डोळ्यांना आधिक सुंदर आकर्षक करण्यासाठी मस्काराचे काही स्ट्रोकच पुरेसे आहेत. पण त्यासाठी तुम्हाला कोणता मस्कारा तुमच्या डोळ्यांसाठी चांगला आहे हे माहीत असायला हवं. कारण मस्कारामध्येही आजकाल मार्केटमध्ये अनेक प्रकार पाहायला मिळतात. ओठांसाठी न्यूड लिपस्टिक प्रमाणेच, आपल्याला भारतात चांगले मस्करा उत्पादने मिळू शकतात. एक चांगला ब्रॅंड आणि मस्कारा लावण्याची पद्धत यामुळे तुमच्या आय मेकअपमध्ये जमीन आसमानाचा फरक पडू शकतो. म्हणूनच मस्कारा निवडण्यापूर्वी तुम्हाला चांगले ब्रॅंड, मस्काराचे फंक्शन्स, किंमत, फायदे आणि तोटे माहीत असायला हवे. यासाठीच भारतातील या बेस्ट दहा मस्कारा प्रॉडक्टची ओळख अवश्य करून घ्या.
Shutterstock
Colorbar Zoom and Whoosh Mascara
जर तुम्ही डेली विअरसाठी एखादा चांगला मस्कारा शोधत असाल तर कलरबारचा झूम अॅंड व्हूश मस्कारा तुम्हाला नक्कीच पसंत पडेल. आपल्या त्वचेसाठी कंसीलर प्रमाणेच, आपल्याला भारतात चांगले मस्करा उत्पादने मिळू शकतात. काळ्या शेडचा हा मस्कारा फक्त एका स्ट्रोकमध्ये तुम्हाला हवा तसा व्हॉल्यूम मिळवून देईल. यातील कंडिशनिंग फॉर्म्युला तुमच्या प्रत्येक पापणीला काळीभोर करेल.
फायदे –
- क्रिझ प्रूफ आणि वॉटर रेसिस्टंट
- इंटेस व्हॉल्यूम
- स्मज प्रूफ आणि ट्रान्सफर रेसिस्टंट
- संवेदनशील डोळे आणि कॉन्टॅक्ट लेंससाठी उपयुक्त
- पॅरोबेन, मिनरल ऑईल फ्री
- क्रुअल्टी फ्री
तोटे –
- शेड फक्त काळ्या रंगात उपलब्ध आहे
Lakme Eyeconic Lash Curling Mascara
जर तुम्हाला जास्त व्हॉल्यूम, कर्ल इफेक्ट आणि पटकन रिमूव्ह होईल असा मस्कारा हवा असेल तर लॅक्मे कंपनीचा हा मस्कारा तुमच्या मेकअप किटमध्ये असायलाच हवा. ब्लॅक आणि रॉयल ब्लू अशा दोन शेड मध्ये तो उपलब्ध आहे. तुम्ही दररोज मेकअप करण्यासाठी हा मस्कारा वापरू शकता. विशेष म्हणजे यात तुमच्या पापण्यांना कर्ल करण्यासाठी खास कर्ल ब्रश देण्यात आलेला आहे. आपल्याला भारतात चांगली फाऊंडेशन आणि मस्करा मिळू शकेल.
फायदे –
- एक्स्ट्रा व्हॉल्यूम
- स्मार्ट कर्ल ब्रश
- लाईटवेट आहे
- मॉईस्चराईझिंग फॉर्म्युला
तोटे –
- क्रुअल्टी फ्री अथवा वेगन नाही
Clinique High Impact Mascara
पापण्यांना व्हॉल्यूम देत लांब आणि सुंदर करणारा हा हाय इम्पॅक्ट मस्कारा म्हणजे एकाच प्रॉडक्टमध्ये अनेक फायदे असलेला खजिनाच आहे. या मस्कारामध्ये पापण्यांना वेगवेगळं करत रंगवण्यासाठी खास शैलीतील ब्रश डिझाईन करण्यात आला आहे.
फायदे –
- अॅलर्जी टेस्टेड आहे
- शंभर टक्के सुंगध रहित आहे
- जास्त व्हॉल्यूम आणि लांबसडक पापण्यांसाठी
- रिच आणि इंटेन्स रंग
- लॉंग विअरिंगसाठी परफेक्ट
तोटे –
- महाग आहे
Smashbox Super Fan Mascara
तुम्ही जास्त काळ टिकेल अशा एखाद्या नवीन आधुनिक फॉर्म्युला वापरण्यात आलेल्या मस्काराच्या शोधात असाल तर हा मस्कारा निवडा. कारण यात लॉंग विअरिंग, लेंथनिंग, मॉर्डन, फन फॉर्म्युला वापरण्यात आलेला आहे. शिवाय हे उत्पादन वेगनदेखील आहे. याचा परिणाम तुमच्या पापण्यांवर जवळजवळ बारा तास राहू शकतो.
फायदे –
- बारा तास पापण्यांवर टिकते
- टोकदार पणम मऊ आणि डबल ब्रिस्टंल ब्रश
- सूपर ब्लॅक फॉर्म्युला ज्यामुळे तुमच्या पापण्या दिसतील घनदाट
- वेगन
- क्रुअल्टी फ्री
तोटे –
- महाग आहे
- शेड मर्यादित
L’Oreal Paris Volume Million Lashes Mascara
कोणत्याही मस्कारामध्ये तुम्हाला काय हवं असतं. पापण्यांना भरपूर व्हॉल्युम आणि हवा तसा रंग… बरोबर ना. या लॉरिअल कंपनीच्या या मस्कारामुळे तुम्हाला हव्या तशा घनदाट पापण्या तर मिळतीलच शिवाय सर्व मस्कारामध्ये जाणवणारा चिकटपणा नक्कीच जाणवणार नाही. कारण याचा आकर्षक ब्रश तुमच्या पापण्यांवर तेवढाच मस्कारा लावेल जेवढा त्या घनदाट दिसण्यासाठी गरजेचा आहे.
फायदे –
- वापरणे सहज आहे
- गुठळ्या होत नाही
- पापण्यांवर जास्त थर जमा होत नाही
- संवेदनशील आणि कॉन्टॅक्ट लेंस वापरण्यांसाठी योग्य
तोटे –
- शेड मर्यादित आहे
- वेगव नाही
Too Faced Better Than Sex Mascara
टू फेस मस्काराचा ब्रश पाहूनच तुम्ही याकडे आकर्षित व्हाल म्हणूच तर याला बेटर दॅन सेक्स असं नाव दिलेलं आहे. एकतर ते अगदी छोट्या आकर्षक पॅक मध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टीवेअर क्लचमधूनही ते कॅरी करू शकता. शिवाय त्यात युनिक कोलेजीन फुअल्ड फॉर्म्युला वापरण्यात आला आहे ज्यामुळे तुमच्या पापण्या दिसतील लांब, घनदाट आणि कर्ली तेही फक्त एका कोटमध्ये. जेव्हा तुम्हाला जास्त आकर्षक आणि घनदाट पापण्या हव्या असतील तेव्हाच या मस्काराचे तीन कोट लावा.
फायदे –
- काळ्याभोर आणि घनदाट पापण्यांसाठी
- स्मज प्रूफ
- दिवसभर वापरू शकता
- होअरग्लास शेप ब्रश
- क्रुअल्टी फ्री
- पॅरोबेन फ्री
तोटे –
- मर्यादित शेड
Maybelline New York Hypercurl Mascara Waterproof
मेबिलीनचे हा वॅक्स कोटिंग आणि स्पेशल ब्रश असलेला मस्कारा तुम्ही नक्कीच वापरून पाहिला हवा. याच्या ब्रश मुळे तुमच्या पापण्या पंचाहत्तर टक्के कर्ली दिसतील. त्यामुळे यासाठी तुम्ही आयलॅश कर्लर वापरण्याची मुळीच गरज नाही. हा मस्कारा तुमच्या पापण्यांवर जवळजवळ अठरा तास टिकून राहू शकतो. संवेदनशील डोळ्यांसाठी अथवा जर तुम्ही कॉन्टॅक्ट लेंस वापरत असाल तरी तुम्ही हे वापरू शकता. शिवाय वॉटरप्रूफ असल्यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी आल्यावर अथवा पावसातही ते तसंच राहते.
फायदे –
- वॉटर प्रूफ
- स्मज प्रूफ
- अठरा तास टिकते
तोटे –
- वेगन नाही
Revlon Water Tight Mascara
आयमेकअप साठी नेहमीच चांगल्या ब्रॅंडच्या प्रॉडक्टची निवड करायला हवी. त्यामुळे रॅव्हलॉन कंपनीचा हा मस्कारा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. एकतर यात लाईटवेट फॉर्म्युला वापरण्यात आला आहे. शिवाय त्यामुळे तुम्हाला घनदाट पापण्याही नक्कीच मिळू शकतात.
फायदे –
- वॉटर रेसिस्ंटट
- स्मज आणि टिअर प्रूफ
- दिवसभर टिकते
- डार्क आणि रिच फिनिश
तोटे –
- वेगन नाही
Myglamm Twist it Mascara
मायग्लॅम ब्युटी कंपनीची सर्वच उत्पादने महिलांच्या मेकअपच्या गरजांचा विचार करून तयार केलेली आहेत. मायग्लॅमचं हे ट्विस्ट इट मस्कारा तुमच्या पापण्यांना काळंभोर आणि कर्ली करण्यासाठी परफेक्ट आहे. ज्यामुळे तुमच्या पापण्यांना मिळेल एक्ट्रा व्हॉल्यूम आणि सुंदर कर्ल इफेक्ट. याचा आकर्षक आणि एडजस्ट होणारा ब्रश कोणत्याही शेपच्या डोळ्यांसाठी परफेक्ट आहे.
फायदे –
- टू इन वन अॅप्लीकेशन
- पापण्या घनदाट आणि कर्ली करते
- इंटेन्स ब्लॅक कलर
- वॉटर रेसिस्टंट, लॉंग लास्टिंग मस्कारा
- स्मज प्रूफ
- ट्रान्सफर रेसिस्टंट
- क्रुअल्टी फ्री
- प्राण्यांवर टेस्ट केलेलं नाही
तोटे –
- शेड मर्यादित
- थोडे महाग आहे
Manish Malhotra Glitter Mascara Topcoat
तुम्हाला ग्लॅम लुक करायचा असेल तर हा मस्कारा तुमच्या मेकअप किटमध्ये असायलाच हवा. मनिश मल्होत्रा ग्लिटर मस्कारा टॉपकोटने तुम्ही दिसाल अगदी आकर्षक. एखाद्या नाईट पार्टीसाठी हा मस्कारा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता.
फायदे –
- स्पार्कलिंग फिनिश
- लाईट जेल टेक्चर
- वापरण्यासाठी सोपे
- लवकर सुकणारा फॉर्म्युला
- पापण्यांना मऊ ठेवते
- संवेदनशील डोळ्यांसाठी उपयुक्त
तोटे –
- महाग आहे