ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
मुंबईत आवर्जून भेट द्यायला हवी अशा फॅशन स्ट्रीट्स (Fashion Streets In Mumbai)

मुंबईत आवर्जून भेट द्यायला हवी अशा फॅशन स्ट्रीट्स (Fashion Streets In Mumbai)

मुंबई म्हटलं की स्वप्ननगरी. मुंबईत येऊन काहीतरी करण्याची सगळ्यांची स्वप्नं असतात. काही जण इथे येऊन यशस्वी होतात तर काही जणांच्या पदरी निराशा येते. पण मुंबईत मुंबई बघण्यासाठी येणारी लोकसंख्यादेखील जास्त आहे. फिरता फिरता इथे विंडो शॉपिंग करण्यासाठीही अनेक ठिकाणं आहेत. जिथे तुम्हाला मनसोक्त आपल्याला जे हवं ते बघत फिरता येतं आणि मस्तपैकी शॉपिंग करून या ठिकाणी मनसोक्त खाता येतं. मुंबईमधील फॅशन स्ट्रीट्सबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या फॅशन स्ट्रीट्सवर तुम्ही मनसोक्त फिरू शकता. इथून तुम्ही काही विकत घ्यायला हवं असंही नाही. शिवाय या फॅशन स्ट्रीट्सवरून वस्तू बघत फिरायला येणारी मजा काही औरच! या ठिकाणी तुम्हाला स्वस्तात मस्त खरेदी तर करता येतेच. शिवाय या प्रत्येक ठिकाणी एक विशिष्ट खाऊ गल्लीही असते जिथे तुम्ही खाण्याचा आनंदही लुटू शकता. मुंबईला फिरायला येणं हे अनेकांचं स्वप्नं असतं. जे पहिल्यांदा मुंबईत येणार आहेत आणि ज्यांनी मुंबईत राहूनही या ठिकाणांना अजून भेट दिलेली नाही त्यांच्यासाठी ही खास माहिती. 

मुंबईमधील 12 फॅशन स्ट्रीट्स

मुंबईमध्ये अनेक ठिकाणं फिरण्यासारखी आहेत. पण काही ठिकाणं अशी आहेत जिथे तुम्ही गेला नाहीत तर तुम्हाला मुंबई पाहिली असं वाटणार नाही. तुम्हाला फॅशन आणि शॉपिंगची आवड असेल तर या ठिकाणांना तुम्ही नक्कीच भेट द्यायला हवी. 

वाचा – मुंबईत अभिनय वर्ग

1. फॅशन स्ट्रीट मुंबई (Fashion Street Mumbai)

ADVERTISEMENT

Instagram

रस्त्यावर 150 शॉपिंगची दुकानं असलेलं फॅशन स्ट्रीट हे सर्वात मोठं शॉपिंग डेस्टिनेशन आहे. कोणत्याही मॉलपेक्षा अधिक कपड्यांची रेलचेल तुम्हाला  या ठिकाणी दिसून येते. अगदी स्वस्तात मस्त असे डिझाईनर कपडेही तुम्हाला फॅशन स्ट्रीटला मिळतात. फक्त हे कपडे तपासण्याची आणि बार्गेन करण्याची तुमच्याकडे योग्य क्षमता हवी. कारण इथले दुकानदार तुम्हाला चढ्या भावाने वस्तू विकायचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे योग्य भावामध्ये ती वस्तू विकत घेण्याचं कसब तुम्हाला स्ट्रीट शॉपिंगमध्ये लावावं लागतं.

काय करता येतं – विंडो शॉपिंग, फिरणं 

कसं पोहचता येतं – चर्चगेट स्टेशनपासून चालतही जाता येतं किंवा शेअर टॅक्सी त्याचप्रमाणे तुम्हाला सीएसएमटी स्टेशनवरूनही चालत जाता येतं अथवा शेअर टॅक्सी मिळते. 

ADVERTISEMENT

आकर्षण – वेस्टर्न कपडे आणि मुलांसाठी शूज 

खाण्याचं अप्रतिम ठिकाण – 

  • राजू सँडविच स्टॉल – व्हेज चीज रोलसाठी प्रसिद्ध – एच. आर. कॉलेजसमोर, चर्चगेट
  • खाऊ गल्ली – बटाटा भजीसाठी प्रसिद्ध – खेतान भवन, चर्चगेट
  • के. रुस्तम – वेफर आईस्क्रिम – हॉटेल अॅम्बेसेडर समोर, चर्चगेट
  • आराम वडा पाव सेंटर – सीएसटीएम रेल्वे स्टेशन समोर, सीएसटी
  • कॅनन पावभाजी – बीएमसी कार्यालयासमोर, सीएसटी

तसेच कोलाबा मार्केट वाचा

2. क्रॉफर्ड मार्केट (Crowford Market)

ADVERTISEMENT

Instagram

क्रॉफर्ड मार्केट हा मुंबईतील सर्वात व्यस्त आणि माणसांच्या गर्दीने फुललेला एरिया आहे. या ठिकाणी अनेक दुकानं आहेत. विविध वस्तूंची खरेदी तुम्हाला या बाजारातून करता येते. रस्त्यावर अनेक वस्तूंची अनेक दुकानं तुम्हाला इथे दिसतात. शिवाय वाजवी दरामध्ये तुम्हाला इथून वस्तू विकत घेता येतात. होलसेलच्या भावामध्ये इथे वस्तू मिळतात. खरं तर जास्त खरेदी करायची असेल तर मुंबईतील माणूस याच मार्केटमध्ये जाऊन खरेदी करण्याला प्राधान्य देतात. स्वस्त, मस्त आणि टिकाऊ अशी या ठिकाणच्या वस्तूंची ओळख आहे. 

काय करता येतं – विंडो शॉपिंग, फिरणं 

कसं पोहचता येतं – सीएसएमटी स्टेशनवरूनही चालत जाता येतं अथवा शेअर टॅक्सी मिळते. 

ADVERTISEMENT

आकर्षण – सर्व प्रकारचे कपडे, बॅग्ज, खेळणी, घरगुती वापराच्या वस्तू, कॉस्मेटिक्स  

खाण्याचं अप्रतिम ठिकाण – 

  • बादशाह – पावभाजी आणि फालुदासाठी प्रसिद्ध – क्रॉफर्ड मार्केटच्या बाहेर
  • साऊथ इंडियन स्टॉल – हैदराबादी चिकन दम बिर्यानी – सेंट जॉर्ज रोड, सीएसटी
  • सीपी ऑफिस भेळवाला – पंजाबी भेळ – सी. पी. ऑफिसच्या बाहेर, क्रॉफर्ड मार्केट
  • पिकेट रोड खाऊ गल्ली – मसाला डोसा – पिकेट रोड कॉर्नर
  • श्री साई फास्ट फूड – कॅनन पावभाजीजवळ, सीएसटी

तसेच मुंबईतील संग्रहालये वाचा

3. कुलाबा कॉझवे (Colaba Causway)

ADVERTISEMENT

Instagram

ब्रिटिशांच्या काळापासून असलेल्या इमारतींमध्ये कुलाबाच्या रस्त्यावर असणारे हे मार्केट म्हणजे मुंबईची शान आहे. परवण्याजोग्या कपड्यांपासून ते फॅशनेबल बुटिक्सपर्यंत तुम्हाला सर्व काही एका ठिकाणी मिळतं. इथेदेखील तुम्हाला व्यवस्थित वस्तूंची किंमत लावून बार्गेन करता यायला हवं. रिगल सिनेमापासून ही कुलाबा कॉझवेची गल्ली सुरु होते ती थेट अगदी पुढपर्यंत चालू राहते. इथूनच तुम्ही शॉपिंग करून गेटवेला जाऊन फिरण्याचा आनंदही घेऊ शकता. 

काय करता येतं – विंडो शॉपिंग, रिगल सिनेमामध्ये मुव्ही, गेट वे ऑफ इंडियाला फेरी, ताजमहाल हॉटेल

कसं पोहचता येतं – सीएसएमटी आणि चर्चगेट स्टेशनवरून चालत जाता येतं अथवा शेअर टॅक्सी मिळते. 

ADVERTISEMENT

आकर्षण – सर्व प्रकारचे कपडे, बॅग्ज, फॅशनेबल ज्वेलरी, कॉस्मेटिक्स  

खाण्याचं अप्रतिम ठिकाण – 

  • चिंतन सँडविच कॉर्नर – फजिता पानिनी – हाजी अहमद आझमी रोड, ग्रँड बिल्डिंगजवळ, कुलाबा
  • कॅमी वेफर हाऊस – वाटी ढोकळा – ऑक्सफोर्ड हाऊस, कुलाबा मार्केटजवळ
  • मद्रास कॅफे – फ्राईड इडली – अझीझ मेन्शन, अपोलो बंदर, कुलाबा
  • ओहमेझिंग फास्ट फूड – तंदुरी सँडविच – वेंगुर्लेकर हाऊस, एसबीएस रोड, कुलाबा
  • रामनाथ – दहीवडा – मुनीरा लॉज, ग्रँड बाजारच्या समोर

मुंबईतील प्रसिद्ध पथपाणीही वाचा

4. भुलेश्वर मार्केट (Bhuleshwar Market)

ADVERTISEMENT

Instagram

दक्षिण मुंबईतील हे सर्वात प्रसिद्ध मार्केट असून लांबून लोक इथे खरेदी करण्यासाठी येतात. अगदी साडीपिनपासून ते इमिटेशन ज्वेलरी आणि कपड्यांसाठी हे मार्केट प्रसिद्ध आहे. सर्वात जास्त खरेदी इथून इमिटेशन ज्वेलरीची होते. लग्नासाठी लागणारी सर्व प्रकारची ज्वेलरी इथे मिळते. त्याशिवाय लग्नासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टींचे स्टॉल्सही इथे आहेत. या बाजारामध्ये मेंदीदेखील हातावर तिथल्या तिथे डिझाईन निवडून काढून देण्यात येते. शिवाय लहान मुलांच्या कपड्यांसाठीही हे मार्केट प्रसिद्ध आहे. हा बाजार साधारण सकाळी अकरापासून ते रात्री 9.30 पर्यंत चालू असतो. 

काय करता येतं – विंडो शॉपिंग, फिरणं

कसं पोहचता येतं – चर्नी रोड स्टेशनला उतरून चालत जाता येतं अथवा इथून शेअर टॅक्सीचीही सोय आहे

ADVERTISEMENT

आकर्षण – सर्व प्रकारचे कपडे, बॅग्ज, फॅशनेबल ज्वेलरी, कॉस्मेटिक्स  

खाण्याचं अप्रतिम ठिकाण – 

  • खाऊ गल्ली – यादव पाणी पुरी – भुलेश्वर खाऊ गल्ली
  • काळबादेवी खाऊ गल्ली – खिचिया पापड – काळबादेवी रोड
  • शर्मा पावभाजी – पावभाजी आणि तवा पुलाव – काळबादेवी नाका
  • सुरती रेस्टॉरंट – पनीर टिक्का मसाला आणि रोटी – काळबादेवी रोड
  • कॉर्नर सँडविच – ग्रील सँडविच – पांजरापोळ गल्लीच्या बाहेर

शॉर्ट हाइट गर्ल्ससाठी फॅशन टिप्सही वाचा

5. धारावी मार्केट (Dharavi Market)

ADVERTISEMENT

Instagram

धारावी हे मुंबईतील सर्वात मोठं स्ट्रीट मार्केट आहे. इथे अनेक पर्यटकदेखील भेट द्यायला येतात. या ठिकाणी लेदर जॅकेट्स आणि बॅग्जना अधिक मागणी असून दिवाळीमध्ये मातीच्या पणत्या आणि इतर गोष्टींसाठी हे मार्केट जास्त प्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला अनेक लेदरच्या गोष्टींची दुकानंच सापडतील. 

काय करता येतं – विंडो शॉपिंग, फिरणं

कसं पोहचता येतं – सायन स्टेशनला उतरून चालत जाता येतं अथवा इथून शेअर टॅक्सीचीही सोय आहे

ADVERTISEMENT

आकर्षण – लेदर बॅग्ज, जॅकेट्स 

खाण्याचं अप्रतिम ठिकाण – 

  • गुरुकृपा – सामोसा – सायन स्टेशनपासून पाच मिनिटांच्या अंतरावर
  • हनुमान रेस्टॉरंट – पावभाजी – सायन सर्कल
  • मॉडर्न – नॉनव्हेज जेवण – सायन टॅक्सी स्टँडजवळ 
  • वृंदावन – मसाला डोसा – सायन स्टेशनजवळ
  • गुरूकपा सँडविच कॉर्नर – चिली चीज सँडविच – सायन सर्कल

उंच मुलींसाठी फॅशन टिप्स देखील वाचा

6. वांद्रा लिंकिंग रोड (Bandra Linking Raod)

ADVERTISEMENT

Instagram

वांद्रा स्टेशनपासून काही अंतरावर असणारं हे स्ट्रीट मार्केट मुख्यत्वे कॉलेजमध्ये जाणाऱ्या आणि वेस्टर्न कपड्यांची आवड असणाऱ्यांसाठी हे मार्केट आहे. इथे तुम्हाला अगदी 100 रूपयांपासून कपडे मिळतात. याचं वैशिष्ट्य हे आहे की, हे कपडे जरी कमी किमतीचे असले तरीही व्यवस्थित टिकतात. शिवाय तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे इथे कपडे निवडता येतात. इथे तुम्हाला कपड्यांची विविधता बघायला मिळते. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी कपडे विकत घेताना रस्त्यावर कितीही वेळ घालवत शॉपिंग करू शकता. तुम्हाला एखाद्या गोष्टीची किंमत जास्त वाटत असेल तर तुम्हाला बार्गेनही करता येतं. 

काय करता येतं – विंडो शॉपिंग, फिरणं

कसं पोहचता येतं – वांद्रा स्टेशनला उतरून रिक्षाची सोय आहे

ADVERTISEMENT

आकर्षण – कलडे, बॅग्ज, शूज आणि ज्वेलरी

खाण्याचं अप्रतिम ठिकाण – 

  • खाऊ गल्ली – पाणी पुरी – मॅकडोनाल्ड समोरच्या गल्लीत
  • मॅकडोनाल्ड – बर्गर – लिंकिंग रोड
  • सँडविच – ग्रील सँडविच – नॅशनल कॉलेजच्या बाहेर
  • सेफ कॅटरिंग – चिकन सीख कबाब –  143 ए, एन्ड ऑफ बाजार रोड
  • स्ट्रीट साईड सँडविच कॉर्नर – मसाला चीज सँडविच – एल शोरूम समोर, लिंकिंग रोड 

7. हिल रोड (Hill Road)

Instagram

ADVERTISEMENT

हिल मार्केट हे वांद्रा स्टेशनजवळ असून लहान लहान दुकांनानी वेढलेलं आहे. इथे प्रत्येक प्रकारची फॅशन तुम्हाला मिळते. तसंच तुम्हाला हव्या असणाऱ्या स्टायलिश ज्वेलरीही इथे अगदी वाजवी दरात मिळतात. फक्त इथे खरेदी करत असताना तुम्हाला कपडे नीट बघून घ्यावे लागतात कारण या मार्केटमध्ये असणारे कपडे हे स्वस्त जरी असले तरीही काही अंशी या मार्केटमध्ये डिफेक्टिव्ह पीस असतात. त्यामुळे तुम्ही इथे शॉपिंग करणार असलात तर सकाळ अथवा दुपारच्या वेळेतच जा जेणेकरून तुम्हाला कपडे नीट दिसतील. .

काय करता येतं – विंडो शॉपिंग, फिरणं, तलावावर जाऊन बसणं

कसं पोहचता येतं – वांद्रा स्टेशनला उतरून रिक्षाची सोय आहे अथवा चालतही जाता येतं. 

आकर्षण – कपडे, बॅग्ज, शूज आणि ज्वेलरी

ADVERTISEMENT

खाण्याचं अप्रतिम ठिकाण – 

  • फूड कॉर्नर – चिकन मसाला रोल – हिल रोड, बालाजी रेस्टॉरंटसमोर
  • गुड्डी आईस्क्रिम – मलई स्टिक कुल्फी – सोना पार्टी शॉप समोर, हिल रोड
  • गुप्ता भेळ अँड पाणीपुरी सेंटर – शेव पुरी – मेव्ह्ज केक अँड बेक्ससमोर, हिल रोड
  • अण्णाची फूड प्लाझा – आलू मेथी पराठा  –  क्राफ्टबारसमोर, चेतना कॉलेजजवळ, कलानगर
  • करूणा महिला मंडळ लंच होम – दालखिचडी – वांद्रा कोर्टाजवळ, वांद्रा

मुंबई मधील सर्वोत्तम रूफटॉप रेस्टॉरन्ट

8. हिंदमाता मार्केट (Hindmata Market)

Instagram

ADVERTISEMENT

मुंबईतील साड्यांसाठी सर्वात प्रसिद्ध असणारं असं हे स्ट्रीट मार्केट. दादर पूर्वेला असणारं हिंदमाता मार्केट हे दुकानं असली तरीही स्ट्रीट मार्केट म्हणूनच प्रसिद्ध आहे. विविध प्रकारच्या साड्यांची व्हरायटी इथे तुम्हाला मिळते. मुख्यत्वे भारतीय कपडे अर्थात इंडियन वेअरसाठी हे मार्केट प्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला वेगवेगळे पंजाबी ड्रेसचे मटेरियलदेखील मिळतात. होलसेल मार्केट म्हणून या मार्केटचं नेहमीच नाव पुढे घेण्यात येतं. इथेही तुम्हाला बार्गेन करता येतं. 

काय करता येतं – विंडो शॉपिंग, फिरणं

कसं पोहचता येतं – दादर स्टेशनला उतरून पूर्वेला जायचं. तुम्हाला इथून चालतच जावं लागतं. 

आकर्षण – कपडे, इंडियन वेअर कपडे

ADVERTISEMENT

खाण्याचं अप्रतिम ठिकाण – 

  • सुप्रभा प्युअर व्हेज – छोले पुरी – दादर पूर्व, रेल्वे स्टेशनजवळ
  • कैलास लस्सी – विविध प्रकारच्या लस्सी – दादर पूर्व स्टेशनच्या बाहेर
  • कॅफे मणी – स्प्रिंग डोसा – नक्षत्र मॉलच्या खाली, दादर पश्चिम
  • मेरवान्स – व्हेज पफ  –  गोखले रोड, दादर पश्चिम
  • जिप्सी कॉर्नर – आंबाडाळ आणि इतर मराठी पदार्थ – शिवाजी पार्कजवळ, दादर

9. चोर बाजार (Chor Bazzar)

Instagram

या बाजाराच्या नावातच याचा अर्थ दडला आहे. चोरलेल्या वस्तूंची इथे विक्री होते. हे अतिशय जुनं मार्केट असून स्ट्रीट मार्केटच आहे. ग्रँंट रोड स्टेशन आणि सँडहर्स्ट स्टेशनच्या मध्ये हे मार्केट आहे. आता या बाजारामध्ये फर्स्ट कॉपी उत्पादनंही मिळतात. इथे तुम्हाला खूप विचारपूर्वक बार्गेन करून वस्तू घ्याव्या लागतात. तसंच या ठिकाणी प्रत्येक शुक्रवारी फ्रायडे नाईट इलेक्ट्रॉनिक मार्केट 4 ते 7 या वेळेमध्ये भरतं. शिवाय अँटीक उत्पादनं तुम्हाला हवी असतील तर या मार्केटशिवाय तुम्हाला चांगला पर्याय उपलब्ध नाही. 

ADVERTISEMENT

काय करता येतं – विंडो शॉपिंग

कसं पोहचता येतं – ग्रँट रोड अथवा सँडहर्स्ट या दोन्ही रेल्वे स्टेशनवरून तुम्हाला टॅक्सी करून जाणं हा पर्याय आहे

आकर्षण – अँटिक उत्पादनं, घड्याळ

खाण्याचं अप्रतिम ठिकाण – 

ADVERTISEMENT
  • न्यू ग्रँड रेस्टॉरंट – चिकन लेग तंदूरी – इब्राहिम मेन्शन, ग्रँट रोड
  • पेजस प्युअर व्हेज – व्हेज पिझ्झा – लक्ष्मी निवास, ग्रँट रोड
  • स्ट्रीट साईड स्टॉल – वडा पाव – पेजसजवळ, ब्युटी सलॉन समोर
  • पॅराडाईज मिल्क सेंटर – केसर लस्सी  – बाळाराम भवन, ग्रँट रोड
  • मुंबई दरबार – डी स्पेशल श्वोर्मा – फर्जंदी बिल्डिंग, ग्रँट रोड

10. लोखंडवाला मार्केट (Lokhandwala Market)

Instagram

अंधेरी या उपनगरात लोखंडवाला मार्केट असून महिला आणि पुरुष दोघांकरिताही याठिकाणी अनेक फॅशनेबल कपडे आणि ज्वेलरी उपलब्ध आहे. ही स्ट्रीट मार्केट असून इथे मुख्यत्वे मुलांसाठी खूपच चांगल्या गोष्टी खरेदी करता येतात. कपड्यांव्यतिरिक्त फर्स्ट कॉपी घड्याळं, फोन कव्हर्स आणि इतर अक्सेसरीजही इथे चांगल्या मिळतात. शिवाय इथे खायलादेखील खूपच चांगले पर्याय आहेत. 

काय करता येतं – विंडो शॉपिंग, फिरणं

ADVERTISEMENT

कसं पोहचता येतं – अंधेरी अथवा जोगेश्वरी स्टेशनवरून लोखंडवाला कॉम्प्लेक्ससाठी बस अथवा रिक्षाची सोय आहे.

आकर्षण – कपडे, बॅग्ज, शूज आणि ज्वेलरी

खाण्याचं अप्रतिम ठिकाण – 

  • ब्रेडक्राफ्ट – चिकन अफगाणी फ्रँकी – ईडन केक शॉपच्या पुढे, लोखंडवाला मार्केट
  • फिरदौस कन्फेक्शनरी अँड बेकरी – फिरनी – मेट्रो ब्रिजजवळ, अंधेरी स्टेशन
  • स्ट्रीट स्टॉल – बुरजी पाव – पॉपटेट्सजवळ, आदर्श नगर
  • स्ट्रीट स्टॉल – दाबेली – रिबन्स अँड बलून्ससमोर, नगरदास रोड
  • स्ट्रीट स्टॉल – मेक्सिकन पानिनी – चेन्नई कॉलेजच्या बाजूला, जुना नगरदास रोड

11. मनिष मार्केट (Manish Market)

ADVERTISEMENT

Instagram

फॅन्सी चायनीज उत्पादनांसाठी सीएसटीजवळील मनिष मार्केट प्रसिद्ध आहे. अगदी घरगुती वस्तूंपासून ते एलसीडी स्क्रिन्सपर्यंत इथे सर्व काही मिळतं. तसंच हे एक होलसेल मार्केट असून इथून बऱ्याच गोष्टी एकत्र घेतल्यास, फायदा होतो. हे ओपन मार्केट असून रस्त्यावरच सर्व स्टॉल आहेत. पण इथल्या दुकानदारांचं एक कॉमन गोडाऊन असून आपलं सामान ते तिथेच ठेवतात. 

काय करता येतं – विंडो शॉपिंग

कसं पोहचता येतं – सीएसटीवरून अथवा मस्जिद स्टेशनवरून टॅक्सीने अथवा चालत जाता येतं. 

ADVERTISEMENT

आकर्षण – कपडे, बॅग्ज, इलेक्ट्रॉनिक वस्तू

खाण्याचं अप्रतिम ठिकाण – 

  • जय जवान स्टॉल – कांदा भजी – सेंट जॉर्ज रोड, सीएसटी
  • स्टॉल नं. 31 – परोठा भाजी – सेंट जॉर्ज रोड, सीएसटी
  • साऊथ कॉर्नर – चायनीज डोसा – कॅनन पावभाजीजवळ
  • काला खट्टा कोल्ड ड्रिंक हाऊस – काला खट्टा आणि वॉटरमेलन कोल्ड ड्रिंग – सीएसटी स्टेशनसमोर
  • पुल्लूकरा स्टोअर – मेदुवडा – स्टॉल नं. 14, सेंट जॉर्ज रोड, सीएसटी

12. लॅमिंग्टन रोड (Lamington Road)

Instagram

ADVERTISEMENT

लॅमिंग्टन रोड हा मुंबईतील आयटी हब म्हणून ओळखला जाणारा एरिया आहे. ही सर्वात व्सस्त स्ट्रीट असून इथे तुम्हाला प्रत्येक इलेक्ट्रिनकच्या वस्तू मिळणारच. इलेक्ट्रॉनिक वस्तू विकत घेण्यासाठी हे होलसेल आणि रिटेल मार्केट आहे. बाहेरपेक्षा कमी किमतीत इथे इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळतात. तसंच इथे ट्रान्झिस्टर्स, कॅपॅसिटर्स अशा वस्तूही तुम्हाला विकत घेता येतात. 

काय करता येतं – विंडो शॉपिंग

कसं पोहचता येतं – ग्रँट रोड पूर्व स्टेशनवरून टॅक्सीने अथवा चालत जाता येतं. 

आकर्षण – इलेक्ट्रॉनिक वस्तू

ADVERTISEMENT

खाण्याचं अप्रतिम ठिकाण – 

  • घसिटाराम हलवाई – दही कचोरी – पन्नालाल टेरेस, लॅमिंग्टन रोड
  • श्री सागर सँडविच कॉर्नर – क्लब ट्रिपल ग्रील्ड सँडविच – गणेश भवन दुकान क्र. 2, लॅमिंग्टन रोड
  • समर्थ वडा पाव – वडा पाव – वायएमसीए जवळ, लॅमिंग्टन रोड
  • चाफेकर्स प्युअर व्हेज – कोथिंबीर वडी – अयोध्या हॉटेलजवळ, लॅमिंग्टन रोड
  • स्ट्रीट स्टॉल – मैसूर मसाला चीज डोसा – मुंबई बिस्टिक ऑफिससमोर, लॅमिंग्टन रोड

हेदेखील वाचा

पावसाळ्यात फिरण्यासाठी भारतातील अप्रतिम ठिकाणं

महाराष्ट्रात फिरा मनसोक्त, जाणून घ्या वैशिष्ट्य

ADVERTISEMENT

Shopping Destination : लातूरमधील गंजगोलाई

रात्री मुंबईत भेट देण्याची ठिकाणे

10 Best Place To Eat Vada Pav In Mumbai In Marathi

 

ADVERTISEMENT
06 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT