ADVERTISEMENT
home / Natural Care
त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी सकाळी उपाशीपोटी करा हा उपाय

त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी सकाळी उपाशीपोटी करा हा उपाय

पचनसंस्था मजबूत करण्यासाठी सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी पिण्याचा तज्ञ्ज सल्ला देतात. मात्र जर या कोमट पाण्यात एक गुळाचा खडा तुम्ही मिक्स केला तर तुम्हाला अफवातून फायदे मिळू शकतात. कारण कोमट गुळपाणी तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीदेखील बेस्ट आहे. आर्युवेद शास्त्रानुसार कोमट पाण्यात गुळ टाकून पिण्याने अनेक आजार तर बरे होतातच शिवाय यामुळे तुमच्या ह्रदयाचे आरोग्यही सुधारते. गुळाने शरीराला चांगली ऊर्जा मिळते त्यामुळे सकाळीच गुळपाण्याने दिवसाची सुरूवात केल्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश राहता. यासाठीच अनेक वर्षांपूर्वी बाहेरून थकून आलेल्या पै पाहुण्यांना  फ्रेश वाटण्यासाठी गुळपाणी देण्याची पद्धत होती. मात्र आतादेखील तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी सकाळी उपाशीपोटी गुळपाणी पिण्याचा उपाय नक्कीच करू शकता. यासाठीच जाणून घ्या कोमट पाण्यात गुळ टाकून पिण्याचे हे आश्चर्यकारक फायदे 

गुळपाणी त्वचेसाठी उत्तम डिटॉक्स वॉटर –

जर तुम्हाला अॅक्ने अथवा त्वचेच्या समस्या असतील तर हा उपाय अवश्य करा. सकाळी उठल्याबरोबर एक गुळाचा खडा अथवा चमचाभर गूळ पावडरसोबत एक ग्लास कोमट पाणी प्या आणि बघा काही दिवसांमध्ये तुमच्या त्वचेवर काय बदल होतो. गुळ हे एक उत्तम क्लिंझर असल्यामुळे या घरगुती उपायामुळे तुमची त्वचा डिटॉक्स होते. यामुळे तुमची त्वचा आतून स्वच्छ होते आणि त्वचेच्या समस्या कमी होतात. शिवाय यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील एजिंगच्या खुणादेखील कमी होतात आणि तुम्ही कायम फ्रेश दिसता. 

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर –

गूळ हा साखरेसाठी एक उत्तम पर्याय आहे हे आपण जाणतोच. शिवाय गुळामध्ये पोटॅशियम,मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन सी भरपूर असते. यामुळे तुमच्या शरीरातील एक्ट्रा कॅलरिज बर्न होण्यास मदत होते. तुम्ही वजन कमी करण्यासाठी तुमच्या चहा, कॉफी अथवा खाद्यपदार्थांमध्ये साखरेऐवजी गूळ वापरू शकता. मात्र तुम्हाला झटपट तुमचं वजन कमी करायचं असेल तर मात्र सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी कोमट पाण्यासोबत गूळ खाणे अवश्य लक्षात ठेवा. 

ADVERTISEMENT

पोटाच्या समस्या कमी होतात –

जर तुम्ही सतत गॅस, बद्धकोष्ठता या पोटाच्या समस्यांनी हैराण झाला असाल तर गूळ तुमच्यासाठी वरदान आहे. कोमट पाण्यासोबत गूळ खाण्याने तुमचे पोट दुखणे लगेच कमी होईल. अपचनाचा त्रास कमी करण्यासाठी दररोज रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर कोमट पाणी आणि गूळ घ्या. गुळामुळे पचन सुधारते यासाठीच भारतीय खाद्यसंस्कृतीत अनेक पदार्थांमध्ये गूळ वापरण्याची पद्धत आहे. 

नैराश्यापासून सुटका मिळवण्यासाठी –

आजकालच्या जीवनशैलीमुळे अनेकजण छोट्या छोट्या गोष्टीमुळे नैराश्याच्या अधीन जाताना पाहायला मिळते. जर तुम्हाला नैराश्यापासून सुटका हवी असेल तर सकाळी उठल्यावर कोमट पाण्यासोबत गूळ खा. कारण हे एक अॅंटि डिप्रेसंट असल्यामुळे या उपायाने तुमच्या शरीरातील हॉर्मोन्स संतुलित राहतील. गुळपाणी पिण्याने तु्म्हाला रात्री शांत झोपही लागेल. 

तोंडाच्या समस्या कमी करण्यासाठी –

गूळ साखरेपेक्षा कमी गोड आणि कमी फॅट वाढवणारा एक पदार्थ आहे. जर तुम्ही साखरेऐवजी गूळ खाण्यास सुरूवात केली कर तुमच्या दात आणि हिरड्या मजबूत होतील. याचं कारण असं गुळामुळे तुमच्या तोंडातील जीवजंतूचा नाश होतो. गुळ हे एक अॅंटि बॅक्टेरिअलही आहे. जर तुम्हाला तोंडाला घाण वास येण्याचा त्रास जाणवत असेल तर दररोज कोमट पाण्यातून गूळ अवश्य घ्या. 

फोटोसौजन्य – इन्साग्राम आणि शटरस्टॉक

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

गुळाचा चहा करण्यासाठी वापरा युक्ती, खराब होणार नाही दूध

घरच्या घरी तयार करा चिंचेच्या पाचक गोळ्या

नाचणीपासून तयार केलेल्या ‘या’ सोप्या आणि पौष्टिक रेसिपीज

15 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT