बिग बॉसचा 14 वा सीझन (Bigg Boss 14) गाजला तो मराठमोळ्या राहुल वैद्यमुळे (Rahul Vaidya). आपला खेळ आणि आपल्या वागण्याने राहुलने प्रेक्षकांनाच नाही तर शो चा निवेदक सलमान खानचे (Salman Khan) मनदेखील जिंकले. बिग बॉसनंतर राहुलचे नशीब उजळले आहे असंच आता म्हणावे लागेल. राहुल वैद्यच्या चाहत्यांसाठीही आणि अगदी राहुलसाठीही ही मोठी आणि आनंदाची बाब आहे. बिग बॉसचा पुरस्कार जरी राहुलला मिळाला नसला तरीही अनेक प्रेक्षकांचं मन राहुलने जिंकलं आहे.
सलमानकडून मिळाला बॉलीवूडमध्ये ब्रेक
आता सलमान खानचा लवकरच येणारा चित्रपट ‘राधे – युअर मोस्ट वाँटेड भाई’ मध्ये राहुल वैद्य एक गाणे गाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. एका हिंदी वेबने दिलेल्या माहितीनुसार राहुलला या चित्रपटात गाण्याची संधी देण्याचे सलमानने ठरवले आहे. मात्र याबाबतीत अजूनही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण असं असेल तर बॉलीवूडमध्ये राहुल वैद्यला हा मोठा ब्रेक मिळेल हे नक्की. सलमान खानने आतापर्यंत अनेकांना बॉलीवूडमध्ये ब्रेक दिला आहे. राहुलला बिग बॉसमध्ये सलमानने बऱ्याचदा पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता राहुल वैद्य याची घोषणा कधी करणार याची वाट चाहते पाहत आहेत.
लग्नानंतर मिताली मयेकरचा अधिक बोल्ड लुक, कमेंट्सचा वर्षाव
‘इंडियन आयडॉल’ पासून झाली होती राहुलची सुरूवात
राहुल वैद्यने आपल्या करिअरची सुरूवात इंडियन आयडॉल या रियालिटी शो पासून केली. त्यावेळी स्पर्धक म्हणून राहुल सहभागी झाला होता. संदीप आचार्य, अभिजीत सावंत यांच्यासारख्या तगड्या गायकांना राहुलने टक्कर दिली होती. तेव्हादेखील राहुल जिंकला नव्हता. पण त्याने त्यावेळीही प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यानंतर राहुलने अनेक रियालिटी शो केले. तसंच अनेक स्टेज शो राहुल वैद्य करतो. पण त्याला खरी ओळख मिळाली आहे ती बिग बॉस या शो नंतरच. राहुल माणूस म्हणून नक्की कसा आहे तेदेखील या शो मधून प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या समोर आले. या शो नंतर राहुलची प्रसिद्ध तुफान वाढली आहे.
Bigg Boss 14: मराठमोळा राहुल वैद्य जिंकतोय सिनिअर्स आणि प्रेक्षकांची मनं
लवकरच करणार लग्न
बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर इतर स्पर्धक म्युझिक व्हिडिओ करत आहेत तर काही जणा आपल्या कामात व्यस्त झाले आहेत. पण राहुल सध्या कोणतीही घाई करत नाही. लवकरच आपली गर्लफ्रेंड दिशा परमार (Disha Parmar) सह राहुल लग्न करणार आहे. अजून लग्नाची तारीख घोषित झाली नसली तरीही राहुल सध्या कुटुंबासोबत आणि दिशासोबत वेळ घालवत असून लग्नाची तयारी करत आहे. पण सलमानचा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होणार असल्याने राहुलचे गाणे आता ऐकायला मिळेल याचीच वाट आता चाहते बघत आहेत हे नक्की. ही आनंदाची बाब खरी असावी असेच प्रत्येकाला वाटत असून हे जर खरे असेल तर नक्कीच राहुलच्या करिअरला एक वेगळे वळण लागेल यात शंका नाही. ‘राधे’ हा चित्रपट ईदला अर्थात 13 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच सलमान खानने केली होती. आता यामध्ये राहुलचे गाणे रेकॉर्ड होऊन नक्की कशाप्रकारे वापरले जाणार याचीही चाहत्यांना उत्सुकता आहे.
बोल्ड आणि ग्लॅमरस असूनही या अभिनेत्रींनी मालिकांमध्ये साकारली ‘आई’
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक