आताच्या काळात सगळेच आपल्या आरोग्याबाबत जागरूक झाले असून चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येक जण काही ना काही करताना दिसतो. पुणेकरही याला अपवाद कसे असतील. सदृढ आरोग्याची कल्पना आता पुण्यातही जोर धरताना दिसत आहे. ज्यामुळे पुण्यात अनेक जिम्स सुरू झाले आहेत. ही जिम्स उत्तम तर आहेतच पण अगदी मुंबईच्या जिम कल्चरलाही मात देतील अशी आहेत. नजर टाकूया पुण्यातील टॉप टेन जिम्सवर जिथे तुम्ही करू शकता मस्तपैकी कसरत.
डॉटफिट फिटनेस जिम (Dotfit Fitness Gym)
हे जिम बालेवाडी फाटा बाणेर येथे आहे. डॉटफिट फिटनेस हे प्रसिद्ध K11 फिटनेस मॅनेजमेंटचा भाग असून इकडे ग्राहकांच्या सर्व प्रकारच्या हेल्थ रूटीनवर भरपूर मेहनत, न्यूट्रीशन सेमिनार्स आणि पर्सनलाईज्ड डाएटमार्फत लक्ष दिले जाते. इथे सर्व नवीन फिटनेस साधनं आहेत. तसंच पावर योगा क्लासेस, हठ योगा क्लासेस, स्पिनिंग, झुंबा फिटनेस, किकबॉक्सिंग, टीआरएक्स ट्रेनिंग वर्कआऊट, मसाला भांगडा आणि डान्स क्लासेसही आहे.
पत्ता : 136/1, 5th मजला, सृष्टी एलिगन्स, सॉल्ट हॉटेलजवळ, बालेवाडी फाटा, बाणेर, पुणे.
वेळ : सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत
खर्च : साधारण खर्च 6000 हजारच्या पुढे.
संपर्क : 98 2284 3366
रॉयल फिटनेस क्लब (Royal Fitness Club)
रॉयल फिटनेस क्लबची गणती पुण्यातील बेस्ट जिम्समध्ये होते. येथे माफक खर्चात फिटनेसच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इथलं इनडोअर स्पिनिंग आणि सायकलिंग हे जास्त लोकप्रिय आहे. तसंच इथे एअरोबिक्स, योगा ट्रेनिंग सेशन, किकबॉक्सिंग. बॉल पिलाटेज, बॉडी कंडिशनिंग, मसाज आणि स्पा थेरपीजही उपलब्ध आहेत.
पत्ता : तिसरा मजला, विश्व आर्केड, नऱ्हे गाव, सिंहगड रोड, नऱ्हे. पुणे.
वेळ : सकाळी 6 ते रात्री 10.30, रविवारी सकाळी 7 ते दुपारी 1
खर्च : किमान खर्च 3350 हजाराच्या पुढे.
संपर्क : 88 0500 0042
वाचा – पुणेकरांनो जर तुम्ही डाएटिशनच्या शोधात असाल तर हे तुमच्यासाठी
ऑप्टिमम हेल्थ क्लब (Optimum Health Club)
ऑप्टिमम हेल्थ क्लबचं नाव पुण्यातील बेस्ट जिम्समध्ये आवर्जून घेतलं जातं. पुण्यात याच्या बऱ्याच शाखा आहेत. येथील ट्रेनर्सही फक्त जास्त ट्रेनिंग आणि फिटनेससाठी कडक नियमांवर भर न देता निरोगी आरोग्यावर लक्ष केंद्रित करतात. येथील सर्व ट्रेनर हे K11 सर्टिफाईट आहेत. तसंच इथे विज्ञानावर आधारित विविध वर्कआऊट्स घेतले जातात. खासकरून इथला पर्सनल हेल्थ मॅनेजमेंट प्रोग्रॅम विशेष आहे. या जिममध्ये योगा, स्पा, एअरोबिक्स आणि झुंबा हे फिटनेस प्रकार तुम्हाला करता येतील.
पत्ता : ज्ञानेश्वर पादुका चौक, सूर्या भवन, 5 वा मजला, एफसी रोड, पुणे.
वेळ : सकाळी 6 ते दुपारी 1 आणि दुपारी 3 ते रात्री 10.
खर्च : किमान 3 हजारांपासून पुढे.
संपर्क : 08046800092
गोल्ड्स जिम (Gold’s Gym)
गोल्ड जिमचं नाव तुम्ही ऐकलं असेलच. गोल्ड जिमला ग्लोबली ओळख आहे. सगळीकडेच याच्या शाखा आहेत. वर्ल्ड क्लास मशिनरी आणि उत्कृष्ट फिटनेस ट्रेनर अशी गोल्ड जिमची ओळख आहे. इथे तुम्हाला पर्सनलाईज्ड ट्रेनर्सही उपलब्ध आहेत. येथे तुम्हाला पावर योगा क्लासेस, हट योगा, झुंबा फिटनेस, किक बॉक्सिंग, टीआरएक्स फंक्शनल ट्रेनिंग वर्कआऊट, मसाला भांगडा आणि डान्स क्लासेस जॉईन करता येतील.
पत्ता : पहिला मजला, गिगा स्पेस आयटी पार्क, पुणे नगर रोड, विमान नगर, पुणे
वेळ : सकाळी 6 ते रात्री 10.00, रविवारी सकाळी 8 ते दुपारी 1
खर्च : 5 हजाराच्या पुढे.
संपर्क : 84 4629 6969
फिटनेस फर्स्ट (Fitness First Gym)
1993 सालापासून फिटनेस फर्स्टचं नातं फिटनेसशी जोडलेलं आहे. पुण्यातील प्रसिद्ध जिमपैकी एक फिटनेस फर्स्ट आहे. जिथे तुम्हाला मिळेल चांगली सर्व्हिस आणि ही जिम्स खूपच मेंटेन आहेत. इथे तुम्हाला तायक्वोंदो, किक बॉक्सिंग, क्रॉस ट्रेनिंग, बॉडी टोनिंग, स्टेप, क्लासिक एअरोबिक्स, पावर योगा, कार्डिओ-सालसा आणि सर्किट ट्रेनिंग घेता येईल.
पत्ता : 1021/2, मीरा निवास, शिवाजी नगर, कॉसमॉस बँकेच्या समोर, शिवाजी नगर, पुणे.
वेळ : सकाळी 6:00 ते रात्री 11:00
खर्च : 3 हजाराच्या पुढे.
संपर्क : 098600 34766
वाचा – हातावरची चरबी महिनाभरात करा कमी, जाणून घ्या
इंपल्स फिटनेस (Impulse Fitness)
इथे महिलांना वर्कआऊट करण्यासाठी खास वेगळा भाग आहे. त्यामुळे इकडे महिलांची संख्या जास्त आहे. तसंच इथे पुरूषांसाठीही वर्ल्ड क्लास व्यायामाची साधनं आहेत. इथे तुम्हाला वर्कआऊटचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. तसंच सोबत प्रोफेशनल ट्रेनर्सही आहेत. या जिममध्ये तुम्हाला कार्डिओ, पिलाटेज, झुंबा, डान्स, योगा आणि पावर योगा, स्पिनिंग, फंक्शनल ट्रेनिंग, मिक्स मार्शल आर्ट्स आणि डाएट कौन्सिलिंग उपलब्ध आहे.
पत्ता : दुसरा मजला, ऑरम फर्निचरजवळ, फाख्री हिल्स, कोंढवा, पुणे
वेळ : पहाटे 6:00 ते रात्री 10:00, रविवारी बंद
खर्च : 5 हजाराच्या पुढे.
संपर्क : +91 20 3016 3444
ट्रान्सफॉर्म फिटनेस (Transform Fitness)
ट्रान्सफॉर्म फिटनेस जिम हे पुण्यातील कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये फारच प्रसिद्ध आहे. कारण हे बजेट फ्रेंडली असून इथे सर्व सोयीसुविधाही उपलब्ध आहेत. इथे खास फ्री वेट सेक्शन आणि ग्रुप एक्स-स्टुडिओ असून त्यासाठी सर्टिफाईड फिटनेस ट्रेनर आहेत. येथील प्रमुख आकर्षण आहे इथला पर्सनलाइज्ड फिटनेस मॅनेजमेंट प्रोग्रॅम. इथे तुम्हाला एअरोबिक्स, झुंबा, कार्डिओ, किक बॉक्सिंग, बॉलीवूड डान्स, फ्युजन आणि पावर योगा करता येईल.
पत्ता : प्लॉट नं 11,12, पुष्कराज सोसायटी, भारती विद्यापीठामागे, धनकवडी, पुणे.
वेळ : सकाळी 6 ते रात्री 10, रविवारी बंद.
खर्च : 3050 हजारच्या पुढे.
संपर्क : 99 7025 8096
सोलारिस (Solaris)
सोलारिस जिमची सुरूवात 1999 साली झाली असून हे पुण्यातील जुन्या जिम्सपैकी एक आहे. हे खूपच स्पेशियस असून वर्ल्डक्लास सोयीसुविधा येथे आहेत. तसंच तुमच्या फिटनेससाठी इथे सर्टिफाईड ट्रेनरही आहेत. इथलं मुख्य आकर्षण आहे ज्युडो आणि तायक्वोंदो. तसंच इथे बॉडी कॉम्बॅट, बॉडी पंप, आरएमपी आणि तायची ट्रेनिंग तुम्हाला करता येईल.
पत्ता : एजी ट्रेड सेंटर, प्लॉट नं 18, बावधन खुर्द, तळ-मुळशी, पुणे.
वेळ : जिथे पुण्यातील इतर जिम रविवारी बंद असतात. तिथे सोलारिस मात्र सुरूच असतं.
सकाळी 5 ते दुपारी 1, दुपारी 3 ते रात्री 10, रविवारी सकाळी 5 ते दुपारी 12, दुपारी 4 ते रात्री 9.
खर्च : 7250 हजारच्या पुढे.
संपर्क : 83 8005 5357
वाचा – योग्य उपाय करून वजन कसे वाढवावे
आर्कफिट अरेना (Arcfit Arena)
5,000 स्केअर फिटच्या परिसरावर पसरलेलं, संपूर्णतः एअर कंडिशन्ड आणि सर्व सोयी असलेलं आर्कफिट अरेना हे जिम आहे. या जिममध्ये स्पा विथ स्टीम आणि शॉवरची सोयसुद्धा उपलब्ध आहे. या जिमची खासियत म्हणजे बॉडी कंडिशनिंग, एअरोबिक्स, योगा, डान्स आणि झुंबा ही आहे. इथे तुम्हाला बॉलीवूड डान्सिंग आणि सर्किट ट्रेनिंगही शिकता येईल.
पत्ता : आर्कफिट अरेना, आपटे रोड, हॉटेल सेंट्रल पार्क कार्यालयासमोर, जेएम रोड, पुणे.
वेळ : दररोज सकाळी 6 ते रात्री 10 आणि रविवारी संध्याकाळी 4 ते रात्री 9
खर्च : 6100 हजारच्या पुढे.
संपर्क : 84 4628 9777
फर्स्टफिट (Firstfit)
फर्स्टफिट जिमची खासियत आहे येथील मॅनेजमेंट आणि प्रोफेशनल ट्रेनर्स. ज्यामुळे इथे तुम्हाला अगदी घरच्यासारखं वातावरण वाटतं. या जिममध्ये खास आयटी प्रोफेशनल्सला डोळ्यासमोर ठेवून काही खास ट्रेनिंग प्रोग्रॅम डिझाईन करण्यात आले आहेत. इथे तुम्हाला झुंबा, बेंच एअरोबिक्स, किक बॉक्सिंग, पावर योगा, एचआयआयटी, प्लायोमॅट्रीक्स, फंक्शनल ट्रेनिंग, पायलॉक्सिंग आणि पिलाटेज यासारखे फिटनेस प्रकार करता येतील.
पत्ता : आनंद स्क्वेअर, न्यू एअरपोर्ट रोड, विमान नगर, पुणे.
वेळ : रोज सकाळी 6 ते रात्री 11 आणि रविवारी सकाळी 8 ते दुपारी 1
खर्च : 5000 हजारच्या पुढे.
संपर्क : 83 7808 0000
पुण्यातील जिमबाबत विचारण्यात येणारे काही प्रश्न (FAQs)
जर तुम्ही पुणेकर असाल किंवा नवीनच पुण्यात आला असाल तर तुमच्या मनात हे प्रश्न आले असतील तर त्यांची उत्तरं लगेच मिळतील.
पुण्यातील जिम्समध्ये देण्यात येणारे मेंबरशिप प्लॅन्स कोणते आणि अंदाजे खर्च?
पुण्यातील जिम्समध्ये ही साधारणपणे महिन्याचा, चार महिन्यांचा (quarterly), सहा महिन्यांचा किंवा वर्षभराचा असे मेंबरशिप ऑप्शन्स उपलब्ध आहेत. पुण्यातही मुंबईएवढं नाही पण 4,500 रूपयांपासून ते 6,000 हजारांपर्यंत क्वार्टरली आणि 8,000 हजारांपासून ते 12, 000 हजारांपर्यंत सहा महिन्यांसाठी व 18,000 ते 22, 000 वार्षिक अशा मेंबरशिप्स आहेत.
पुण्यातील जिममध्ये शॉवर आणि सौना बाथ यासारख्या सुविधा आहेत का?
सगळ्याच जिममध्ये तुम्हाला या सुविधा मिळतीलच असं नाही. त्यामुळे कोणतंही जिम जॉईन करण्याआधी याबाबतची चौकशी करून घ्या आणि मगच जॉईन करा.
पुण्यातील कोणत्या जिममध्ये बेस्ट क्राऊड आढळतो?
जिममधील चांगला क्राऊड बघण्यापेक्षा तिकडे चांगलं आरोग्य घडवणाऱ्या आणि घडणाऱ्या व्यक्ती पाहिजेत. जर तुम्हीही पुण्यात असंच एखादं जिम शोधत असाल तर सर्वात आधी जिममधील सोयीसुविधा पाहा. ते तुमच्या घरापासून किती जवळ आहे ते पाहा आणि तुमच्या आरोग्याला त्याचा किती फायदा होईल ते जाणून घ्या.
You Might Like This:
परफेक्ट फिगरसाठी करा ‘हा’ परफेक्ट डाएट आणि पाहा तुमच्यातील बदल