मधुमेह हा एक असा आजार आहे जो एकदा झाला की आयुष्यभर तुमच्यासोबत राहतो. याचा दुष्परिणाम हा आहे की मधुमेहाच्या जोडीला इतर आरोग्य समस्या निर्माण होतात. पण मधुमेह झाल्यावर आहारावर नियंत्रण, व्यायाम, योग्य औषधोपचार करून तुम्ही मधुमेह नियंत्रणात ठेवू शकता. काही संशोधनानुसार मधुमेहींनी आहारात दुधाचा समावेश केल्यामुळे त्यांना चांगला फायदा होऊ शकतो. कारण ब्लड शुगर ही आपल्या शरीरातील ऊर्जेचा मुख्य स्त्रोत असते. रक्तातील ग्लुकोज हे तुम्ही घेत असलेल्या आहारातून निर्माण होत असते. जेव्हा तुमच्या स्वादुपिंडातील इन्सुलीनच्या निर्मितीवर परिणाम होतो तेव्हा तुमच्या रक्तातील साखर वाढते अथवा कमी होते. जर ही पातळी नियंत्रित ठेवली नाही तर मधुमेहीच्या आरोग्य समस्या अधिक वाढू शकतात.
मधुमेहींनी का करावे दुधाचे सेवन
मधुमेही काय आहार घेतात यावर त्यांचे आरोग्य ठरत असते. तज्ञ्जांच्या मते यासाठी मधुमेहींनी आहारात विशेषतः सकाळी दुधाचे सेवन करणे गरजेचं आहे. कारण दुधात कार्बो हायड्रेटचं पचन करणारे आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करणारे गुणधर्म असतात. यासाठी जाणून घ्या मधुमेहींनी कसे करावे दुधाचे सेवन
हळदीचे दूध
हळदीच्या दूधाला अमृताची उपमा दिली जाते. कारण या दुधामध्ये शरीरातील अनेक आजार बरे करण्याची क्षमता असते. हळदीच्या दुधामुळे तुमच्या शरीरातील प्रतिकार शक्ती वाढते. हळदीमध्ये अॅंटि इनफ्लैमटरी आणि अॅंटि ऑक्सिडंट गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमची इन्सुलीनची पातळी नियंत्रित राहते आणि तुम्ही घेत असलेल्या औषधोपचारांना चालना मिळते. यासाठी मधुमेहींनी हळदीचे दूध सकाळी घेणे फायद्याचे ठरेल.
बदामाचे दूध
हळदीच्या दुधाप्रमाणेच बदामाचे दूध देखील तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच लाभदायक ठरू शकते. आजकाल बदामाचे दूध बाजारात सहज मिळते त्यामुळे बाहेर गेल्यावर तुम्ही बदामाचे दूध घेऊ शकता. याशिवाय बदामाचे दूध घरीदेखील पटकन तयार होते. यासाठीच काही बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा सकाळी वाटून ते दुधातून घ्या. बदामाच्या दुधात कॅलरिज कमी असतत. व्हिटॅमिन ई, डी आणि पोषक गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसे प्रोटिन्स आणि पोषक घटक मिळतात. बदामाच्या दुधामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारल्यामुळे मधुमेहींसाठी ते लाभदायक असते.
दालचिनीचे दूध
दालचिनीच्या चहाप्रमाणे दालचिनीचे दूधदेखील शरीरासाठी उत्तम असते. कारण दालचिनीमध्ये रक्तातील साखर नियंत्रणात ठेवली जाते. दालचिनीमध्ये अॅंटि ऑक्सिडंट आणि अॅंटि इनफ्लैमटरी गुणधर्म असल्यामुळे मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत होते. दूध आणि दालचिनीमध्ये कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. याशिवाय यामध्ये बीटा कॅरोटीन, अल्फा कॅरोटीन आणि ल्युटिन असते. ज्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तातील साखर वेगाने वाढत नाही.
या तीन प्रकारच्या दुधामधील फायदे मिळवण्यासाठी मधुमेहींनी दूध घेताना ते या तीन प्रकारे घेण्याचा प्रतत्न करावा. या तीन पैकी कोणत्या प्रकारचे दूध तुमच्या सोयीचे आणि आवडीचे आहे हे तुम्ही ठरवू शकता. मात्र दूध घेण्याचा कंटाळा मात्र करू नये. कारण मधुमेहींसाठी सर्वात महत्त्वाचा आहे आहार. दुधाचा आहारात समावेश केल्यामुळे तुमची आरोग्य समस्या मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होईल.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
मधुमेहींनी यासाठी खायला हवी अळकुडीची भाजी
पावसाळ्यात मधुमेहींनी अशी घ्यावी पायाची काळजी
भाजी करताना नका टाकू कारळ्याच्या बिया, मधुमेहींसाठी ठरतात वरदान