ADVERTISEMENT
home / भ्रमंती
सतत फिरण्याची आवड असेल तर वेकेशन वर असताना वापरा हे ‘ट्रॅव्हल अॅप्स’

सतत फिरण्याची आवड असेल तर वेकेशन वर असताना वापरा हे ‘ट्रॅव्हल अॅप्स’

तुम्ही जर सतत प्रवास करत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने जगण्याचा अर्थ कळू शकतो. जगभरात विविध ठिकाणी फिरायला जाणं, नवनवीन ठिकाणे पाहणं, जगभरातील संस्कृती, इतिहास जाणून घेणं यामुळे तुमच्या ज्ञानात नेहमीच भर पडत असते. मात्र असं सतत फिरताना तुम्हाला तुमच्या प्रवासासाठी व्यवस्थित प्लॅनिंग करावं लागतं. कारण नियोजनपूर्वक वेकेशन टूर प्लॅन केली तर तुमचा प्रवास नक्कीच सुखरूप होतो. प्रवास करण्यापूर्वी विमानाचं तिकीट बुक करणं, हॉटेलचं बुकिंग करणं, प्रवासाची संपूर्ण आयटरनरी तयार करणं हे खूप महत्त्वाचं असतं.प्रवासासाठी नकाशा हातात घेऊन फिरण्याचा काळ कधीच उलटून गेला आहे. मात्र आता असे काही अनेक ट्रॅव्हल अॅप आहेत ते जर तुमच्या मोबाईलवर असतील तर तुमचा प्रवास नक्कीच सुखकर होऊ शकतो.

प्रवास करताना हे ट्रॅव्हल अॅप तुम्हाला माहीत असायलाच हवे –

तुम्ही आयफोन वापरा अथवा अॅड्रॉईड असे शेकडो मोबाईल अॅप तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करता येतात. मात्र जर तुम्ही प्रवासवेडे असाल तर हे ट्रॅव्हल अॅप मोबाईलफोनमध्ये असायलाच हवे. 

एअरबीएनबी (Airbnb) –

जे लोक सतत प्रवास करतात त्यांच्यासाठी हे अगदी बेस्ट ट्रॅव्हल अॅप आहे. Airbnb मुळे तुम्हाला प्रवासात हॉटेल बुक करणं अगदी सोपं जाईल. एअरबीएनबी ही एक अशी ऑनलाईन बाजारपेठ आहे जिथे तुम्हाला प्रवासादरम्यान  लॉजिंग, होमस्टेजचं बुकिंग करून दिलं जातं. हे अॅप तुम्हाला आयफोन अथवा अॅंड्रॉईड दोन्ही फोनवर डाऊललोड करता येईल. 

ADVERTISEMENT

बुकिंग.कॉम (Booking.com) –

प्रवास करणाऱ्यांसाठी बुकिंग. कॉम प्रत्येकाकडे असणं फारच गरजेचं आहे. कारण यामुळे तुम्हाला एक चांगली डील नक्कीच मिळू शकते. शिवाय यासाठी  आधी प्रवास करणाऱ्या लोकांचे रिविव्हू वाचून तुम्ही तुमच्यासाठी योग्य निर्णय घेऊ शकता. हे अॅप देखील तुम्हाला आयफोन अथवा अॅंड्रॉईंड अशा दोन्ही फोनवर डाऊनलोड करता येतं. 

एक्स ई करंन्सी (XE Currency)

जेव्हा तुम्ही देशविदेशात प्रवास करता तेव्हा तुमच्याजवळ कंरन्सी बदलण्यासाठी साधन असणं फार महत्त्वाचं आहे. एक्स ई करंन्सी हे यासाठी एक उत्तम अॅप असू शकतं. कारण यावर तुम्हाला करंन्सी रेटचे लेटेस्ट अपडेट मिळतात. हे अॅप डाऊनलोड करण्याचे कोणतेही चार्जेस आकारले जात नाहीत. शिवाय तुम्ही ऑफलाईन असतानाही तुम्ही ते वापरू शकता. त्यामुळे परदेशात जाताना  हे अॅप अवश्य तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा. हे अॅपदेखील आयफोन आणि अॅंड्राईड अशा दोन्ही फोनमध्ये डाऊनलोड केलं जातं.

ADVERTISEMENT

गुगल मॅप (Google Maps) –

भारतात अथवा जगभरात कुठेही प्रवास करा गुगल मॅप हे आजकाल सर्वात महत्त्वाचं अॅप झालं आहे. ज्यामुळे ते तुमच्या मोबाईलमध्ये असायलाच हवं. गुगल मॅपमुळे तुम्हाला हव्या त्या ठिकाणी जाण्यासाठी किती वेळ लागेल, तिथे कसं  पोहचायचं अशा अनेक गोष्टी कळतात. त्यामुळे गुगल मॅप आयफोन आणि अॅंड्राईड अशा दोन्ही फोनसाठी एक गरजेचं अॅप नक्कीच आहे. 

ट्रिपआयटी (TripIt) –

कधी कधी प्रत्येक व्यक्तीला प्रवासाचं योग्य नियोजन करणं जमेलच असं मुळीच नाही. त्यामुळे जर अशा वेळी तुमच्या प्रवासाच्या नियोजनाची जबाबदारी तुम्ही  या अॅपवर नक्कीच सोपवू शकता. जर तुम्हाला एकाच ट्रिपमध्ये निरनिराळ्या ठिकाणी हॉटेल्स आणि विमानाचं तिकीट बुक करायचं असेल तर या अॅपचा चांगला फायदा होऊ शकतो. तुम्हाला फक्त तुमची बुकींग्स अॅपमध्ये टाकावी लागतात आणि हे अॅप तुमच्या ट्रिपचं प्लॅनिंग करतं. शिवाय आयफोन आणि अॅंड्राईड अशा दोन्ही फोनमध्ये तुम्ही  या अॅपचा वापर करू शकता. 

ADVERTISEMENT

उबर (Uber)

प्रत्येक प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये उबरचं अॅप असायला हवं. कारण त्यामुळे तुम्ही कुठेही फिरताना कार बुक करू शकता. यासाठी आताच तुमच्या मोबाईलमध्ये हे अॅप डाऊनलोड करा. हेही तुम्ही तुमच्या आयफोन अथवा अॅंड्राईड फोनमध्ये सहज डाऊनलोड करू शकता. 

ट्रिप अॅडवायझर (TripAdvisor)

ट्रिप अॅडवायझरमुळे तुम्ही कुठेही फिरताना हॉटेल्स अथवा रेस्टारंट बुक करणं सोपं जातं. शिवाय प्रवासाबाबत तुम्हाला काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरंही तुम्हाला मिळू शकतं.

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – इन्साग्राम

हे ही वाचा –

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

कमी बजेटमध्ये परदेशी जायचं आहे, मग ही डेस्टिनेशन आहेत परफेक्ट

तुमचा प्रवास झक्कास करतील हे खास कोट्स

दुबईची टूर प्लॅन करताय,मग या ठिकाणांना अवश्य भेट द्या

 

ADVERTISEMENT
23 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT