बनारसी साडीची (Banarasi Saree) क्रेझ आणि फॅशन ही नेहमीच महिलांमध्ये राहाते. कितीही बदल फॅशनमध्ये झाले, कितीही उन्हाळा असो थंडी असो बनारसी साडीला नक्कीच तोड नाही. पण बनारसी साडीवर तेच तेच टिपिकल ब्लाऊज न वापरता तुम्ही स्टायलिश ब्लाऊजचा वापर नक्कीच करू शकता. कोणतीही साडी अधिक सुंदर दिसण्यासाठी ब्लाऊजची त्यामध्ये नक्कीच महत्त्वाची भूमिका असते हे विसरून चालणार नाही. एखादा स्टायलिश ब्लाऊज अगदी साध्या साडीचीही शोभा वाढवतो. आपण फॅशन ट्रेंडच्या पद्धतीने ब्लाऊज डिझाईन्स वापरत असतो. याआधी बनारसी साडीवर साडीला जोडलेला ब्लाऊज वापरण्यात येत असे. पण आता महिला आता वेगवेगळ्या बुटीकमधून स्टायलिश आणि डिझाईनर ब्लाऊजचा वापर करतात. आजकाल महिला ब्लाऊजच्या गळ्यापासून ते ब्लाऊजच्या स्लीव्ह्जपर्यंत वेगळे डिझाईन्स तयार करून घेतात. तुम्हीदेखील बनारसी साडी नेसणार असाल तर त्यावर कोणत्या डिझाईन्सचे वेगळे स्टायलिश ब्लाऊज तुम्ही घालू शकता याबाबत माहिती तुम्हाला या लेखातून आम्ही देत आहोत.
ऑफ शोल्डर ब्लाऊज (Off Shoulder Blouse)
तुम्ही बनारसी साडीसह ऑफ शोल्डर ब्लाऊज घालू शकता. कारण आजकाल ऑफ शोल्डरची चलती आहे. आता अधिकाधिक महिलांना शोल्डर ब्लाऊजच आवडतो. पण ऑफ शोल्डर अधिक उठावदार आणि आकर्षक दिसतो. कारण या ब्लाऊज डिझाईनसह बनारसी साडीला अधिक क्लासी आणि रॉयल लुक मिळतो. तसंच ऑफ शोल्डर ब्लाऊजसह तुम्ही गळ्यात चोकर अथवा अधिक स्टायलिश एक्सेसरीज घालू शकता. हा लुक महिलांना अधिक उठावदार दिसतो.
कॉलर ब्लाऊज (Collar Blouse)
काही महिलांना आपली पाठ दाखवायला आवडत नाही. अशा महिलांसाठी उत्तम डिझाईन म्हणजे कॉलर ब्लाऊज. बनारसी साडीवर कॉलर ब्लाऊजचे डिझाईन चांगले दिसते. यासाठी गळाबंद कॉलर, ओपन कॉलर, डिझाईनर कॉलर इत्यादी वेगवेगळे डिझाईन्स तुम्ही शिऊन घेऊ शकता. तुम्ही तुमच्या बनारसी साडीच्या डिझाईननुसार कॉलरचे डिझाईन तयार करून घेऊ शकता. तसंच तुम्ही ब्लाऊज शिवण्यासाठी बनारसी साडीसह तुम्ही मल्टीकलर कपड्याचीही निवड करू शकता किंवा तुम्ही बाजारातून तयार ब्लाऊजही घेऊ शकता. तुमच्या मापाचा योग्य ब्लाऊज तुम्हाला बाजारातूनही मिळू शकतो.
दोरीचे बॅकलेस ब्लाऊज (knotted backless blouse)
तुम्हाला अधिक मॉर्डन पद्धतीचा आणि स्टायलिश ब्लाऊज हवा असेल तर नॉटेड बॅकलेस ब्लाऊज हा पर्याय अप्रतिम ठरतो. बॅकलेस ब्लाऊज तुम्हाला बनारसी साडीवर अधिक आकर्षक दिसतो. तुम्ही बनारसी साडीसह दोरी असणारे अर्थात नॉटेड बॅकलेस ब्लाऊज घालू शकता. तुम्हाला तुमच्या साडीप्रमाणे योग्य डिझाईन निवडून ब्लाऊज शिऊन घ्यायचा आहे. तुम्ही या दोरीसह लटकनदेखील लाऊन घेऊ शकता. यामुळे ब्लाऊजची शोभा अधिक वाढते. तुम्ही कोणत्याही लग्नात अथवा कार्यक्रमामध्ये अशा डिझाईन्सचा ब्लाऊज बनारसी साडीसह घालू शकता.
बोट नेक ब्लाऊज (Boat Neck Blouse)
चेहऱ्याच्या आकाराप्रमाणे तुम्हाला तुमची नेकलाईन ठरवावी लागते हे खरं आहे. पण तुम्ही साधे ब्लाऊज घालून कंटाळला असाल तर तुम्ही बोट नेक ब्लाऊज डिझाईन निवडू शकता. बोटच्या आकाराचा याचा गळा असल्यामुळे याला बोट नेक डिझाईन म्हटले जाते. हे डिझाईन साधे आहे पण बनारसी साडीसह हे तुम्हाला अधिक स्टायलिश लुक मिळवून देते. तुम्ही बोट नेक गळ्यासह स्टायलिश आणि डिझाईनर स्लीव्ह्जदेखील शिऊ शकता. तसंच मागून तुम्ही डीप नेक गळा ठेवल्यास, याला अधिक उठाव येतो. लग्नाच्या सीझनमध्ये रॉयल लुक देण्यासाठी उत्तम डिझाईन आहे.
ओपन चैन ब्लाऊज (Open Chain Blouse)
आजकाल ओपन चैन ब्लाऊज खूपच ट्रेंडिंग आहे. तुम्हाला बनारसी साड्या नेसण्याची आवड असेल तर तुम्ही त्यासह हे डिझाईन नक्की वापरू शकता. हा ब्लाऊज केवळ तुम्हाला वेगळा लुक देत नाही तर तुम्हाला अधिक स्टायलिश बनवतो. पण या ब्लाऊजसाठी कडक कपडे अधिक चांगले दिसतात. कॉटन अथवा अन्य कपड्यांनी हा ब्लाऊज शिवल्यास, लवकर खराब होतो. त्यामुळे बनारसी कपड्यांचेच हे ब्लाऊज तुम्ही शिऊन घ्या. अधिक उठावदार दिसण्यास मदत मिळते.
या ब्लाऊजशिवाय तुम्ही साधा बोट नेक विथ बॅक व्ही नेक (Boat Neck with Back V neck), शोल्डर कट ब्लाऊज (Shoulder cut blouse), स्लिव्हलेस ब्लाऊज (Sleeveless Blouse) याचीही बनारसी साड्यांवर स्टायलिंग करू शकता. दिसा अधिक सुंदर!