniversary Gift Ideas For Sports Lover)

तुमच्या जोडीदाराला असे खेळाची आवड किंवा स्पोर्टसमधील सगळे साहित्य आपल्या जवळ असावे असे वाटत असेल अशा जोडीदाराला आवडतील असे काही गिफ्टसचे पर्यायही आम्ही निवडले आहेत. यामधील काही पर्याय तर तुमच्या बजेटमध्ये सहज बसतील असे आहेत.

पर्सनलाईज सीपर (Personalize Sipper)

जीममध्ये जाणाऱ्या तुमच्या जोडीदाराकडे असायलाच हवी अशी पहिली गोष्ट म्हणजे त्याची पाण्याची बाटली. पण ती तेव्हाच खास होते. ज्यावेळी त्या सीपरवर तुमचे नाव असते. हल्ली अनेक बरेच ठिकाणी अशा सीपर बॉटल मिळतात. जे तुमच्या जोडीदाराला स्पेशल फ्रिल करुन द्यायचे काम करतात. जर तुमचा पार्टनर जीमला जाणारा असेल तर त्याच्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे.

कस्टमाईज वॉटर बॉटल (Customized Water Bottle With Temperature)

हल्ली आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेक जण गरम पाणी पितात. हे गरम पाणी आपले आपण कॅरी करण्यासाठी एक चांगली बॉटल हवी असते. तुम्ही गरम पाणी नेत असलेली बॉटल तितक्याच चांगल्या क्षमतेची असावी असे तुम्हाला वाटत असेल. तर तुम्ही जोडीदाराला कस्टमाईज वॉटल बॉटल घेऊन देऊ शकता.ही बॉटल खास असते कारण यामध्ये तुम्हाला पाण्याचे तापमान कळते. त्यामुळे ते पाणी पिताना चटका लागण्याची शक्यता कमी असते.

ADVERTISEMENT

प्रेग्नंट महिलांसाठी खास गिफ्ट आयडियाज – Gifts For Pregnant Women In Marathi

कस्टमाईज स्पोर्टस जॅकेट (Customize Sports Jackets)

काहीही म्हणा ज्या मुलांन किंवा पुरुषांना खेळाची आवड असते. अशांकडे तुम्हाला वेगवेगळ्या स्पोर्टसशी निगडीत असलेले झिपर जॅकेट अगदी हमखास दिसतात. जीन असो किंवा नसो त्यांच्या पर्सनॅलिटीचा एक भाग असते अशाप्रकारचे जॅकेट. अशा लोकांसाठी त्यांच्या नावाचे आणि त्यांच्या आवडत्या स्पोर्टसमनचे दिलेले जॅकेट कधीही आवडीचे असते. तुम्हाला जर अशा प्रकारचे कस्टमाईज जॅकेट हवे असेल तर तुम्ही त्यांची खरेदी करु शकता आणि तुमच्या जोडीदाराला गिफ्ट देऊ शकता.

स्पोर्टस शूज (Sports Shoes)

खेळ म्हटला की, आणखी एक गोष्ट आली ती म्हणजे स्पोर्टस शूज. मुलांसोबत खरेदीला गेल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवेल ती म्हणजे त्यांचे लक्ष हे कायम स्पोर्टस शूजवर असते. घरात कितीही शूज असले तर स्पोर्टस शूजची एखादी आणखी जोडी असावी असे वाटते. त्यामुळे तुम्ही जोडीदारासाठी एक उत्तम स्पोर्टस शूजची जोडी घ्या. तुम्हाला खूप महागडे शूज घ्यायचे नसतील तर तुम्ही डिकॅथलॉनचा हा पर्याय निवडू शकता. त्याठिकाणी तुम्हाला आवडीचे स्पोर्टस शूज मिळतील.

फिटनेट बँड (Sports Watch)

हल्ली स्पोर्टस बँडमध्ये असलेला गिफ्ट देण्यासारखा पर्याय म्हणजे फिटनेस बँड. अगदी 1,000रुपयांपासून तुम्हाला अगदी कित्येक हजारांपर्यंत मिळते. फिटनेस बँडमुळे दिवसभराच्या सगळ्या अॅक्टिव्हिटी नोट करण्यास मदत करते. फिटनेस बँड हे इतके फॅन्सी असतात. त्यामुळे तुम्हाला अगदी आरामात फिटनेस बँंड निवडता येतील. 

ADVERTISEMENT

पार्टी आवडणाऱ्या त्याच्यासाठी खास गिफ्ट्स (Anniversary Gift Ideas For Party Lover)

जर तुमच्या मित्राला पार्टी करायला आवडत असेल तर अशा पार्टीवाल्या जोडीदाराला तुम्ही अशा काही गोष्टी द्यायला हव्यात ज्याचा उपयोग त्यांना पार्टीसाठी अगदी आरामात होऊ शकेल. जाणून घेऊया  पार्टी आवडणाऱ्या जोडीदारासाठी असे गिफ्टसचे पर्याय निवडू शकता. 

बार किट (Black Quilted Leather Box Bar Kit)

आता पार्टी लव्हर म्हल्यावर एखादी पार्टी ही कोणत्याही मद्यपानाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पार्टीमध्ये असलेले मद्य खूप चांगल्या पद्धतीने सर्व्ह करता यावे यासाठी असलेला हा किट आहे. त्यामुळे नक्कीच तुमच्या पार्टीला चार चाँद लागू शकतात. त्यामुळे तुम्हाला हा पर्याय ट्राय करायला काहीच हरकत नाही.

लिकर डिस्पेन्सर (Personalized Liquor Dispenser)

मद्य पार्टीसाठी तुम्हाला आणखी एखादा पर्याय हवा असेल तर तुम्हाला हा पर्यायही निवडता येईल. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे आकार मिळतात. ज्याचा उपयोग कोणत्याही पार्टीला नक्कीच करता येईल. त्यामुळे तुम्हाला यामधील वेगळे आकार निवडता येतील आणि ते गिफ्ट म्हणून देता येईल.

ग्लासेस (Personalized Glasses)

पार्टी म्हटले की, ग्लास आलेच. ग्लास गिफ्ट म्हणून देणे हे तुम्हाला थोडे वेगळे वाटत असले तरी असे वाटण्याची काहीच गरज नाही. कारण हल्ली तुम्हाला पर्सनलाईज ग्लास मिळतात. ज्यांच्यावर तुम्हाला एखादा चांगला मेसेज किंवा नाव लिहता येते. असे ग्लास तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये करुन मिळतात. त्यामुळे तुम्ही असे ग्लासेस जोडीदाराला देऊ शकतात.

ADVERTISEMENT

बारबेक्यू सेट (Barbeque Set)

पिण्यासोबत तुमच्या जोडीदाराला खाण्याची आणि ते बनवून इतरांना खायला घालण्याची आवड असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराला बारबेक्यू सेट द्यायलाच हवा. कारण याचा उपयोग त्यांनाचा नाही तर इतर कोणालाही होऊ शकतो. तुम्ही असा सेट निवडा जो बाहेर घेऊन जाणेही फार सोपे ठरेल. पण पार्टी करणाऱ्यांसाठी हे एक उत्तम गिफ्ट नक्कीच असू शकते.

बारटेडिंग किट (Matte Black Bartending Kit)

जर तुम्हाला पार्टीमध्ये आणखी रंगत आणायची असेल तर तुम्ही बारटेडिंग किट द्यायला काहीच हरकत नाही. या किटमध्ये वेगवेगळे प्रकार मिळतात. त्यापैकी तुम्हाला साजेसा वाटतो असा एखादा किट निवडा आणि भेट म्हणून द्या. तुमच्या जोडीदाराला ही भेटवस्तू नक्कीच आवडेल याची आम्हाला खात्री आहे. 

आता त्याला लग्नाच्या वाढदिवसासाठी काय द्यायचे असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही अगदी आरामात हे काही गिफ्टस निवडू शकता.

30 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT