ADVERTISEMENT
home / Make Up Trends and Ideas
या मजेशीर ब्युटी ट्रेंडमुळे तुमचा मूड होईल चेंज

या मजेशीर ब्युटी ट्रेंडमुळे तुमचा मूड होईल चेंज

लॉकडाऊनच्या काळात नवनवीन गोष्टी शिकण्याचा जणू ट्रेंडच आला आहे. या काळात आपण आपल्याला येत नसलेल्या अनेक गोष्टी शिकून घेतल्या. त्यामुळे आता कोणतीही गोष्ट आपण करू शकतो हा आत्मविश्वास प्रत्येकाकडे  नक्कीच आला आहे. कोरोनाचा प्रभाव अजूनही कमी झालेला नसल्याने सर्व काही पूर्वीप्रमाणे सुरळीत कधी सुरू होणार हे कोणालाच सांगता नाही येणार. पण मनात अशी निगेटिव्हिटी आणण्यापेक्षा काहीतरी नवीन आणि ट्रडिंग करून मूड चांगला ठेवणं नक्कीच चांगलं आहे. मेकअप, फॅशन, ब्युटीचे ट्रेंड सतत बदलत असतात. तेव्हा आम्ही शेअर करत असलेले ब्युटी ट्रेंड ट्राय करा आणि तुमचा मूड पटकन चेंज करा. 

व्हाईट आयलायनर –

Instagram

हो हो… आम्हाला माहीत आहे की व्हाईट आयलायनर हा काही नवा ट्रेंड नाही. पण या वर्षीचा हा एक लोकप्रिय ट्रेंड नक्कीच आहे. कारण या रंगाच्या आयलायनरमुळे तुमचे डोळे मोकळे आणि आकर्षक दिसतात. व्हाईट आयलायनरने कॅट आय लुक करा आणि थोडं हटके दिसा. तेव्हा सध्या तुमचं ब्लॅक आयलायनर थोडया दिवसांसाठी बाजूला ठेवा आणि व्हाईट आणि ब्राईट आयलायनरने तुमचा मूड परफेक्ट करा. जर तुम्ही परफेक्ट व्हाईट शेडच्या शोधात असाल तर मायग्लॅमची लिट मॅट आयलायनर पेन्सिल तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. हे व्हाआट आयलायनर वॉटरप्रूफ असून त्यात व्हेजिटेबल वॅक्सचा वापर करण्यात आलेला आहे. 

ADVERTISEMENT

टाय – डाय आयशॅडो –

Instagram

जर तुम्हाला नवनवीन ब्युटी ट्रेंडमध्ये रस असेल तर हा एक चॅलेजिंग आणि मजेशीर ब्युटी ट्रेंड नक्की ट्राय करा. 2020 मध्ये टाय-डाय हा एक टॉपला असलेला ब्युटी ट्रेंड होता. फॅशन जगात तुम्हाला अनेक टाय-डाय ब्युटी प्रिंट सापडू शकतात. त्यामुळे त्यातून कोणत्या डिझाईनचं सिलेक्शन करायचं हे तुम्हालाच ठरवावं लागेल. मात्र यासाठी तुमच्याकडे काही ब्राईट शेडच्या आयशॅडोज असणं गरजेचं आहे. अशा या ब्राईट रंगाच्या आयशॅडोसोबत खेळण्यामुळे तुमचा मूड नक्कीच चांगला  होईल. शिवाय हा लुक करण्यासाठी तुम्हाला हलक्या रंगाचं कन्सिलर अथवा व्हाईट आयशॅडोने बेस तयार करावा लागेल. ज्यामुळे आयशॅडोचे रंग अधिक खुलून दिसतील. आणखी एक महत्वाचं ते म्हणजे हा मेकअप काढण्यासाठी चांगल्या मेकअप रिमूव्हरचा वापर करा नाहीतर त्वचेचं नुकसान होऊ शकतं.

ग्लॉसी लिप्स –

ADVERTISEMENT

Instagram

2020 मध्ये आणखी एक ब्युटी ट्रेंड दिसून आला तो म्हणजे ओठांना थोडं ग्लॉसी लुक देण्याचा. ग्लॉस लुक पुन्हा नव्याने ट्रेंडमध्ये आहे आणि हा  लुक तुमच्या मेकअपमध्ये एकप्रकारे मजाही आणेल. पण त्यासाठी ओठांवर कोणताही ग्लॉस लावण्याआधी लिप लायनर आणि लिपस्टिकने ओठांना छान रंगवा. ज्यामुळे ग्लॉस लावल्यावर ते जास्त वेळ हायड्रेट आणि चमकदार दिसतील. यासाठी तुम्ही मायग्लॅमचं हे सुंदर लिपग्लॉस नक्कीच ट्राय करू शतता. ज्यामध्ये तुम्हाला अनेक शेडही मिळू शकतील.

 

टू टोन्ड आयशॅडो

ADVERTISEMENT

Instagram

जर तुमच्याकडे दोन शेड आहेत तर एकच का वापरायचं….आहे की नाही मजेशीर. या वर्षी या ट्रेंडने ब्युटी जगतात धमाल निर्माण केली. हा लुक करण्यासाठी एकाच वेळी तुम्ही तुमच्या डोळ्यांवर दोन आयशॅडो ट्राय करू शकता. मॅट असो वा शिमर या लुकमुळे तुमच्या सौंदर्यांत नक्कीच अधिक भर पडेल. हा मेकअप लुक करण्यासाठी तु्म्ही मायग्लॅमचं  मनिष मल्होत्रा नाईन इन वन आयशॅडो पॅलेट वापरू शकता. 

पर्पल मेकअप –

Instagram

ADVERTISEMENT

जांबळ्या अथवा क्लासिक ब्लु रंगाची यावर्षी जरा जास्तच चलती होती. ज्यामुळे या रंगसंगतीचा मेकअप ट्रेंड दिसून आला. यासाठी तुम्ही तुमचे डोळे, पापण्या, ओठांसाठी या रंगसंगतीच्या मेकअपची निवड करु शकता. ज्यामुळे तुम्ही जास्तच आकर्षक आणि सुंदर दिसाल. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

फॉक्स आयमेकअप करताना असा करा कन्सिलरचा वापर

ADVERTISEMENT

खास समारंभासाठी करुन घ्या बॉडी पॉलिशिंग मिळेल इन्स्टंट ग्लो

घरच्या घरी #cutcrease आय मेकअप करुन मिळवा सुंदर डोळे

05 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT