बॅग पॅक करुन मस्त बाहेर हिंडायला तुम्हाला आवडतं? तर आज आम्ही तुम्हाला थोडी- फार मदत करणार आहोत. बाहेर जाताना किंवा बाहेर फिरायला गेल्यावर एक वेगळीच एनर्जी आपल्यामध्ये असते. अशावेळी काही सकारात्मक विचार तुमच्या समोर कोणी मांडले तर त्या प्रवासाची आणखी मजा येते. कारण प्रत्येक प्रवास काहीतरी शिकवत असतो. अनेकांनी त्यांना बाहेर जाण्याचे प्लॅन केलेले असतात. पण काही कारणास्तव हे प्लॅन मागे पडतात. पण आता हे प्लॅन मागे पडू देऊ नका. कारण तुम्हाला तुमच्या आयुष्याची खरी किंमत ही प्रवासात कळते. शिवाय हाच प्रवास तुम्हाला अनेक अनुभव देतो. जे आयुष्याकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी तुम्हाला देतात. तुम्हालाही या प्रवासासाठी निघावे असे वाटत असेल आज आम्ही प्रवासात तुम्हाला अधिक आनंद आणि आत्मविश्वास देणारे असे काही कोट्स सांगणार आहोत जे तुम्ही तुमच्या सोशल मीडियासाठी हमखास वापरु शकता. हे असे कोट्स आहेत जे तुम्हाला तुमच्या प्रवासात आत्मविश्वास देतील. पण इतरांनाही नक्कीच प्रेरणा देतील. मग करायची सुरुवात
Table of Contents
प्रवासात प्रेरणा देतील असे कोट्स (Marathi Inspiring Quotes For Travel)
प्रत्येक प्रवास हा काहीतरी शिकवणारा असतो. या प्रवासात तुम्हाला कायम चार्ज ठेवणेही गरजेचे असते. काही चांगले विचार तुम्हाला या दिवसात नक्कीच चार्ज ठेवू शकतील. तुम्ही जरी थकलात तरी तुम्हाला या सगळ्यामुळे नक्कीच प्रेरणा मिळेल. आम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या प्रवासासाठी काही कोट्स एकत्र केले आहेत.l काही प्रवास हा एकट्याने होतो. तर काही प्रवास मित्रांच्या साथीने या प्रवासात तुम्हाला कायम तुमच्या उद्दिष्टांची आणि तुमच्या इच्छा आकाक्षांची आठवण करुन देतात काही कोट्स. त्यामुळे प्रवास अगदी काही दिवसांचा असो किंवा महिन्यांचा या काळात तुम्हाला अनेक अडचणी येणार.. यात शंका नाही.. पण चांगले अनुभवही येतील. अशा प्रत्येक क्षणांसाठी तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमी तयार असायला हवे. प्रत्येक प्रवास हा काहीना काही शिकवत असतो. यातूनच तुम्हाला आयुष्य जगण्याची नवी दिशा मिळत असते. प्रवासात असे अनुभव येतील की, त्यामुळे तुम्हाला खचल्यासारखे वाचले. आपण हे करु शकू की नाही असे वाटेल. पण खरं सांगायचं तर प्रत्येक जण शूर असतो. फरक इतकात आहे की, तुम्हाला तुमची ओळख तुम्ही नव्या ठिकाणी जात नाही तो पर्यंत कळत नाही. अशाच प्रवासासाठी निघण्याचा तुम्ही विचार करत असाल तर आमचे हे प्रेरणादायी कोट्स नक्की वापरा तुम्हाला यातून नक्की प्रेरणा मिळतील. याशिवाय यशाची व्याख्या सांगणारे सक्सेस कोट्स अशा प्रवासाच्या वेळीही तुमच्या उपयोगी ठरतात आम्ही तुमच्या याच प्रवासासाठी काही खास कोट्स आणि स्टेटस काढले आहेत. तुम्हाला कोणते स्टेटस किंवा कोट्स पटले तर ते तुम्ही नक्की तुमच्या सोशल मीडियासाठी वापरा.
शांत स्वभावाचा माणूस हा कधीच कमजोर नसतो. कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काही नाही. पण या पाण्याचे रुपांतर पुरात झाले. तर भले भले डोंगरही फोडून निघतात.
आयुष्यात माणसं दु:ख देऊ शकतात.. पण निसर्ग नाही.
मला माझ्या आयुष्यात काय हवं आहे… फक्त एक छानचा प्रवास आणि माझा वेळ
प्रवास हे तुम्हाला लागलेलं चांगल व्यसन आहे हे कायम लक्षात असून द्या.
नोकरी तुमचा खिसा भरते.. तर प्रवास तुमच्या आयुष्यात आठवणी
प्रवास तुमच्यासाठी अॅडव्हेंचर तेव्हाच घेऊन येईल जेव्हा तुम्ही स्वत:वर प्रेम करायला शिकाल.
माझे शिक्षण किती झाले हे मला विचारण्यापेक्षा मी किती प्रवास केला हे मला विचारा माझा बायोडेटा तुम्हाला कळेल.
तुम्ही कधीही बाहेर गेला नाहीत तर तुम्हाला जग काय ते कधीच कळणार नाही.
नीट शांतपणे आठवून पाहा तुम्हाला तुमचे मन ‘चला फिरायला’असेच सांगत असते.
प्रवास ही एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला नवीन काहीतरी शिकवतेही आणि तुम्हाला तुमची नव्याने ओळख घडवतेही
प्रवासात एकटे असलात म्हणून काय झालं… प्रवासातील आठवणी तुम्हाला कधीच एकटं सोडत नाही.
माणूस एकटा जन्माला येतो.. एकटाच जातो.. पण सोबत आठवणींचा भला मोठा पेटारा कायम स्वत:सोबत ठेवतो. प्रिय, टूर… मी कायम तुझ्याच विचारात असते.तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात अजून कोणीही नाही.
सगळेच धडे शाळेतून शिकायचे नसतात तर काही धडे निसर्गातून घेण्यासाठी घराबाहेर पडायचेही असते.
इतरांची वाट पाहण्यापेक्षा एकला चलो रे म्हणत तुम्ही तुमच्या प्रवासाला निघा.
एकट्याचा प्रवास बरा असतो कारण तो करताना फार विचार करावा लागत नाही.
आयुष्यात काही प्रवास एकट्यानेच करावे कारण भविष्यात ते खूप कामी येतात.
विचार कसला करायचा एकट्याने मस्त बाहेर पडायचे आणि आपले आयुष्य सुखात घालवायचे.
आयुष्यात कधीच कोणी एकटे नसते. कारण त्याच्या गाठीला त्याच्यासोबत त्याच्या प्रवासाच्या अनंत आठवणींचे गाठोडे असते.