आषाढी एकादशी म्हणजे डोळ्यासमोर येतो वारकऱ्यांचा प्रचंड जनसागर, टाळ मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष, ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांसह पायी चालणारी दिंडी, चंद्रभागेच्या काठावर दुमदुमणारा टाळ नाद, भोळ्या भाबड्या भक्तांची माऊलींच्या दर्शनासाठी असलेली आस आणि विठ्ठल माऊलीचे भक्ताला प्रेमपान्हा पाजणारे मनोहर रूप. भारतीय कालदर्शिकेनुसार वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असं म्हणतात. वर्षभरातील ही एक महत्त्वाची एकादशी असते. सध्या कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंग मुळे असं करणं शक्य नसलं करी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा (Ashadi Ekadashi Wishes In Marathi) शक्य आहे. यासाठीच आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा (Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha In Marathi) आणि आषाढी एकादशी खास कोट्स (Ashadi Ekadashi Quotes In Marathi) नक्की शेअर करा. त्यासोबतच कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ही शेअर करा.
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा (Ashadhi Ekadashi Wishes In Marathi)
आषाढी एकादशीला महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो भक्त या दिवशी पंढरपूरच्या दिंडीत सहभागी होतात. आषाढी एकादशीची माहिती सर्वांना असतेच. आषाढी एकादशीनिमित्त सर्व भक्तगणांना द्या या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा (Ashadi Ekadashi Wishes In Marathi).
- देव दिसे ठाई ठाई, भक्ततीन भक्तापाई ,सुखालाही आला या हो, आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर..आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- विठू माऊलीची कृपा आपणा सर्वांवर कायम अशी राहो… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी, हेचि माझी सर्व जोडी… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- जातां पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटतांचि, या सुखा उपमा नाही त्रिभुवनी, पाहिली शोधोनी अवघी तीर्थे… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- विठ्ठल विठ्ठल नाम तुझे ओठी, पाऊले चालतील वाट हरिची.. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- देव माझा विठू सावळा… सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- तुमचिये दासीचा दास करूनि ठेवा, आर्शिवाद द्यावा हाचि मज…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- ह्रदय बंदिखाना केला, आंत विठ्ठल कोंडीला…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- सदा माझे डोळे जडो तुझे मुर्ती, रखमाईच्या पती सोयरिया…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- विठ्ठल विठ्ठल
नाम तुझे ओठी
पाऊले चालती
वाट हरीची…
नाद पंढरीचा
साऱ्या जगा मधी…
चला जाऊ पंढरी
आज आषाढी एकादशी…
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा! - हेची दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा - तुझा रे आधार मला। तूच रे पाठीराखा।।
तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा।
घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।।
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा - सोहळा जमला आषाढी वारीचा
सण आला पंढरीचा,
मेळा जमला भक्तगणांचा,
ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा
आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा - पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
यंदा आषाढी एकादशीची सुरूवात करा पहाटेची भक्तीगीते ऐकून
आषाढी एकादशीनिमित्त सुविचार (Ashadhi Ekadashi Quotes In Marathi)
आषाढी एकादशीला पंढरपूरच्या चंद्रभागेत स्नान करून विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले जाते. महाराष्ट्रात आजवर अनेक संत होऊन गेले. यासाठीच आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी मनात घोळवत ठेवा संताचे हे अभंग आणि सुविचार (Ashadi Ekadashi Quotes In Marathi).
- विश्वी विसावला तो विठ्ठल – सदगुरू श्री वामनराव पै
- हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा – संत ज्ञानेश्वर
- पंढरीचा राजा उभा भक्तराजा, उभारूनि भुजा वाट पाहे – संत नामदेव
- अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पाडुरंग – संत चोखामेळा
- एक एक श्वास घेई दर्शनाचा ध्यास,चंदनाचा टिळा माथी नाम तुझे ओठी… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर ह्रदयी माझ्या
आणिक काही इच्छा नाही आता, गोड तुझे नाम पाडुंरंगा – संत तुकाराम - अवघा रंग एक झाला, रंगि रंगला श्रीरंग – संत सोयराबाई
- ताल वाजे, मुदूंग वाजे, वाजे हरिची वीणा, माऊली निघाली पंढपपुरी मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- सुखासाठी करिसी तळमळ, तरि तू पंढरीसी जाय एकवेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मी दुःख विसरसी – संत नामदेव
- रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बहुत सुकृताची जोडी, म्हणूनी विठ्ठल आवडी, सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर – संत ज्ञानेश्वर
- नाम गाऊ, नाम घेऊ, नाम विठोबासी वाहू..आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- येई गा तु मायबापा पंढरीच्या राया, तुजविण क्षिण क्षिण झाली काया…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- हेचि व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास – संत तुकाराम
- भगवान विष्णूची कृपा तुम्हाआम्हावर होवो
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा - विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरिओम विठ्ठला
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा - जय जय पांडुरंग हरी जय पांडुरंग हरी
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा - पुंडलिक वरदे हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेवतेकर्म
पंढरीनाथ महाराज की जय
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा - बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा - अगा वैकुंठीच्या राया
अगा विठ्ठल सखया
आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा - अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा - हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती
नये माझ्या चित्ती नामा म्हणे
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा - आनंदी आनंद भरला
अवघा दाही दिशां कोंदला
संत सज्जनांचा मेळा
भक्तीरंगाने रंगला
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा - विठ्ठल नामाचा गजर
पंढरी वैकुंठ भूवर
आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा
यासोबतच आषाढी एकादशीला मानसिक समाधान मिळवण्यासाठी वाचा हे आध्यात्मिक सुविचार (Spiritual Quotes In Marathi)
आषाढी एकादशीसाठी स्टेटस (Ashadhi Ekadashi Status In Marathi)
कोरोनामुळे मागच्या वर्षीपासून पंढरपूरची वारी सगळेच मिस करत आहेत. यंदा जरी पंढरपूरात भक्तांची मांदियाळी जमा नाही झाली तरी इन्स्टाग्राम, फेसबूकवर आषाढी एकादशीला हे खास स्टेटस (Ashadi Ekadashi Status In Marathi) ठेवून तुम्ही आषाढी एकादशी साजरी करू शकता.
