logo
ADVERTISEMENT
home / Acne
त्वचेवर चमक आणण्यासाठी लिंबू आणि मधाचे फायदे (Benefits Of Lemon And Honey For Skin)

त्वचेवर चमक आणण्यासाठी लिंबू आणि मधाचे फायदे (Benefits Of Lemon And Honey For Skin)

लिंबू आणि मध या दोन्ही गोष्टी आपण आपल्या नियमित आयुष्यात वापरत असतो. सकाळी कोमट पाण्यातून लिंबू आणि मधाचे मिश्रण करून प्यायल्यास, त्वचा सुंदर राखण्यास आणि त्वचेवर चमक राखण्यास तसंच वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते. पण त्वचेवर चमक आणण्यासाठी याचा विविध उपयोग कसा करून घेता येतो याची तुम्हाला माहिती आहे का? आम्ही या लेखातून तुम्हाला त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार बनविण्यासाठी लिंबू आणि मधाचा कसा वापर करून घेता येतो हे सांगणार आहोत. लिंबामध्ये असणाऱ्या विटामिन सी आणि मधातील असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्समुळे चेहऱ्यावर अधिक चमक येण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही या दोन्ही गोष्टींचा वापर करून घेऊ शकता. मात्र याचे प्रमाण कसे असावे आणि त्याचे काय फायदे मिळतात ते आपण यातून जाणून घेऊया. यासाठी आपण याचा वापर करून वेगवेगळे फेसमास्कही तयार करून घेऊ शकतो. यावेळी कशी काळजी घ्यायची हेदेखील आपण जाणून घेऊया.

त्वचेसाठी लिंबू आणि मधाचा नक्की फायदा काय? (Why Lemon & Honey For Skin)

त्वचेसाठी लिंबू आणि मध

Shutterstock

ADVERTISEMENT

बऱ्याचदा आपली त्वचा कोरड्या हवेमुळे शरीरातील हायड्रेशन काढून घेते. त्यामुळे त्वचा अधिक कोरडी आणि शुष्क होते. याचा परिणाम केवळ चेहऱ्यावर नाही तर संपूर्ण शरीरावर होत असतो आणि त्यामुळे तुमचा चेहरा आणि त्वचा अधिक निस्तेज दिसू लागते. त्यामुळे त्वचेची काळजी घेणं अत्यंत गरजेचे असते. त्यावेळी तुम्हाला लिंबू आणि मधाचा उपयोग करून घेता येतो. आता त्वचेसाठी लिंंबू आणि मधच का असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. तर याचं उत्तरही आम्ही तुम्हाला सांगतो. लिंबामध्ये त्वचा अधिक उजळविण्याचे आणि ब्लिचींगचे गुणधर्म असतात. तर मधामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असते. तसंच यामध्ये मॉईस्चराईजिंगही असते. हे दोन्ही आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. त्वचा अधिक मऊ आणि मुलायम राहण्यास याची मदत होते. तसंच आपल्या चेहऱ्यावर आलेले डाग काढून टाकण्यासाठीही यामधील विटामिन सी चा उपयोग होतो. चेहऱ्यावरील कोरडेपणा काढून त्वचा अधिक चमकदार बनविण्यासाठी या दोन्ही गोष्टींचा उपयोग होत असल्याने याचा फायदा करून घ्यायला हवा. इतर कोणत्याही सौंदर्य उत्पादनांमध्ये या दोन्ही गोष्टींचा भरपूर प्रमाणात वापर करून घेतलेला असतो. त्यामुळे तुम्ही याचा अगदी बिनधास्त वापर करू शकता. याचा कोणताही दुष्परिणाम तुमच्या त्वचेवर होत नाही. कारण हे मुळात नैसर्गिक घटक आहेत. 

डोळ्यांखाली झालेल्या काळ्या वर्तुळांपासून सुटका देईल मध

त्वचेकरिता लिंबू आणि मधाचे फायदे (Benefits Of Lemon and Honey For Skin)

त्वचेकरिता लिंबू आणि मधाचे अनेक फायदे आहेत. हे नैसर्गिक घटक असून याने त्वचेला कोणतीही हानी पोहचत नाही. (केवळ तुम्हाला या गोष्टींची अलर्जी असेल तर याचा उपयोग करून घेऊ नका) त्यामुळे तुम्ही हे कोणताही विचार न करता उपयोगात आणू शकता आणि यामुळे त्वचा अधिक चमकदार होण्यास मदत मिळते. याचे नक्की काय फायदे आहेत ते आपण पाहू

ADVERTISEMENT

त्वचेसाठी लिंबाचा वापर आणि त्याचे होणारे अप्रतिम फायदे – How To Use Lemon For Face

अँटि-एजिंग (Anti-Aging)

अँटि-एजिंग (Anti Aging)

Shutterstock

लिंबामध्ये असणारे विटामिन सी हे त्वचेमध्ये अँटि-एजिंगप्रमाणे काम करते. एका अभ्यासानुसार, हे त्वचेला ऑस्किडेटिव्ह तणावापासून वाचविण्याचे काम करते. वास्तविक ऑस्किडेटिव्ह तणावामुळे एजिंग अर्थात वय जास्त दिसण्याची समस्या निर्माण होत असते. त्याशिवाय लिंबू हे युव्ही किरणांपासून होणाऱ्या नुकसानापासून आणि फोटो – एजिंग (सूर्याच्या किरणांमुळे त्वचेवर सुरकुत्या पडणे) च्या त्रासापासून वाचण्यास मदत करते. मधामुळे त्वचा अधिक उजळण्यास मदत मिळते. तुम्ही जर मध, लिंबू आणि तांदूळ पीठ एकत्र करून चेहऱ्याला अथवा त्वचेला लावलेत तर सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते. तुम्ही याचा नियमित वापर करून पाहू शकता. तसंच त्वचा सॅनिटाईज करण्यासाठी तुम्ही हल्लीच्या दिवसात MyGlamm चे वाईपआऊटही वापरू शकता. 

ADVERTISEMENT

त्वचेवरील काळे डाग घालविण्यासाठी (Heal Dark Patch)

त्वचेवरील काळे डाग घालविण्यासाठी (Heal dark patch)

Shutterstock

लिंबातील विटामिन सी हे त्वचेला हायपरपिगमेंंटेशन (त्वचेवरील काळे डाग) पासून वाचविण्यासाठी मदत करते. यामुळे त्वचेमध्ये अधिक उजळपणा येतो आणि काळे डाग नियमित वापराने निघून जाण्यास मदत मिळते. तसंच डिपिगमेंटेशन गुणांमुळे हे डाग निघून जाण्यास मदत मिळते. लिंबू आणि मधाचे एकत्रिकरण हे त्वचेला अधिक फायदेशीर ठरते. मधातील अँटिएजिंगमुळे हे डाग पटकन निघून जाण्यास मदत होते. नियमित वापराने योग्य परिणाम दिसून येतो. 

अॅक्नेसाठी उपयुक्त (Acne)

अॅक्ने (Acne)

ADVERTISEMENT

Shutterstock

लिंबामध्ये विटामिन सी असते जे शरीरावर अँटिइन्फ्लेमेटरी गुणाचे काम करते. एनसीबीआय (National Center of Biotechnology Information) च्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आल्याप्रमाणे हे गुण अॅक्ने होणाऱ्या कारणांना मुळापासून हटवते. ही समस्या दूर करण्याचे काम करते. तसंच अॅक्नेमुळे त्वचेवर पडणारे घाव अथवा डाग काढून टाकण्यासही याची मदत मिळते. मध यातील प्रत्येक इन्फेक्शन दूर करण्यासाठी मदत करते. त्यामुळे लिंबू आणि मध या दोन्हीचा यासाठी फायदा होतो. 

त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी (Pigmentation)

बऱ्याच जणांना त्वचेवर काही डाग येण्याची समस्या असते ज्याला पिगमेंटेशन म्हटले जाते. लिंबू आणि मधामध्ये नियासिन अर्थात विटामिन बी – 3 असते जे अँटिऑक्सिडंटप्रमाणे काम करते आणि हायपरपिगमेंटेशनची समस्या दूर करून चेहरा स्वच्छ करण्यास याचा फायदा मिळतो. तुम्ही नियमित लिंबू आणि मधाचा वापर आपल्या त्वचेसाठी करू शकता. 

त्वचा अधिक उजळविण्यासाठी (For Glowing Skin)

त्वचा अधिक उजळविण्यासाठी (To get more skin glow)

ADVERTISEMENT

Shutterstock

त्वचा अधिक उजळविण्यासाठी अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्येही लिंबू आणि मधाचा वापर करण्यात आलेले आपल्याला दिसून येते. तुम्ही जर त्यातील घटक वाचले तर तुम्हाला लिंबू आणि मध या दोन गोष्टींचा वापर नक्कीच दिसून येईल. लिंबातील विटामिन सी मुळे चेहऱ्यावरील काळेपणा दूर होऊन अधिक उजळपणा मिळतो. तर आपल्या कोरड्या आणि शुष्क त्वचेला अधिक चांगले मॉईस्चर करण्याचे काम मध करते. त्वचा अधिक मऊ आणि मुलायम राखण्यास मदत करते. ज्यांची त्वचा कोरडी आहे  त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. याच्या नियमित वापराने त्वचा अधिक उजळते. 

काळे डाग घालविण्यासाठी (Black Spots)

आपण सतत उन्हात असतो किंवा बाहेर फिरतो. बऱ्याचदा सनस्क्रिन लावत नाही.  त्याचा परिणाम म्हणजे सूर्यांच्या अतिनील किरणांमुळे त्वचेवर काळे डाग येतात. आता हे डाग हटविणे तसे तर कठीण असते. पण तुम्ही जर लिंबू आणि मधाचा वापर केलात तर हे डाग घालविण्यास तुम्हाला वेळ लागणार नाही. नैसर्गिक घटकांमुळे हे डाग घालविण्यासाठी याची मदत मिळते. काळे डाग घालवून रंग उजळविण्यास आणि त्वचा अधिक तजेलदार आणि तरूण दिसण्यासाठी याचा फायदा मिळतो. अगदी तुम्ही कोणताही फेसवॉश वापरत असाल तर त्यामध्येही लिंबू आणि मधाचा अर्क असणारा फेसवॉश असेल तर तुमच्या चेहऱ्यावर परिणाम  दिसून येतो. 

त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी (Exfoliate Skin)

त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी (Exfoliate skin)

ADVERTISEMENT

Shutterstock

त्वचा नेहमी एक्सफोलिएट करणं गरजेचं असतं. अन्यथा अधिक शुष्क आणि कोरडी त्वचा आपल्याला नंतर त्रासदायक ठरते. यासाठी तुम्हाला लिंबू आणि मधाचा फायदा मिळतो. हे एखाद्या टॉनिकप्रमाणे काम करून त्वचा स्वच्छ करण्याचे आणि त्वचा एक्सफोलिट करण्याचे काम करते. यामध्ये तुम्ही बेसनाचादेखील वापर करून घेऊ शकता. तुम्ही लिंबू, मध आणि बेसनाचा फेसपॅक करून त्याचा वापर करून घ्या. साधारण चेहऱ्यावर हा फेसमास्क 20 मिनिट्स ठेवा आणि त्वचा व्यवस्थित एक्सफोलिएट करून घ्या. यामुळे चेहऱ्यावरील टॅनिंग आणि मुरूमांची समस्या असल्यास, तीदेखील दूर होते. 

त्वचा नैसर्गिकरित्या मॉईस्चराईज करण्यासाठी (Moisturize Skin Naturally)

त्वचा नैसर्गिकरित्या मॉईस्चराईज करण्यासाठी (Moisturize skin naturally)

Shutterstock

ADVERTISEMENT

लिंबू आणि मधामध्ये अँटिएजिंग आणि मॉईस्चराईजिंगचे गुणधर्म आढळतात. त्यामुळे नैसर्गिकरित्या त्वचा मॉईस्चराईज ठेवण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो. तसंच नैसर्गिकरित्या सूर्याच्या किरणांपासून वाचविण्यासाठी याची मदत होते आणि त्वचा कोरडी पडण्यापासून याचा फायदा मिळतो. 

लिंबू आणि मधाचे फेसमास्क (Lemon and Honey Face Mask)

त्वचेसाठी या दोन्ही गोष्टींचा काय फायदा होतो ते आपण जाणून घेतले. आता याचे फेसमास्क कसे बनवायचे आणि त्याचा कसा वापर करून घ्यायचा ते आपण पाहू.

लिंबू आणि मध

लिंबू आणि मध

ADVERTISEMENT

Shutterstock

साहित्य 

  • लिंबाचा रस 
  • ऑर्गेनिक मध 
  • पाणी 

कृती 

  • लिंबाचा रस पाण्यात नीट मिक्स करून घ्या 
  • त्यामध्ये नंतर मध मिक्स करा 
  • हे मिश्रण चेहऱ्याला आणि त्वचेला लावा 
  • 20 मिनिट्सनंतर कोमट पाण्याने धुवा 
  • योग्य परिणामांसाठी हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करून पाहा 

लिंबू, मध आणि ग्लिसरीन

साहित्य 

ADVERTISEMENT
  • लिंबाचा रस 
  • मध 
  • ग्लिसरीन 
  • गुलाबपाणी 

कृती 

  • लिंबाचा रस, मध, ग्लिसरीन आणि 4-5 थेंब गुलाबपाणी एकत्र करून घ्या 
  • रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण कापसाच्या सहाय्याने चेहऱ्यावर लावा 
  • सकाळी उठून कोमट पाण्याने चेहरा धुवा 

मध, लिंबू आणि साखर

मध, लिंबू आणि साखर

Shutterstock

साहित्य 

ADVERTISEMENT
  • लिंबाचा रस 
  • मध 
  • साखर

कृती 

  • त्वचा अधिक कोरडी असल्यास, लिंबाचा रस आणि साखर नीट मिक्स करून घ्या
  • त्यात मध मिक्स करून हे त्वचेवर लावा 
  • काही वेळ तसंच ठेवा आणि मग कोमट पाण्याने धुवा. त्वचा त्वरीत चमकदार आणि तजेलदार होते

मध, लिंबू आणि ओटमील

मध, लिंबू आणि ओटमील

Shutterstock

साहित्य 

ADVERTISEMENT
  • लिंबाचा रस 
  • मध 
  • ओटमील

कृती 

  • त्वचेवर उजळपणा आणण्यासाठी 1 चमचा ओटमील पावडर, 1 चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा मध घ्या आणि मिक्स करा
  • हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि 20 मिनिट्स तसंच राहू द्या
  • योग्य परिणामांसाठी आठवड्यातून दोन दिवस तुम्ही हे वापरू शकता

मध, लिंबू आणि हळद

मध, लिंबू आणि हळद

Shutterstock

साहित्य 

ADVERTISEMENT
  • लिंबाचा रस 
  • मध 
  • हळद पावडर
  • गुलाबपाणी 

कृती 

  • एका भांड्यात पाणी अथवा गुलाबपाणी घ्या आणि त्यात लिंबाचा रस मिक्स करा 
  • त्यात नंतर मध आणि हळद पावडर टाकून घट्टसर मिश्रण बनवा
  • हा तयार फेसपॅक चेहरा आणि मानेपासून लावा 
  • साधारण 15 मिनिट्सनंतर कोमट पाण्याने धुवा 
  • आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हा प्रयोग करू शकता

त्वचेकरिता लिंबू आणि मध कसे वापरावे याच्या काही सोप्या टिप्स (Tips To Use Lemon And Honey For Skin)

त्वचेकरिता लिंबू आणि मध कसे वापरावे याच्या काही सोप्या टिप्सही आम्ही तुम्हाला सांगत आहोत. तुम्हाला यामुळे वापरणे आणि त्याचा फायदे करून घेणे सोपे जाईल. 

  • त्वचेवर अधिक चमक आणण्यासाठी लिंबू आणि मधाचा फेसपॅक तुम्ही ब्रशच्या सहाय्याने हलक्या हाताने लावा  
  • चेहऱ्यावर फेसमास्क लावताना कोणत्याही प्रकारे दबाव देऊ नका. तसंच कोरडेपणाने त्याचा उपयोग करू नका
  • लिंबाचा फेसपॅक सर्व त्वचेसाठी फायदेशीर नसतो. त्यामुळे तुम्ही जर मध आणि लिंबाचा वापर करणार असाल तर तुमची त्वचा अधिक तेलकट नाही ना याची खात्री करून घ्या. अन्यथा तुम्हाला मुरूमांचा त्रास होऊ शकतो. 
  • मुरूमं असल्यास, आपल्या त्वचेसाठी हा लिंबू आणि मधाचे मिश्रण योग्य आहे की नाही याची चाचणी वापरण्यापूर्वी करून घ्या. याचे परीक्षण तुम्ही हातावर करून घेऊ शकता
  • लिंबाचा उपयोग नेहमी डायल्यूट करून (पाणी मिक्स करून अथवा पातळ स्वरूपात) करावा, अन्यथा चेहऱ्यावर याचा प्रत्यक्ष उपयोग केल्यास, त्याचा परिणाम वाईटही होऊ शकतो. त्यामुळे लिंबाचा उपयोग काळजीपूर्वक करा
  • तसंच लिंबू आणि मधाचा उपयोग चेहऱ्यावर केल्यानंतर मॉईस्चराईज करायला विसरू नका. मधाने चेहरा मॉईस्चराईज होतोच. पण तरीही तुम्ही मॉईस्चराईजरचा उपयोग करा
  • त्वचेला कुठेही जखम झाली असेल तर लिंबाचा उपयोग करू नका. कारण त्यामुळे अधिक जळजळ होईल आणि त्वचेला अधिक नुकसान पोहचण्याची शक्यता असते

पुढे वाचा – 

ADVERTISEMENT

Health Benefits Of Lemon in hindi

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

14 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT