कुरळे केस म्हटलं की पूर्वी मुलींच्या कपाळावर अक्षरशः आठ्या येत असत. मात्र आता तर हे कुरळे केसच ट्रेंडमध्ये आहेत. त्यामुळे आजकाल स्टायलिश आणि ट्रेंडी दिसण्यासाठी काही जणी मुद्दाम केस कर्ली करतात. पण जर तुमचे केस जन्मतःच कुरळे असतील. तर तुम्हाला असे केस मेंटेन करण्यासाठी थोडा वेळ आणि पैसे नक्कीच खर्च करावे लागू शकतात. कारण कुरळे असल्यामुळे ते लवकर कोरडे पडतात. सहाजिकच केस हायड्रेट आणि मऊ राहण्यासाठी तुम्हाला काही खास आणि नैसर्गिक उत्पादनांची गरज असते. कारण कुरळ्या केसांची नीट निगा राखली नाही तर, केसांमध्ये कोंडा होणे, केस कोरडे होणे, केसांचा गु्ंता होणे अशा अनेक समस्या तुम्हाला जाणवू शकतात. अशा वेळी तुमच्या केसांचे नैसर्गिक टेक्स्चर टिकवून ठेवण्यासाठी हवेत ऑर्गेनिक प्रॉडक्ट… यासाठी तुमच्या हेअर केअर रूटिनमध्ये समावेश करा ऑर्गेनिक हारवेस्टच्या या न्यू लॉंच उत्पादनांचा… सोबतच वाचा कुरळ्या केसांची काळजी घेण्यासाठी टिप्स, कुरळ्या केसांसाठी स्टाईल टिप्स, केस सिल्की करण्यासाठी घरगुती उपाय
ऑर्गेनिक मॉईस्चराईझिंग शॅम्पू विथ अवाकाडो ऑईल फॉर कर्ली हेअर – Organic Moisturizing Shampoo with Avocado Oil for Curly Hair
केस कुरळे असल्यामुळे तुमच्या केसांना जास्त काळजी आणि प्रेमाची गरज असते. धुळ, माती, प्रदूषण, घाम यामुळे तुमचे केस चिकट होतात, मात्र धुतल्यावर लगेच कोरडेदेखील पडतात. यासाठीच तुम्हाला अशा एका शॅम्पूची गरज आहे. ज्यामधील नैसर्गिक घटक तुमचे केस स्वच्छ तर करतील पण केसांना धुतल्यावरही मऊ आणि मुलायम ठेवतील. यासाठीच तुम्ही ऑर्गेनिक हारवेस्टचा हा नवा शॅम्पू वापरू शकता. कारण हा खास तुमच्या कुरळ्या केसांचा विचार करून तयार करण्यात आलेला आहे. केसांना नैसर्गिक मऊपणा येण्यासाठी यामध्ये अवाकाडो तेलाचा वापर करण्यात आलेला आहे. या शॅम्पूचा वापर केल्यावर तुमचा स्काल्प कोरडा पडत नाही, ज्यामुळे केस धुतल्यावर तुमच्या केसांचा मऊपणा कायम राहतो. हा शॅम्पू शंभर टक्के नैसर्गिक घटकांपासून तयार केलेला असून केसांना थंडावा मिळण्यासाठी यामध्ये कोरफडीचा अर्कही वापरण्यात आलेला आहे. सल्फेट फ्री आणि पेराबेन फ्री असल्यामुळे कोणत्याही वयाेगटातील लोकांनी कुरळ्या केसांसाठी या शॅम्पूचा वापर करण्यास काहीच हरकत नाही. तेव्हा हा शॅम्पू वापरा आणि आम्हाला तुमच्या केसांमधील झालेला बदल कंमेटमध्ये कळवा.
ऑर्गेनिक मॉईस्चराईझिंग कंडिशनर विथ अवाकाडो आईल फॉर कर्ली हेअर – Organic Moisturizing Conditioner with Avocado Oil for Curly Hair
अवाकाडोमध्ये मॉईस्चराईझ करणारे गुणधर्म असतात. ज्यामुळे जर तुम्ही शॅम्पू केल्यावर केसांसाठी ऑर्गेनिक हारवेस्टचं अवाकाडो तेलाने युक्त असं कंडिशनर वापरलं तर तुमचे कुरळे केस मेंटेन करणं खूप सोपं जाऊ शकतं. कुरळ्या केसांना धुतल्यानंतर त्यांना मॅनेज करणं किती कठीण आहे याचा अभ्यास करून खास हे कंडिशनर तुमच्यासाठी बनवण्यात आलेलं आहे. या कंडिशनरचा वापर केल्यास तुमचे फ्रिजी आणि डॅमेज केस मऊ आणि मुलायम होतात. अवाकाडो तेलातील पोषक घटक तुमच्या केसांना मऊ राहण्यास कायम मदत करतात. विशेष म्हणजे यामध्ये सल्फेट, पेराबेन अथना सिलिकॉन सारखे घटक नसल्यामुळे केसांचे नैसर्गिक पद्धतीने संरक्षण होते.
ऑर्गेनिक मॉइस्चराईझिंग हेअर ऑईल विथ अवाकाडो फॉर कर्ली हेअर – Organic Moisturizing Hair Oil with Avocado Oil for Curly Hair
केसांची निगा राखण्यासाठी योग्य शॅम्पू आणि कंडिशनरप्रमाणे गरज असते योग्य तेलाची. नियमित केसांना तेल मालिश केल्यास केस मजबूत आणि चमकदार होतात. जर तुमचे केस कुरळे असतील तर तुम्ही ऑर्गेनिक हारवेस्टच्या या खास तेलाचा वापर केसांसाठी करायला हवा. हे तेल साधंसुधं तेल नसून खास कुरळ्या केसांसाठी तयार करण्यात आलेलं हायड्रेटिंग ऑर्गेनिक ऑईल आहे. यामध्ये अवाकाडोच्या व्हिटॅमिन ए, डी, के आणि ईचा समावेश आहेच. शिवाय आणखी तेरा प्रकारची ऑर्गेनिक तेल यात वापरण्यात आलेली आहेत. या तेलातून योग्य मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि अॅंटि ऑक्सिडंट्स केसांना सहज मिळाल्यामुळे तुमचे फ्रिझी केस मॅनेज करणं खूप सोपं जातं. केस खोलवर मॉईस्चराईझ झाल्यामुळे कोरडेपणा कमी होतो. केसांची मुळं मजबूत होतात. केसांचे योग्य पोषण झाल्यामुळे केस चमकदार आणि सुंदर दिसतात. यासाठी आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा या तेलाने केसांना मसाज करा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक