आयुष्यमान खुरानाला… आयुष्यमान भव! असा दिलेला आशीर्वाद सध्या फळाला येताना दिसत आहे. कारण आयुष्यमान जे कोणते चित्रपट करतोय ते अगदी हिट होत आहेत. आता आणखी एक चित्रपट घेऊन आयुष्यमानची टीम लवकरच येणार आहे. या चित्रपटाचा एक टीझर सध्या प्रेक्षकांसाठी रिलीज करण्यात आला आहे. ‘बाला’ असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटातील आयुष्यमानचा लुक एकदम खास आहे बरं का!
हॉट बिकिनी बॉडीसाठी वाणी कपूरने घेतली मेहनत
आयुष्यमानची नवी भूमिका
आतापर्यंत आयुष्यमानला आपण वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिले आहे. अगदी चॉकलेट बॉय इमेज पासून ते नुकत्याच आलेल्या आर्टिकल 15 या चित्रपटात त्याने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती आणि आता तो या चित्रपटात एका टक्कल पडलेल्या माणसाची भूमिका साकारणार आहे. त्याचा हलकासा अंदाज टीझर पाहून आलाच आहे. त्यामुळे आता त्याची ही भूमिका म्हणजे फुल ऑन कॉमेडी असणार हे मात्र नक्की! या चित्रपटाची स्टोरी लाईन काय या विषयी फार काही कळालेलं नाही. पण अजून तर फक्त टीझर आला आहे. ट्रेलर अभी बाकी है मेरे दोस्त.. त्यामुळे थोडावेळ थांबा म्हणजे कळेलच चित्रपट नेमका काय असणार आहे.
पाहा टीझर
शाहरुखची मारतोय स्टाईल
आयुष्यमान खुराना यामध्ये शाहरुखची स्टाईल मारताना दिसतोय. तो मस्त एका बाईकवर असून तो शाहरुखचं ‘कोई ना कोई चाहिए.. प्यार करनेवाला’ या गाण्यावर मस्त ताल धरताना दिसत आहे. पण अचानक त्याची टोपी उडून जाते. मग काय त्याचा बाल्ड अवतार दिसतो आणि अचानक बॅकराऊंडला असणारं गाणं बदलतं आणि होत… ‘रहने दो छोडो जाने दो यार.. हम ना करेंगे प्यार’… या दोन्ही मध्ये त्याचं जे परफेक्शन आहे त्यामुळेच हसू आल्यावाचून राहात नाही. येत्या 22 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
आमीर खानची मुलगी इरा खान झाली विचित्र ड्रेसमुळे ट्रोल, फोटो व्हायरल
दोन अभिनेत्री एकाच चित्रपटात
आयुष्यमान खुराना इंडस्ट्रीत V TV असल्यापासून आहे. आता ते चॅनल नसले तरी त्याचं करिअर मात्र सुस्साट आहे. आयुष्यमानने ‘विकी डोनर’ या चित्रपटापासून सुरुवात केली. या चित्रपटात त्याने यामी गौतमसोबत काम केले होते. हा चित्रपटही एक वेगळा विषय होता. त्यानंतर भूमी पेडणेकर सोबत आलेला ‘दम लगा के’ हा चित्रपटही कॉमेडी पण एक चांगला मेसेज देणारा होता. ‘अंधाधुन’ या चित्रपटाबाबत तर काहीच सांगायला नको. या चित्रपटाने आयुष्यमानला खऱ्या अर्थाने ओळख दिली असे म्हणायला हवे. सस्पेन्स, थ्रीलर अशा प्रकारातील हा चित्रपट तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर तुम्ही खूप काही नक्कीच मिस केले आहे. या चित्रपटात तबू खलनायकाच्या भूमिकेत दिसली. राधिका आपटेचीही वेगळी भूमिका यामध्ये पाहायला मिळाली.
अजूनही चित्रपट आहेत रांगेत
आयुष्यमानकडे अजूनही चित्रपट येणार आहेत. म्हणजे त्याची एक यादीच तयार आहे. ‘बाला’ सोबत त्याचा ‘ड्रिम गर्ल’, ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’, ‘गुलाबो सिताबो’ हे चित्रपटही येणार आहेत.
आता हा चित्रपट प्रेक्षकांना नेमका कसा वाटतो त्यासाठी ट्रेलरची वाट पाहावी लागेल.
देसी गर्ल प्रियांका ‘युनिसेफ’ची ambassador नको, पाकिस्तानची मागणी