अक्रोडचे फायदे जाणून घेण्याआधी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, अक्रोड खाण्यासाठी थोडं कडूसर असलं तरी दुसऱ्या कडू फळांच्या तुलनेत अमृत समान आहे. अक्रोड थोडंसं कडवट लागलं तरी त्याची चवही चांगली असते आणि ते औषधीय गुणांनी भरपूर आहे. अक्रोडचं सेवन हे छोट्यांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी फायदेशीर आहे. अक्रोड आपण सुकामेवा म्हणू खातोच पण याचे केसांसाठी आणि त्वचेसाठी असलेले फायदे खूप कमी जणांना माहीत असतील. अक्रोड जसं आरोग्यदायी आहे तसंच सौंदर्यदायीही. चला जाणून घेऊया अक्रोडचे गुणकारी फायदे त्वचेसाठी आणि केसांसाठी.
अक्रोडमधील जीवनसत्त्व मूल्य (Walnut Nutrition)
Shutterstock
अक्रोडमध्ये आढळणारी पोषक तत्त्व कोणत्याही सुकामेव्यापेक्षा जास्त लाभदायक आहेत. यामध्ये ओमेगा -3 तसंच ओमेगा -6 फॅट्स भरपूर प्रमाणात आढळतात. अक्रोडमध्ये पॉली अनसॅचुरेटेड फॅटी एसिड अधिक प्रमाणात आढळतं. अक्रोडमध्ये कॉपर, मँगनीज, मॅग्नेशिअम,पॉटेशिअम, फॉस्फोरस, बायोटिन, व्हिटॅटमीन B 6, व्हिटॅमीन E, व्हिटॅमीन C, व्हिटॅमीन A, व्हिटॅमीन K तसंच आर्यनची मात्राही पुरेश्या प्रमाणात असते. खरंतर अक्रोडवर जे गडद रंगाचं पातळ साल असतं ते आपण काढतो. पण ते काढू नये. कारण त्यात सर्वाधिक प्रमाणात अँटीऑक्सीडंट असतात. जसं फेनॉलिक एसिड , टेनिन्स आणि फ्लेवोनॉइड्स असतात. जे खूपच फायदेशीर असतात.
देखील वाचा पिस्त्याच्या रेसिपी
सौंदर्यदायी अक्रोड त्वचेसाठी (Walnut For Skin)
Shutterstock
अक्रोड तुम्ही खाल्लंत किंवा अक्रोडचं तेल तुम्ही त्वचेसाठी वापरलं तर ते जास्त गुणकारी आहे. कारण या तेलात वर सांगितल्याप्रमाणे भरपूर व्हिटॅमीन्स आणि मिनरल्स असतात. जे तुमच्या त्वचेसाठी अगदी एखाद्या जादूप्रमाणे काम करतात. ज्यांना सुंदर आणि नितळ त्वचा तसंच एजलेस स्कीन हवी असले त्यांनी अक्रोडचं तेल वापरलंच पाहिजे.
सुरकुत्या होतील गायब (For Fighting Wrinkles)
अक्रोडमध्ये असणाऱ्या व्हिटॅमीन बीमुळे ते त्वचेसाठी जणू वरदान आहे. व्हिटॅमीन बी हे तुमच्या तणावाला दूर करून मूडही चांगला ठेवतं. कमी तणावामुळे तुमची त्वचा छान राहते. कारण जास्त तणावामुळे तुमच्या त्वचेवर लवकर सुरकुत्या येतात. ज्यामुळे तुमचा चेहरा जास्त प्रौढ वाटतो. अक्रोडमधील व्हिटॅमीन बी आणि व्हिटॅमीन ई मुळे हे एखाद्या नैसर्गिक अँटीऑक्सीडंटप्रमाणे काम करतं. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील वाढत्या वयाच्या खुणा दूर होतात. तसंच एजिंग प्रोसेसही लांबणीवर पडते.
इंफेक्शनची नको चिंता (Remedy For Infection)
फंगसचा नायनाट करण्यासाठी काळ्या अक्रोडपेक्षा उत्तम उपाय नाही. काळा अक्रोडचं सेवन केल्यास कोणत्याही फंगल इंफेक्शनला तुम्ही टाळू शकता. खाज येणं किंवा इतर इंफेक्शनमुळे दिसणारी लक्षणं अक्रोडचं सेवन आणि अक्रोड तेलाच्या वापराने नाहीशी होऊ शकतात. सोरायसिस या त्वचेच्या गंभीर आजारावरही अक्रोड गुणकारी आहे.
त्वचा होईल मॉईश्चराईज (For A Moisturized Skin)
ज्यांची त्वचा कोरडी असेल त्यांनी अक्रोड तेलाचा (walnut oil) वापर नियमित करावा. अक्रोड तेलामुळे तुमची त्वचा मॉईश्चराईज होते. हे त्वचेत खोलवर जाऊन तुमच्या त्वचेला मॉईश्चराईज करून चांगली आणि आरोग्यदायी त्वचेच्या सेल्सची निर्मिती करतं.
डोळ्यांखालील काळ्या वर्तुळावर रामबाण उपाय (For Dark Circles)
तुम्ही जर नियमितपणे कोमट अक्रोड तेलाचा वापर डोळ्यांखालील डार्क सर्कल्सवर केलात तर ती नक्कीच कमी होतील. अक्रोडपासून काढलेल्या तेलामुळे डोळ्यांखालील पफीनेस कमी होतो आणि डोळ्यांना रिलॅक्स वाटतं. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल्सही कमी होतात आणि त्वचेचा रंग पुन्हा उजळतो.
तारूण्यदायी अक्रोड (Great Antioxidant)
अक्रोडचं तेल हे उत्तम अँटीऑक्सीडंट आहे. जे तुमच्या चेहऱ्यावरील वाढत्या वयाच्या खुणांना रोखतं. ज्यामुळे तुमची त्वचा फारच नितळ आणि तारूण्यदायी दिसते.
त्वचेसाठी असा करा अक्रोडचा वापर (How To Use Walnut For Skin)
Shutterstock
अक्रोडचा वापर हा खाण्यासाठी तसंच चेहऱ्यावर फेसपॅक किंवा स्क्रब म्हणूनही करू शकता. पाहा कसा करता येईल चेहऱ्यासाठी अक्रोडचा वापर.
1. साखर आणि अक्रोड फेसस्क्रब (Sugar And Walnut Face Scrub)
साहित्य – साखर, अक्रोड आणि लिंबाचा रस.
सर्वात आधी तुमच्या हातावर साखरेचे दाणे, कुटलेले अक्रोड आणि लिंबाचा रसाचे काही थेंब घ्या. हे सर्व मिक्स करा. नंतर हे मिश्रण तुमच्या चेहऱ्याला आणि मानेला लावून हळूवार सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करा.
2. दही आणि अक्रोड फेसपॅक (Yogurt And Walnut Face Pack)
साहित्य – अक्रोड आणि दही
दही आणि वाटलेला अक्रोड घेऊन ते मिक्स करा. मग या मिश्रणाने चेहऱ्याला हळूवार मसाज करा. हे फेसपॅक चेहऱ्यावर किमान 10-15 मिनिटं ठेवा आणि मग धुवून टाका. हे तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन काढून टॅनही कमी करतं.
3. मध, तेल आणि अक्रोड स्क्रब (Honey, Oil And Walnut Scrub)
साहित्य – मध, वाटलेला अक्रोड आणि तेलामध्ये तुम्ही ऑलिव्ह, बदाम किंवा नारळाचं तेल घेऊ शकता.
एका बाऊलमध्ये दोन ते तीन चमचे मध, तेलाचे काही थेंब आणि वाटलेला अक्रोड घ्या. या मिश्रणाने चेहऱ्याला आणि बॉडीलाही तुम्ही मसाज करू शकता. या स्क्रबने तुमची त्वचा मऊ आणि चमकदार दिसेल.
4. अक्रोडच्या कवचापासून बनवलेला स्क्रब (Walnut Shell Scrub)
साहित्य – घरात असलेला बॉडीवॉश आणि अक्रोडच्या कवचाची पावडर
हा स्क्रब बनवण्यासाठी तुम्ही एका बाऊलमध्ये घरात असलेला एखादा बॉडीवॉश आणि अक्रोडच्या कवचाची पावडर घेऊन ती मिक्स करा. ही पावडर थोडी खरखरीत असल्याने ती एक उत्तम स्क्रब म्हणून तुमच्या त्वचेवर काम करते. मग आंघोळीला जाण्याआधी तुम्ही हा स्क्रब लावा आणि मग काही मिनिटांनी आंघोळीला जा. तुमची त्वचा अगदी मऊ आणि कोमल जाणवेल.
5. अक्रोड कवच पावडर, बी वॅक्स आणि दालचिनी स्क्रब (Walnut Shell Powder, Beeswax and Cinnamon Scrub)
साहित्य – 1 चमचा अक्रोड कवच पावडर, 1 चमचा बी वॅक्स आणि चिमूटभर दालचिनी.
बी वॅक्स मायक्रोवेव्हमध्ये 10-15 सेकंदासाठी वितळवून घ्या. नंतर त्यात अक्रोड कवच पावडर घाला आणि मग त्यात दालचिनी पावडर घाला. आता हे मिश्रण थंड होऊ द्या. हे मिश्रण नॉर्मलला आल्यावर हा स्क्रब ओठांना लावा. मग कोमट पाण्याने धुवून टाका. हायड्रेटींग ओठांसाठी दालचिनी फायदेशीर आहे.
.
केसांसाठी गुणकारी अक्रोड (Benefits Of Walnut For Hair)
Shuttterstock
आपल्यापैकी प्रत्येकालाच सुंदर आणि लांबसडक केस आवडतात. पण आजच्या प्रदूषणयुक्त वातावरणात हे एक स्वप्नचं झाले आहे. पण हे सुंदर आणि समस्याविरहीत केसांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडेल अक्रोड तेल.
केसगळती होईल कमी (Reduce Hair Loss)
आजकाल प्रदूषण, धावपळीचं रूटीन आणि वेळीअवेळी खाणं यामुळे तुमच्या केसांवरही आपोआपच परिणाम दिसू लागतो. ज्यामुळे केस रूक्ष आणि कोरडे होतात. तुम्हीही सुंदर आणि चमकदार निरोगी केसं मिळवू शकता तुमच्या रूटीन हेअर केअरमध्ये अक्रोड सामील करून. अक्रोड खाऊन किंवा अक्रोड तेलाचा वापर करून तुम्ही मिळवू शकता निरोगी आणि चमकदार केस.
केसांतील कोंडा होईल दूर (Fights Dandruff)
अक्रोडचं तेल जगभरात वापरलं जातं ते याच्यातील मॉईश्चराईजिंग घटकांमुळे. ज्यामुळे केसांतील कोरडेपणा दूर होतो आणि परिणामी कोरडेपणामुळे होणार कोंडाही नाहीसा होतो. त्यामुळे केसातील कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही अक्रोड तेलाचा वापर अवश्य करा.
केसांची वाढ होईल झटपट (Promotes Hair Growth)
अक्रोडमुळे तुमच्या केसांची वाढ लवकर होते. यामागील कारण आहे यामध्ये आढळणारं पॉटेशिअम. पॉटेशिअम हे आवश्यक आहे कारण यामुळे तुमच्या केसांच्या वाढीसाठी आवश्यक सेल्सची पुननिर्मिती होते. ज्यामुळे केसांच्या वाढीला चालना मिळते.
लांबसडक, मजबूत केस (Long, Stronger Hair)
अक्रोड हा पॉटेशिअम, ओमेगा -3, ओमेगा -6 आणि ओमेगा -9 फॅटी एसिडचा चांगला स्त्रोत आहे. या सर्व घटक केसांच्या फॉलीकल्सना बळकटी देतात. अक्रोड तेल केसांना नियमित लावल्यास तुमचे केस लांबसडक, मजबूत आणि चमकदार होतात. रिसर्चनुसार तुम्ही या तेलाचा वापर रोज केल्यास डोक्याला टक्कलही पडत नाही.
निरोगी स्कॅल्प आणि केस (Healthier Scalp And Hair)
अक्रोड तेलामुळे तुमचं स्कॅल्प मॉईश्चराईज्ड आणि हायड्रेटेड राहतं. अक्रोडमधील अँटीफंगल घटकांमुळे केसांना कोणत्याही प्रकारचं इंफेक्शनही होत नाही. तसंच हे तेल तुमचं स्कॅल्प स्वच्छ आणि निरोगी ठेवतं. निरोगी स्कॅल्प म्हणजे निरोगी केस.
सुंदर केसांसाठी करा (Walnut Oil Message)
Shutterstock
कसं वापराल अक्रोडचं तेल – आठवड्यातून किमान दोनदा तरी अक्रोड तेल केसांना लावावं. यासाठी तुम्ही या तेलाने स्कॅल्प आणि केसांना मसाज करा. नंतर किमान 20 मिनिटं तसंच ठेवा. नंतर केस शँपूने धुवून टाका.
अजून चांगल्या परिणामांसाठी तुम्ही हे तेल इतर तेलांसोबत मिक्सही करू शकता. जसं ऑलिव्ह ऑईल, बदामाचं तेल किंवा इसेंशियल तेल.
अक्रोडचे दुष्परिणाम (Side Effects Of Walnut)
- जर तुम्हाला नट्सची एलर्जी असेल तर तुम्ही अक्रोड खाणं टाळाव. कारण त्यामुळे तुम्हाला काही साईड ईफेक्टस जाणवू शकतात. जसं स्किन रॅशेस, मान आखडणं किंवा श्वास घ्यायला त्रास होणं इ.
- अक्रोडमध्ये अशी काही तत्त्व असतात जी औषधांचा परिणाम कमी करू शकतात. त्यामुळे जर तुम्ही कोणत्या औषधांचं सेवन करत असाल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच अक्रोड खा. ज्यामुळे तुम्हाला कोणतेही साईड ईफेक्ट्स टाळता येतील.
- काळ्या अक्रोडमध्ये phylates आढळतात. जे तुमच्या शरीरात आर्यनची कमतरता निर्माण करू शकतात. ज्यामुळे रक्ताची कमतरतेने एनिमिया होऊ शकतो.
- जर तुम्हाला खोकला झाला असेल तर अशावेळी अक्रोडचा वापर टाळावा. कारण यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासू शकते.
- जर तुम्ही गर्भवती असाल तर अक्रोडचं सेवन जास्त प्रमाणात केल्यास तुमचं वजन वाढू शकतं.
FAQs About Walnut
दिवसभरात किती अक्रोड खाणं चांगलं आहे?
दिवसभरात किमान दोन-तीन अक्रोड खाल्यास तुम्हाला आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. रिसर्चनुसार, अक्रोड खाल्लाने तुमचं पचन सुधारतं, डायबेटीस नियंत्रणात राहतं आणि उष्णतारोधक म्हणूनही अक्रोड काम करतं.
अक्रोड सकाळी की रात्री खावेत?
जर तुम्हाला अक्रोडच्या गुणांचा जास्तीत फायदा हवा असेल तर तुम्ही अक्रोड रात्री खावेत.
अक्रोड विषारी असू शकतात का?
काळे अक्रोड हे विषारी मानले जातात. त्यामुळे शक्यतो डॉक्टरांना विचारून किंवा डाएटीशियनच्या सल्लानुसार याचं सेवन करावं.
अक्रोडही भिजवून खावेत का?
सुकामेवा भिजवून का खावा? यामागील शास्त्रीय कारण असं आहे की, सुकामेवा भिजवून खाल्ल्यास यातील अँटी न्युटीएंट घटक कमी होतात आणि त्यामुळे ते शरीरासाठी जास्त फायदेशीर ठरतात. त्यामुळे सुकामेवा किंवा अक्रोडमधील जीवनसत्त्वांचा लाभ घेण्याासाठी भिजवून ठेवणं कधीही चांगलं.
हेही वाचा –
त्वचा आणि केसांचे आरोग्यासाठी फायदेशीर आहे सिताफळ
#DIY: नैसर्गिकरित्या त्वचा अधिक सुंदर बनवण्यासाठी 12 Coffee Scrub Recipes