ADVERTISEMENT
home / भ्रमंती
मुंबईत असा साजरा करा पावसाळा

मुंबईत असा साजरा करा पावसाळा

पावसाळ्याला सध्या जोरदार सुरुवात झाली आहे. सध्या मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. संपूर्ण जगभरात मुंबई धो धो कोसळणाऱ्या पावसासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईत एवढा पाऊस पडतो की कधी कधी त्यामुळे जनजीवन विस्कळीत होतं. पण अस्सल मुंबईकर पावसाने कितीही कहर केला तरी पावसाचं तितक्याच आनंदात स्वागत करतो. सहाजिकच पावसाचा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल तर मुंबईसारखं दुसरं शहर शोधूनही सापडणार नाही. मुंबईकरांचं आणि पावसाचं अतूट नातं आहे, जे नेहमीच नव्याने पाहायला मिळतं. पाऊस पडू लागला की मुंबईतील खास ठिकाणी पर्यटक गर्दी करू लागतात. मुंबईला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलेला असल्यामुळे समुद्रकिनारी पाऊस एन्जॉय करणं रोमांचक असतं. जर तुम्ही मुंबईकर नसाल आणि पहिल्यांदाच पावसाळ्यात मुंबईत आला असाल तर तुम्ही हा काळ एन्जॉय करायलाच हवाच. यासाठी आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत मुंबईत कसा साजरा करावा पावसाळा… तसंच भेट द्या मुंबईतील या 12 रूफ टॉप रेस्टॉरंट्सनां (Best Rooftop Restaurant In Mumbai In Marathi), मुंबईत पावभाजीसाठी बेस्ट ठिकाणे (Best Pav Bhaji In Mumbai In Marathi) मुंबईतील बेस्ट साऊथ इंडियन रेस्टॉरंट – Best South Indian Restaurants In Mumbai, मुंबईतील नाईट लाईफ अनुभवायचं आहे, मग या ठिकाणांना जरूर भेट द्या -Places To Visit In Mumbai, मुंबईची शान वडापाव खायचाय, तर ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या-Best Vada Pav In Mumbai, मुंबईतील फॅशन स्ट्रीट्स (Fashion Streets In Mumbai)

मरिन ड्राईव्हला जाणं आहे मस्ट

पावसाळ्यात तुम्ही मुंबईत आला आहात आणि मरिन ड्राईव्हला नाही गेला तर काहीच मजा नाही. पावसाळ्यात मुंबईतील प्रत्येक व्यक्ती एकदा तरी मरिन ड्राईव्हवर भटकायला जातेच. त्यामुळे तुम्ही देखील क्वीन नेकलेस नावाने प्रसिद्ध असलेल्या मरिन ड्राईव्हवर यंदा पावसाळ्यात जायलाच हवं. मरिन ड्राईव्हवर फिरताना मनसोक्त भिजणं आणि समुद्राच्या उंच उंच निर्माण होणाऱ्या लाटा पाहणं यात एक वेगळीच मौज आहे. सोबत जोडीदार असेल तर अमिताभ आणि मौसमी चटर्जीचं ‘रिमझिम गिरे सावन गाणं’ आणखी बहार आणेल.

जुहू चौपाटीचं आणि पर्यटकांचं खास नातं

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जुहू चौपाटीवरही जाण्यात एक वेगळीच मजा आहे. समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा आणि वरून अंगावर कोसळणाऱ्या थंडगार पावसाच्या सरी यांचं मिश्रण एक अजब रसायन आहे. मात्र भरतीच्या वेळी अशा ठिकाणी जाणं टाळा कारण जर तुम्ही नवीन असाल तर समुद्र किनारी भटकणं थोडं धोकादायक ठरू शकतं. पण इथे गेल्यावर पावसात भिजल्यानंतर मस्त भेलपुरी, गरमागरम वडापाव, भजी, भुट्टा असे पदार्थ खाण्याने तुम्हाला पावसाचा खरा आनंद मिळेल. 

गेट वे ऑफ इंडिया आणि  फेरी राइड

गेट वे ऑफ इंडियाला गेल्यावर फेरी राइड अनेकांनी केली असेल. पण रिमझिम पावसात अशी राइड करायचा एक वेगळाच आनंद आहे. पावसामुळे निर्माण होणाऱ्या लाटा आणि वरून पाऊस झेलत या राइडचा आनंद घेता येतो. सहाजिकच पावसाचा अंदाज आणि वातावरण यावर सारं काही अवलंबून आहे. अति पावसात सुरक्षेसाठी या राइड बंद ठेवण्यात येतात.

ADVERTISEMENT

हाजी अलीवरील रोमांचक अनुभव

मुंबईत फिरत असताना हाजी अली तुम्हाला नक्कीच खुणावू शकतं. या ठिकाणी हाजी अलीला जाण्यासाठी एक पुलाचा रस्ता आहे. ज्याच्या दोन्ही बाजूंनी समुद्र आहे. भरतीच्या वेळी हा रस्ता पाण्याखाली जातो. त्यामुळे ओहोटीच्या वेळीच तुम्ही आत जाऊ शकता. समुद्राच्या पाण्यात या रस्त्यावरून हाजी अलीला जाणं आध्यात्मिक आनंद देणारं आणि अंगावर रोमांच उभं करणारं असू शकतं. 

मुंबई दर्शन तर करायलाच हवं

मुंबईत आल्यावर मुंबई पाहण्यासाठी तुम्ही मुंबई दर्शन टूर्स बूक करू शकता. टॅक्सी अथवा बसमध्ये बसून मुंबई पाहण्याची एक वेगळीच मौज आहे. गेट वे ऑफ इंडियापासून थेट जुहू चौपाटीपर्यंत तुम्हाला फिरवण्यात येतं. मात्र पावसाळ्यात मुंबईचं ट्राफिकदेखील जॅम असतं. त्यामुळे अशा वेळी जवळ खाण्या-पिण्यासाठी भरपूर सामान ठेवा ज्यामुळे तुम्हाला मनसोक्त मुंबई फिरल्याचा आनंद घेता येईल. अशा पावसात भिजत गरमागरम चहा अथवा कॉफी पिण्यातपण एक वेगळीच मजा आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

06 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT