logo
Logo
User
home / फॅशन
शेला डिझाईन

नवरीसाठी खास लेटेस्ट शेला डिझाईन, दिसाल एकदम युनिक

 नवरी म्हटली की, तिच्या वेगवेगळ्या गोष्टी आल्या. अगदी केसात माळणाऱ्या गजऱ्यापासून ते जोडवीपर्यंत सगळं काही वेगळे असावे असे अनेकांना वाटते. म्हणूनच काही लेटेस्ट डिझाईन्स आणि ट्रेंड आले की ते नवरीपर्यंत पोहोचायलाच हवे. साडी आणि ब्लाऊजच्या डिझाईनसोबतच सगळ्यात जास्त महत्वाचा असतो तो म्हणजे शेला कारण नवरीला शेला हा लग्नाआधी आणि लग्नानंतर असा दोन्ही वेळी वापरायचा असतो. पूजा असो किंवा इतर काहीही असले तरी या शेलाचा उपयोग होतो.  लग्नासाठी शेला कोणता निवडायचा असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्हाला या लेटेस्ट शेला डिझाईन्स पाहायलाच हवा. या शिवाय मुंडावळ्या डिझाईन्स देखील तुम्हाला माहीत हव्यात.

नेटेड शेला

नेटेड शेला

हल्ली खूप जणांना हेवी असा शेला आवडत नाही. अशावेळी जर काहीतरी हलकं आणि तितकंच ट्रेंडी हवं असेल तर तुम्ही नेटेड शेला निवडू शकता. नेटेट शेला हल्ली छान बॉर्डरसह मिळतो. नेटेड शेल्यावर असलेली बॉर्डर ही ट्रेंडी असते. अनेकदा ती वेलवेट असते. त्यावर सौभाग्यवती असे देखील कोरलेले असते. त्यामुळे हा शेला खूपच सुंदर दिसतो. हा कॅरी करायला खूप सोपा असतो. त्यामुळे अनेक जण हा शेला अगदी आवर्जुन घेतात.
असे शेला डिझाईन्स तुम्हाला कधी कधी कस्टमाईज करुन घेता येतात. टेलरला तुम्ही तशा बॉर्डर आणून दिल्या की, तुम्हाला तुमच्या आवडीच्या नेटवर ती डिझाईन लावून मिळते. त्याला हव्या असलेल्या गोष्टी तुम्हाला अधिकच्या देखील लावता येतात. इतकेच नाही जर तुम्हाला विकत हा शेला घ्यायचा असेल तर तुम्ही भुलेश्वर, दादर किंवा ओढणी विकणाऱ्या विक्रेत्यांकडे हे शेले शोधू शकता. नवरीसाठी खास उखाणे देखील तुम्ही शेअर करा. कारण तिचा नववधूला नक्कीच फायदा होईल

वेलवेट शेला

वेलवेट शेला

वेलवेट हा अत्यंत रिच असा वाटणारा कापडाचा प्रकार आहे. वेलवेट शेला घेण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही हा ट्रेंडदेखील फॉलो करु शकता. वेलवेट शेला हा सध्या चांगलाच ट्रेंडमध्ये आहे. तुम्हाला वेगवेगळ्या रंगामध्ये हा वेलवेट शेला मिळू शकतो. वेलवेट शेल्यामध्ये सुद्धा अनेक डिझाईन्स येतात. पण तुम्हाला तुमची साडी अधिक उठून दिसायची असेल तर तुम्ही शेलावर थोड्या कमी प्रिंट असलेला शेला निवडा. वेलवेल शेला हा काही वाया जात नाही. तुम्हाला नंतरही तो ओढणी म्हणून वापरता येतो. त्यामुळे तुम्ही अगदी हमखास वेलवेट शेला वापरा तो अधिक चांगला दिसतो. वेलवेट ब्लाऊज घालूनही तुम्ही त्याची शोभा वाढवू शकता.

वेलवेट शेला शोधत असाल तर तुम्ही असा शेला आधी ऑनलाईन मिळतो का पाहा. नाहीतर खास नवरीच्या गोष्टी मिळणाऱ्या दुकानात तुम्हाला हा शेला मिळतो. त्यामुळे तुम्ही थोडा आधीच सर्च करायला घ्या.

पैठणी शेला

पैठणी शेला

पैठणीचा शेला घेण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही एकदम उत्तम निवड केली आहे. कारण पैठणी हा एव्हरग्रीन असा प्रकार आहे. त्यामुळे पैठणी शेला निवडला असेल तर तुम्हाला त्यामध्ये बरीच व्हरायटी मिळते. ब्रोकेट आणि मोर पोपट असलेल्या डिझाईन्स तुम्हाला यामध्ये मिळतात. पैठणी शेल्याचा उपयोग तुम्हाला नंतर ओढणी म्हणून देखील करता येतो. त्यामुळे तुम्ही अगदी हमखास पैठणीचा शेला मागवा. तुम्हाला येवला आणि अनेक मोठ्या पैठणीच्या दुकानात हे शेले मिळू शकतात.पैठणी हा एकदम रॉयल कारभार आहे त्यामुळे लग्नात त्यामुळे चारचाँद लागतात.या शिवाय नवरोबासाठी त्याला मॅचिंग असे काही घ्यायचे असेल तर तुम्ही मस्त पैठणी जॅकेट घेऊ शकता ते देखील अधिक छान दिसतात

आता तुम्हाला शेला घ्यायचा असेल तर तुम्ही अगदी हमखास या प्रकारामधील शेला निवडायला हवा.

27 Jan 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text