चेहऱ्याचीच नाही तर आपल्या शरीराच्या त्वचेची काळजी घेणे हे फार गरजेचे असते. पूर्वीच्या काळी लहान बाळांची त्वचा चांगली राहावी यासाठी अगदी आवर्जून मसाज केला जात असे. पण मोठ्यांचे काय? मोठ्यांना मसाज करुन घेणे कायमच शक्य होते असे नाही. मसाज पार्लर शोधणे चांगला मसाज मिळणे हे तसे शहरातही कठीण असते. मसाजचे थोडेसे ॲडव्हान्स रुप म्हणून हल्ली बॉडी स्पा केला जातो. सध्या अनेक मोठ्या शहरांमध्ये याचा ट्रेंड आहे. तुम्हाला माहीत आहे का?बॉडी स्पाचा त्वचेवर आणि शरीरासाठी काय फायदा होतो ते? चला जाणून घेऊया या विषयी अधिक माहिती.
बॉडी स्पा म्हणजे काय?
शरीर शुद्धीकरणाची शास्त्रशुद्ध पद्धत म्हणजे बॉडी स्पा. आपण कितीही आंघोळ करत असलो तरी देखील त्यामुळे आपली स्वच्छता पूर्ण होते असे सांगता येत नाही. बॉडी स्पा मध्ये तुमच्या शरीरावर स्क्रब लावला जातो. तो स्क्रब छान चोळून काढला जातो. त्यामुळे तुमच्या शरीरावर साचलेला मळ काढण्यास मदत मिळते. तो स्क्रब काढल्यानंतर तुमच्या शरीराला आवश्यक असा मसाज तुम्हाला केला जातो. त्यामुळे शरीर थकलेले असेल तर ते लगेचच रिलॅक्स होते. बॉडी स्पा घरी करणे शक्य आहे. पण त्यामध्ये तुम्हाला तितका आराम मिळेल असे मुळीच सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही स्पा सेंटरमध्ये जाऊन मसाज करणे हे नेहमीच उत्तम असते.
हिवाळा सुरू होताच गळू लागतात केस, करा हे घरगुती उपाय
बॉडी स्पाचे फायदे
बॉडी स्पा म्हणजे काय? हे जाणून घेतल्यानंतर त्याचे फायदे काय ते देखील तुम्ही जाणून घ्यायला हवेत.
- रक्ताभिसरण योग्य होण्यासाठी बॉडी स्पा हा फारच फायद्याचा असतो. त्यामुळे त्वचा शु्द्धीकरण होण्यास मदत मिळते.
- स्क्रब केल्यामुळे त्वचेवर साचलेला मळ निघून जाण्यास मदत मिळते. त्यामुळे त्वचा अधिक चांगली दिसू लागते.
- मसाज हा स्पाचा एक मोठा फायदा आहे. ज्यामुळे शरीर एकदम रिलॅक्स होते.
- काही नसा किंवा शरीराचा भाग अडकला असेल किंवा दुखत असेल तर ती दुखापत कमी होण्यास स्पामध्ये मदत मिळते.
- ज्याप्रमाणे फेशिअलमुळे चेहरा चमकदार दिसतो. स्पामुळेही त्वचा तशीच चमकदार दिसू लागते.
किती दिवसांनी करावा स्पा
बॉडी स्पाचे फायदे वाचून झाल्यानंतर तो करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला स्पामध्ये किती दिवसांचे अंतर असायला हवे ते देखील माहीत असायला हवे. स्पा कितीही चांगला वाटला तरी देखील तुम्ही तो दोन ते तीन महिन्यातून एकदा करायला हवा. त्यामुळे त्याचे फायदे दिसून येतात. प्रोफेशनलकडून करताना इतके अंतर राखणे फारच गरजेचे असते. घरी करत असाल तर महिन्यातून दोनदा तुम्ही हे करु शकता.
आता नक्की करुन पाहा बॉडी स्पा