ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
cold soulder blouse designs

लग्नासाठी ट्रेंडमध्ये आहेत ऑफ शोल्डर ब्लाऊज, अशी करा स्टाईल

सध्या लग्नाचा सीझन चालू आहे. साधारण तुळशीच्या लग्नानंतर लग्नाचे मुहूर्त चालू होतात आणि मे महिन्यापर्यंत आपल्याकडे लग्न चालूच असतात. लग्नामध्ये साडी नेसणे हे अनेकांना आवडते. लग्नात नववधूही वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांना प्राधान्य देतात. पण नुसती साडी चांगली असून चालत नाही. तर त्यासह एक चांगला डिझाईनर अथवा चांगला ब्लाऊजही असणं गरजेचे आहे. कारण ब्लाऊज हा साडीचा पूर्ण लुक बदलायला मदत करतो. आजकाल अनेक ब्लाऊज डिझाईन्स हे ट्रेंडमध्ये आहेत. त्यात रिसेप्शनसाठी तुम्ही ऑफ शोल्डर ब्लाऊज डिझाईन वापरू शकता. तुम्हालाही लग्नामध्ये ऑफ शोल्डर ब्लाऊज घालायचा असेल तर तुम्ही कशाप्रकारचे डिझाईन्स वापरू शकता याबाबत अधिक माहिती. 

राऊंड नेक कोल्ड शोल्डर ब्लाऊज (Round Neck Cold Shoulder Blouse)

Round neck cold shoulder blouse – Instagram

तुम्हाला या लग्नाच्या सीझनसाठी जर कोल्ड शोल्डर ब्लाऊज हवा असेल तर तुम्ही आलियाच्या या ब्लाऊज डिझाईनकडून प्रेरणा घेऊ शकता. अत्यंत हेव्ही एम्बेलिश्ड बेज साडीसह तुम्ही हाय नेक कोल्ड शोल्डर ब्लाऊज घातला आहे. तुम्हीदेखील अत्यंत साधा शोल्डर ब्लाऊज डिझाईन कॉपी करून वापरू शकता आणि फॅशनेबल लुक मिळवू शकता. 
फॅशन टीप – तुमची साडी मोती रंगाची असेल अथवा त्यावर कोणतेही मिरर वर्क करण्यात आले असेल तर तुम्ही नेहमी साधा कोल्ड शोल्डर ब्लाऊजच वापरा. यामुळे तुमचा साधा लुक अधिक एलिगंट दिसेल आणि तुम्ही आकर्षक दिसाल. 

अधिक वाचा – ब्लाऊज शिवण्याआधी लक्षात ठेवा या 5 गोष्टी

स्टँडिंग हाय नेक कोल्ड शोल्डर ब्लाऊज (Standing High Neck Cold Shoulder Blouse)

Standing High Neck Cold Shoulder Blouse – Instagram

बॉलीवूड दिवा समण्यात येणाऱ्या सोनम कपूरची फॅशन नेहमीच उजवी असते. कोल्ड शोल्डर ब्लाऊज सोनम बऱ्याचदा घालताना दिसून येते. केवळ साड्याच नाही तर ब्लाऊजचे डिझाईन्सदेखील सोनमकडे उत्तम असतात. तुम्हाला या लग्नाच्या सीझनसाठी कोल्ड शोल्डर ब्लाऊज घालायचा असेल तर तुम्ही सोनमच्या या ब्लाऊज डिझाईनवरून प्रेरणा घेऊ शकता. सोनमने साडीसह स्टँडिंग हाय नेक कोल्ड शोल्डर ब्लाऊज घातला आहे. जो तिच्या साडीच्या संपूर्ण लुकला अधिक आकर्षक करत आहे. याशिवाय हा हाय नेक कोल्ड ब्लाऊज पारंपरिक आणि कंटेम्प्ररी लुकचे परफेक्ट कॉम्बिनेशनही वाटत आहे. 
फॅशन टीप – तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये रंगसंगती बदलूही शकता. काँन्ट्रास्ट रंगात याचा वापर करू शकता. एम्ब्रोयडरी साडीसह तुम्ही हेव्ही कोल्ड शोल्डर ब्लाऊजचाही वापर करू शकता. साध्या साडीसह असे ब्लाऊज अधिक सुंदर दिसतात. 

ADVERTISEMENT

फ्रिल डिटेल्स कोल्ड शोल्डर ब्लाऊज (Freel Details Cold Shoulder Blouse)

साध्या मलमलच्या साडीवर अथवा गोल्डन रंगाच्या साडीवर कोल्ड शोल्डर ब्लाऊज अत्यंत सुंदर दिसतो. यामध्ये फ्रिल डिटेल्स कोल्ड शोल्डर ब्लाऊज डिझाईन असेल तर अधिक उत्तम. सध्या रफल्ड स्लीव्ह्ज फॅशन ट्रेंडिंगमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचे डिझाईनर ब्लाऊज शिऊन घेऊ शकता. 
फॅशन टिप – स्लीव्ह्जवर फ्रील डिटेल्सवाले कोल्ड शोल्डर ब्लाऊज हे साध्या साडीवर खूपच सुंदर दिसतात आणि तुमच्या साडीला नवा लुकही देतात. तुम्ही जर प्लेन बॉर्डरच साडी नेसणार असाल तर तुम्ही यासह फ्रील कोल्ड शोल्डर ब्लाऊज नक्की ट्राय करू शकता. 

अधिक वाचा – Kathachya Sadiche Blouse Designs | काठाच्या साडीचे विविध ब्लाऊज डिझाईन

फुल स्लीव्ह्ज कोल्ड शोल्डर ब्लाऊज (Full Sleeves Cold Shoulder Blouse)

फ्लोरल प्रिंट साडीला वेगळा टच द्यायचा असेल तर तुम्ही फुल स्लीव्ह्ज कोल्ड शोल्डर ब्लाऊजचा वापर करू शकता. फ्लोरल प्रिंट साडीसह साधा संपूर्ण हात भरलेला कोल्ड शोल्डर ब्लाऊज सध्या ट्रेंडमध्ये आहे. हा लुक पूर्ण करण्यासाठी यासाह हिऱ्यांचा नाजूकसा नेकलेस आणि लहान कानातले घालायला हवे. तर मेकअप मिनिमल ठेवा. 
फॅशन टीप – कोणत्याही प्रिंटेड साडीसह तुम्ही लांब हाताचा कोल्ड शोल्डर ब्लाऊज घालू शकता. यामुळे तुम्हाला थंडी वाजणार नाही. मात्र एका गोष्टीची काळजी घ्या की ब्लाऊज प्लेन ठेऊ नका. ब्लाऊजवर कोणत्या ना कोणत्या प्रकारचे डिझाईन असू द्या. यामुळे साडीचा लुक अधिक चांगला दिसून येईल. 

अधिक वाचा – खण साड्यांसाठी खास ब्लाऊज डिझाईन्स | Khun Saree Blouse Designs In Marathi

ADVERTISEMENT

लेस कोल्ड शोल्डर ब्लाऊज (Lace Cold Shoulder Blouse)

लेसवाल्या कोल्ड शोल्डर ब्लाऊजमुळे साडीला अधिक शोभा येते. कोणत्याही रंगाच्या साडीसह तुम्ही अशा डिझाईनचा ब्लाऊज घातला तर तुम्ही अधिक आकर्षक दिसता. तुम्हाला लेसची आवड असेल तर तुमच्यासाठी हा योग्य पर्याय आहे. 
फॅशन टीप – पॅटर्नवाला नेट अथवा चँटली लेस कोल्ड शोल्डर ब्लाऊजसह तुम्ही प्लेन साडी नेसलात तर अधिक उठावदार दिसते. साधी साडी असेल तर एलिगंट लुक देण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

20 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT