योग (Yoga) हा निरोगी आरोग्यासाठी लाभदायक असतो. आसनांचे फायदे जाणून घेत हल्ली अनेक जण नित्यनेमाने योगा करतात. देशातच नाही तर परदेशातही योगाची क्रेझ वाढली आहे. योगमध्ये अनेक आसने येतात. प्रतिकारशक्ती वाढवणारी योगासनं तुम्हाला निरोगी ठेवतात. काही आसनं सोपी असतात तर काही आसनं ही तशी अवघड असतात. या अवघड आसनांमध्ये बकासनाचा समावेश होतो. बक म्हणजे कावळा ( Crow Pose) हे आसन पाहिल्यानंतर ते अवघड आहे असे तुम्हाला वाटेल आणि आसन करण्याची इच्छाच होणार नाही. हातांवर संपूर्ण शरीराचा भार देऊन हे आसन करावे लागते. पण बकासनाचे फायदे अनेक आहेत. हे आसन करण्याची योग्य पद्धत समजली तर अगदी कोणालाही हे आसन करता येते. आज आम्ही बकासन माहिती मराठी (Bakasana Information In Marathi) जाणून घेणार आहोत. चला करुया सुरुवात
बकासन करण्याची योग्य पद्धत – How To Do Bakasana In Marathi
बकासनाची माहिती मराठी (Bakasana Information In Marathi) आणि बकासनाचे फायदे जाणून घेतल्यानंतर बकासन कसे शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करावे ते जाणून घेऊया.
- आसन करण्यासाठी आधी थोडा वॉर्मअप करुन घ्या.
- मॅट अंथरुन हाताचे पंजे खांद्याच्या समांतर ठेवा.
- पाय दुमडून गुडघे दंडावर ठेवा. आता आपल्या सगळ्या शरीराचा भार उचला.
- पाय हवेत फोटोत दाखवल्याप्रमाणे ठेवा.
- सुरुवातीला तुम्हाला तुमचा भार पुढे गेल्यासारखे वाटेल किंवा तुम्ही घडपडाल पण सरावाने हे आसन तुम्हाला नक्कीच येईल. असे करताना तुमचे हात कोपऱ्यातून दुमडणार नाही याची काळजी घ्या.
बकासनाचे फायदे – Benefits Of Bakasana In Marathi
बकासनाचे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्हाला हे आसन करणे किती गरजेचे आहे ते कळेल. हे फायदे संपूर्ण शरीरासाठी फारच लाभदायी असतात. योग करण्यासाठी प्रेरणा हवी असेल तर योग कोट्स मराठी देखील पाठवा.
दंड संतुलित राखते बकासन (Arm Balance )
आसनाचा सगळा भार हा तुमच्या दंडांवर असतो. दंड मोठे आहेत म्हणजे ते मजबूत आहेत असे होत नाही. त्याा दंडामध्ये तेवढी ताकद देखील असावी लागते. अनेकांना दंड डिस्लोकेट होण्याचा त्रास होतो. तो चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्यामुळेही होतो. बकासनामध्ये दंड संतुलित करण्यास मदत मिळते.
दंडाला मजबूत करते बकासन (Strength Arm Balance)
वर सांगितल्याप्रमाणे दंडाला मजबूत करण्याचे काम बकासन करते. तुमच्या दंडावर सगळा भार पेलताना तुम्हाला लागणार नाही या भीतीने आपण शरीराचा भार पेलत असतो. तुम्हाला दंड मजबूत हवे असतील तर तुम्ही बकासन करायला हवे.
पाठीचा कणा चांगला ठेवते बकासन (Toned Spine )
अनेक योगासनांमुळे पाठीचा कणा मजबूत आणि चांगला होण्यासाठी मदत मिळते. पाठीचा कणा ताठ असेल तर तुम्ही व्यवस्थित चालू शकता. तुम्हाला आरोग्याच्या किंवा शरीराशी निगडीत अशा फारसा समस्या जाणवत नाहीत. बकासनामध्ये पाठ ही सरळ असते. पाठीचा कणा हा ताठ असतो. तुम्हाला निरोगी कणा हवा असेल तर तुम्ही बकासन करायला हवे.
खांदे आणि हात मजबूत करते बकासन (Strengthen Shoulder And Arms)
मजबूत खांदे आणि हातांसाठी बकासन (bakasana information in marathi) हे खूपच उत्तम असे आसन आहे. खांदे आणि हात मजबूत होण्यासाठी हे आसन खूपच चांगले ठरते. ज्या व्यक्ती जीमला जातात ते खास खांदे मजबूत करण्याचा व्यायाम करतात. पण या आसनामुळे तुमचे खांदे मजबूत होण्यास मदत मिळते.
आत्मविश्वास वाढवते बकासन (Build Confidence)
आत्मविश्वास वाढवण्यासाठी बकासन हे फारच फायद्याचे असे आसन आहे. कधी कधी आपण काय करु शकतो यावर आपल्याला विश्वास नसतो. हे आसन करताना संपूर्ण शरीराचा भार हातावर घेणे म्हणजे मोठे कसबच असते. तुम्ही संपूर्ण शरीराचा भार ज्यावेळी अगदी सहजगत्या घेता त्यावेळी तुमचा विश्वास हा वाढतो. आपल्या शरीराबद्दल असलेला आत्मविश्वास वाढला की, आपणच सगळ्या कामांमध्ये आपण तितक्याच आत्मविश्वासाने सामोरे जातो.
नितंबाला टोन्ड करते बकासन (Good For Glutes)
बकासन केल्यानंतर हातावर जितका ताण येतो तितकाच ताण तुमच्या नितंबावर येतो. कारण पाय हवेत उचलल्यानंतर नितंबाना येणारा ताण हा चांगला असतो. नितंब आणि मागच्या मांड्याचा भाग हा स्ट्रेच होतो. ज्यांना मांड्या आणि नितंबाचा आकार चांगला हवा असेल तर तुम्ही बकासन करायला हवे.
पाठीसाठी चांगले बकासन (Good For Upper Back)
हातावर सगळा भार उचचल्यानंतर पाठीला चांगला ताण येतो. ज्यांना पाठीचा उत्तम व्यायाम हवा असेल त्यांनी बकासन करायला हवे. बकासनामुळे पाठीच्या स्नायू चांगले ताणले जातात. त्यामुळे पाठीसाठी तुम्ही बकासन करायला हवे. सर्वांगासाठी हा व्यायाम खूपच चांगला आहे.
मनगट करतात मजबूत (Make Wrist Stronger)
हातावर भार उचलताना मनगट ही मजबूत हवीत. मनगटाची हाड चांगली मजबूत असतील तर तुम्हाला बकासन करताना कोणत्याही अडचणी येत नाहीत. इतर कोणत्याही आसनासाठी किंवा व्यायामासाठी मनगटं मजबूत असतील तर अडचणी येत नाहीत.
शरीराचे संतुलन राखते बकासन (Improve Sense Of Balance)
आपल्याला दोन पाय आहेत. पण त्या पायांवर उभे राहणे म्हणजे शरीराचे संतुलन राखणे हे देखील तितकेच गरजेचे असते. आपल्या प्रत्येक अवयवाला आपले संतुलन राखता यायला हवे. यासाठीच हे आसन एकदम उत्तम आणि परफेक्ट आहे.
लक्ष केंद्रित करण्यास मदत करते बकासन (Help To Concentrate)
मनाची चंचलता कमी करण्याचे काम बकासन करते. जराही लक्ष इकडे तिकडे झाले तर या आसनात तुम्ही पडू शकता. त्यामुळे हे आसन करताना तुम्हाला कमालीची एकाग्रता लागते. आसनात आपण जसे जातो. तेव्हा संपूर्ण शरीर एकाग्र होते. ही एकाग्रता तुम्हाला इतर कामांसाठी फारच फायदेशीर ठरते. ज्यांची चंचल अशी वृत्ती असेल तर तुम्ही हे आसन करायलाच हवे.
बकासन करताना घ्यावयाची काळजी
बकासन करताना तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे देखील गरजेचे असते. तुम्ही काय काळजी घ्यावी ते जाणून घेऊया.
- बकासन करताना जर तुम्हाला संपूर्ण भार उचलता येत नसेल तर तुम्ही थोडा वेळ घ्या. एकाएकी हे आसन करायला जाऊ नका.
- ज्यांना संधिवात किंवा अन्य सांधेदुखी असेल तर त्यांनी योग्य प्रशिक्षिकासमोरच हे आसन करावे.
- हे आसन येऊ लागले तरी देखील ते करताना तुम्ही जास्त वेळ हे आसन करु नका.
- बकासन करायला कठीण आहे ते करण्यासाठी शरीराला थोडासा व्यायाम येणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे आधी व्यायाम करुन शरीर लवचिक करा आणि हे आसन करा.
- बकासन करण्यासोबतच तुम्ही अन्य आसनं देखील करा.
बकासनाचे व्हिडिओज
बकासन नेमके कसे करायला हवे हे नीट कळावे यासाठी शेअर करत आहोत. बकासनाचे व्हिडिओज. जे तुम्हाला आसन करण्यासाठी मदत करेल.
FAQ’S – बकासन माहिती मराठी | Bakasana Information In Marathi
प्रश्न. बकासन हे आसन कोणी करायला हवे?
उत्तर. बकासन करण्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागते. अगदी पहिल्याच प्रयत्नात हे आसन येईल असे अजिबात नाही. थोड्या सरावाने हे आसन येते. एकदा का तुम्हाला हे आसन आले की, तुम्ही ते नित्यनियमाने करायला काही हरकत नाही. हे आसन जास्त वेळासाठी धरुन चालत नाही. कमीत कमी 30 आणि जास्तीत जास्त 60 सेकंदासाठी करावा.
प्रश्न. बकासनानंतर काय करायला हवे ?
उत्तर. बकासन केल्यानंतर जर तुम्हाला हाताला थोडासा ताण जाणवत असेल तर तुम्ही थोडे स्ट्रेचिंग करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे तुमच्या हाताच्या नसांना जर ताण आला असेल तर तो कमी होण्यास मदत मिळेल.
प्रश्न. बकासन करणे सोपे असते का?
उत्तर. बकासन हे आसन कठीण आसनांपैकी एक आहे.कारण या आसनामध्ये बळ, एकाग्रता सगळेच लागते. याचा मेळ घालणे थोडे कठीण असते. त्यामुळे हे आसन सोपे नाही. पण सरावाने हे आसन तुम्हाला करता येऊ शकते.
बकासनाचे फायदे (Bakasana Information In Marathi )जाणून घेत तुम्हीही ही नक्की हे आसन करायला हवे.