- विठ्ठल माझा ध्यास, विठ्ठल माझा श्वास, विठ्ठल माझा भास, विठ्ठल माझा आभास… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- मुख दर्शन व्हावे आता, तू सकळ जगाचा दाता, घे कुशीत या माऊली, तुझ्या चरणी ठेवतो माथा…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- चला पंढरीसी जाऊ, रखमादेवीवरा पाहू, डोळे निवतील कान, मना तेथेचि समाधान… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- अमृताहूनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा का ना बा घे…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- आषाढी कार्तिकी भक्तजण येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती….आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- विठोबासी शरण जावे, निजनिष्ठे नाम गावे…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- आता कोठें धावे मन, तुझे चरण देखलिया, भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, तुम्ही घ्यारे डोळे सुख, पाहा विठोबाचे मुख…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- चाले हे शरीर कोणाचिये सत्ते, कोण बोलविते हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचें भजन चुको नको..आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- यई वो विठ्ठले भक्तजन वत्सले… करूणा कल्लोळे पाडुंरंगे…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- लक्ष्मी वल्लभा… दीनानाथा पद्मनाभा… सुख वसे तुझे पायीं, मज ठेवी तेचि पायी…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
आषाढी एकादशीचे मेसेज (Ashadhi Ekadashi Messages In Marathi)
आषाढी एकादशीच्या आनंद आणि उत्साहात भर टाकण्यासाठी आषाढी एकादशीनिमित्त सर्वांना व्हॉटसअप मेसेज, शुभेच्छा (Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha)संदेश पाठवण्याची सध्या पद्धत आहे. तेव्हा आषाढी एकादशीचे मेसेज (Ashadhi Ekadashi Messages In Marathi) पाठवून करा आजचा दिवस साजरा.
- हित ते करावे देवाचे चिंतन, करूनिया मन शुद्ध भावे…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहतां लोचन सुखावले…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- ऐसी चंद्रभागा, ऐसा भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे….आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी….आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आणिकाचे काम नाही येथे…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- किती तुझी वाट पाहू रे विठ्ठला, कंठ हा सोकला आळविता…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- गुणा आला ईटेवरी, पीतांबरधारी सुंदर तो,डोळे कानन त्याच्या ठायीं, मन पायीं राहो हें…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- गुरू माता गुरू पिता, गुरू आमुची कुळदेवता, थोर पडतां साकडे, गुरू रक्षी मागें पुढे…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- जाऊ देवांचिया गावां, देव देईल विसांवा…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनी संतसदनी राहिला…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- विठ्ठल आवडी प्रेमभावो, विठ्ठल नामाचा रे टाहो…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
- धन्य माझी भक्ति धन्य माझा भाव, ह्रदयी पंढरिराव राहतसे… आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
यासोबत जाणून घ्या आषाढी एकादशीनंतर लगेच येणाऱ्या गुरूपौर्णिमेचे महत्त्व आणि शुभेच्छा
आषाढी एकादशीचे अभंग (Ashadhi Ekadashi Abhang In Marathi)
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा सोबतच तुम्ही सोशल मीडियावर खास विठूमाऊलींचे अभंग ही शेअर करू शकता. पाहा खास आषाढी एकादशीचे अभंग (Ashadhi Ekadashi Abhang In Marathi).
1. चला मंगळ वेढे पाहू …
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ….|
वाड्याच्या पडक्या भिंती,
दामाची महती कथिती…
ती कथा मुखाने गाऊ…
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ….
भर रस्त्यावरती साधी,
ती चोखोबाची समाधी…
आदराने सुमने वाहू…
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ….
कान्होपात्रेच्या गुरूस्थानी,
आनंद मुनी महाज्ञानी…
ते ज्ञान या ह्रदयी ठेऊ…
नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ…
2. विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
पहाताच होती दंग आज सर्व संत
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
3. ह्रदय बंदी खाना केला
आत विट्ठल कोंडिला
शब्दी केलि जड़ा जोड़ी
विट्ठल पायी घातली वेडी
धरिला पंढरीचा चोर..
4. भाव तिथ देव ही संताची वाणी
आचारा वाचून पाहिला कोणी?
शब्दांच्या बोलानं शांति नाही मनी ।
देव बाजारचा.
5. तुला साद आली तुझ्या लेकरांची
लंकापुरी आज भारावली
वसा वारीचा घेतला पावलांनी
आम्हा वाळवंटी तुझी सावली
गळाभेट घेण्या भिमेची निघाली
तुझ्या नामघोषात इंद्रायणी
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
6. एकादशीस अन्नपान । जे नर करिती भोजन । श्वानविष्ठेसमान । अधम जन ते एक ॥१॥
ऎका व्रताचें महिमान । नेमें आचरती जन । गाती ऎकती हरिकिर्तन । ते समान विष्णुसीं ॥२॥
अशुद्ध विटाळशीचे खळ । विडा भक्षितां तांबुल । सांपडे सबळ । काळाहातीं न सुटे ॥३॥
सेज बाज विलास भोग । करिती कामिनीचा संग । तया जोडे क्षयरोग । जन्मव्याधी बळिवंत ॥४॥
आपण नवजे हरिकीर्तना । आणिकां वारी जातां कोणा । त्याच्या पापें जाणा । ठेंगणा तो महोमेरु ॥५॥
तया दंडी यमदुत । झालेस तयाचे अंकित । तुका म्हणे व्रत । एकाद्शी चुकलिया ॥६॥
7. पंधरा दिवसां एक एकादशी । कां रे न करिसी व्रतसार ॥१॥
काय तुझा जीव जातो एका दिसें । फ़राळाच्या मिसें धनी घेसी ॥२॥
स्वहित कारण मानवेल जन । हरिकथ पूजन वैष्णवांचे ॥३॥
थोडे तुज घरीं होती उजगरे । देउळासी कां रे मरसी जातां ॥४॥
तुका म्हणे कां रे सकुमार झालासी । काय जाब देसी यमदुतां ॥५॥
8. आनंदले वैष्णव गर्जती नामें । चौदाही भुवनें भरली परब्रम्हे ॥१॥
नरहरि नरहरि नारायणा । सनकसनंदन मुनिजनवंदना ॥२॥
गातां वातां वाचता प्रेमें उल्हासें । चराचरींचे दोष नाशियले अनायासें ॥३॥
हरि मनीं हरि चित्तीं हरि अंकु शरीरीं । तयातें देखोनि हरि चार्ही बाह्या पसरीं ॥४॥
अंध्रिरेणु ज्याचा उद्धरिते पतिता । प्राकृतवाणी केवि वानुं हरिंभक्ता ॥५॥
तीर्थें पावन जिहीं धर्म केला धडौती । कैवल्यकल्पद्रुम ते त्रिजगतीं ॥६॥
मत्स्यकूर्मादिक ज्याचे महिमेसी आले । धन्य वैष्णव तेज रविशशिसीं पाहाले॥७॥
बापरखुमादेविवरा पढयंती जिया तनु । तया संतचरणीं स्थिर हो कां मनु ॥८॥
9. पूर्वजन्मीं सुकृतें थोर केलीं । तीं मज आजि फ़ळासि आलीं ॥१॥
परमानंदु आजि मानसीं । भेटी झाली या संतासी ॥२॥
मायबाप बंधु सखे सोयरे । यांतें भेटावया मन न धरे ॥ ३॥
एकएका तीर्थहूनी आगळें । तयामाजी परब्रह्म सांवळे ॥४॥
निर्धनासी धनलाभु झाला । जैसा अचेतनीं प्राण प्रगटला ॥५॥
वत्स बिघडलिया धेनु भेटली । जैसी कुरंगिणी पाडसा मिनली ॥६॥
हें पियुषा परतें गोड वाटत । पंढरीयाचे भक्त भेटत ॥७॥
बापरखुमादेविवरु विठ्ठले । संत भेटतां भव दु:ख फ़िटलें ॥८॥
10. उंच पताका झळकती । टाळ मृदंग वाजंती । आनंदे प्रेमें गर्जती । भद्र जाती विठ्ठलाचे ॥१॥
आले हरिचे विनट । वीर विठ्ठलाचे सुभट । भेणें जाहले दिप्पट । पळती थाट दोषांचे ॥२॥
तुळसीमाळा शोभती कंठीं । गोपीचंदनाच्या उटी । सहस्त्र विघ्नें लक्ष कोटी ।बारा वाटा पळताती ॥३॥
सतत कृष्णमूर्ति सांवळी । खेळे ह्रुदयकमळीं । शांति क्षमा तया जवळीं । जीवें भावें अनुसरल्या ॥४॥
सहस्त्र नामाचें हतियार । शंखचक्राचे शृंगार । अति बळ वैराग्याचें थोर । केला मार षडूवर्गा ॥५॥
ऎसे एकांग वीर । विठ्ठल रायाचे डिंगर । बापरखुमादेविवर । तिहीं निर्धारीं जोडीला ॥६॥